'या' पदार्थांचा वापर करून घरीच करा फेशिअल
सर्वच महिलांना नेहमीच सुंदर दिसायचं असतं. सुंदर आणि चमकदार त्वचेसाठी महिला सतत काहींना काही करत असतात. कधी पार्लरमध्ये जाऊन फेशिअल करणे तर कधी बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळी क्रीम्सचा वापर केला जातो. मात्र त्वचा नैसर्गिकरित्या सुंदर करण्यासाठी बाजारात स्किन केअर प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी घरगुती उपाय करावे. हवा, माती, धूळ, प्रदूषण इत्यादी अनेक कारणांमुळे त्वचा खराब होण्याची शक्यता असते. पिंपल्स, मुरूम किंवा चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागल्यानंतर त्वचा अधिक निस्तेज आणि काळवंडलेली वाटू लागते.(फोटो सौजन्य – iStock)
महिला त्वचेचं सौदंर्य वाढवण्यासाठी पार्लरमध्ये जाऊन फेशियल, क्लिनअप, ब्लिच, वॅक्सिंग, आयब्रो इत्यादी अनेक गोष्टी करून घेतात. यामुळे काहीकाळ त्वचा अधिक सुंदर आणि चमकदार वाटू लागते. त्वचेचा सुंदर आणि चमकदार करण्यासाठी फेशिअल केले जाते. मात्र घाईगडबडीच्या वेळी अनेकदा फेशिअल करण्यासाठी वेळ मिळत नाही. अशावेळी तुम्ही घरगुती पदार्थांचा वापर फेशिअल करू शकता. घरगुती पदार्थ त्वचेचे आतून सौदंर्य वाढवतात, याशिवाय त्वचेची खराब झालेली गुणवत्ता आणि रंग सुधारण्यासाठी मदत होते. या पदार्थांचा वापर करून तुम्ही फेशिअल करू शकता.
मागील अनेक वर्षांपासून कोरफड जेलचा वापर केला जातो. कोरफड जेल त्वचेला लावल्यामुळे त्वचा अधिक हायड्रेट राहते. त्वचेमधील नैसगिक ओलावा टिकवून ठेवण्यासाठी कोरफड जेलचा वापर केला जातो. रात्री झोपण्याआधी त्वचेवर कोरफड जेल लावून झोपावे. यामुळे त्वचेची गुणवत्ता सुधारण्यास मदत होते. रात्रभर कोरफड जेल लावून झोपावे, त्यानंतर सकाळी उठल्यानंतर त्वचा पाण्याने त्वचा स्वच्छ होते. हा उपाय नियमित केल्यास त्वचेची गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल. घरगुती पदार्थांचा वापर त्वचेसाठी केल्यास त्वचा कायम उठावदार दिसते.
मधाचा वापर त्वचेसाठी केल्यामुळे त्वचेचा रंग उजळण्यासाठी मदत होते. यासाठी वाटीमध्ये मध आणि दही घेऊन मिक्स करून घ्यावे. मिक्स करून झाल्यानंतर संपूर्ण चेहऱ्यावर लावून घ्या. त्यानंतर हलक्या हाताने मसाज करा. मसाज केल्यानंतर काहीवेळ त्वचा तशीच ठेवून नंतर पाण्याने त्वचा स्वच्छ करून घ्या. हा फेसपॅक आठवड्यातून दोन ते तीन वेळा लावल्यास त्वचा उजळदार आणि चमकदार होईल.
विटामिन सी ची कमतरता दिसू लागल्यानंतर शरीराच्या ‘या’ भागांमध्ये होऊ लागतात वेदना, वेळीच व्हा सावध
चंदनाचा वापर मागील अनेक वर्षांपासून त्वचेसाठी केला जात आहे. यामुळे त्वचेमधील ओलावा कायम टिकून राहतो. फेसपॅक तयार करण्यासाठी वाटीमध्ये चंदन पावडर घेऊन त्यात गुलाबपाणी आणि हळद टाकून मिक्स करून घ्या. मिक्स करून झाल्यानंतर सर्व फेसपॅक चेहऱ्यावर लावून घ्या. त्यानंतर फेसपॅक सुकल्यानंतर त्वचा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.