Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हार्ट अटॅक येऊ नये दैनंदिन आयुष्यात फॉलो करा ‘या’ सोप्या सवयी, वयाच्या ९० नंतरही हृदय राहील कायम निरोगी

हार्ट अटॅक येण्याच्या काही दिवस आधी शरीरात अनेक बदल होऊ लागतात. त्यामुळे दैनंदिन जीवनात चुकीच्या सवयी फॉलो न करता नियमित व्यायाम आणि पोषण आहार घेऊन आरोग्याची काळजी घ्यावी.

  • By सुरुची कदम
Updated On: May 06, 2025 | 08:48 AM
हार्ट अटॅक येऊ नये दैनंदिन आयुष्यात फॉलो करा 'या' सोप्या सवयी

हार्ट अटॅक येऊ नये दैनंदिन आयुष्यात फॉलो करा 'या' सोप्या सवयी

Follow Us
Close
Follow Us:

हल्लीच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे बरेच लोक कामाच्या धावपळीमध्ये शरीराकडे दुर्लक्ष करतात. याशिवाय कमी वयातच हार्ट अटॅक, हृद्यासंबंधित समस्या, स्ट्रोक इत्यादी गंभीर आजार उद्भवू शकतात. दैनंदिन आहारात सतत होणारे बदल, कामाचा तणाव, जंक फूड, व्यायामाचा अभाव, मानसिक तणाव इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. रोजच्या आयुष्यातील चुकीच्या सवयी शरीराच्या कार्यात अडथळे निर्माण होण्याची शक्यता असते. शरीरात वाढलेले खराब कोलेस्ट्रॉल, मधुमेह इत्यादी समस्या उद्भवू लागतात. हार्ट अटॅक येण्यापूर्वी रक्तवाहिन्यांवर गंभीर परिणाम होणार होऊ लागतो. हृदयाच्या रक्तवाहिन्या ब्लॉक होऊन जातात.(फोटो सौजन्य – iStock)

मासिक पाळी येण्याआधी कंबर आणि पायांमध्ये वेदना का होतात? जाणून घ्या यामागील सविस्तर कारण

जगभरात हार्ट अटॅकची समस्या सामान्य झाली आहे. हार्ट अटॅक येण्याच्या काही दिवस आधीपासूनच शरीरात गंभीर लक्षणे दिसून येतात. या लक्षणांकडे दुर्लक्ष करणे धोक्याचे ठरू शकते. छातीमध्ये वारंवार दुखणे, छातीमध्ये जडपणा जाणवणे, वेदना होणे, थोडंसं चालल्यानंतर लगेच थकवा येणे इत्यादी लक्षणे हार्ट अटॅक येण्याच्या काही दिवस आधीपासून दिसू लागतात. त्यामुळे कायम निरोगी आरोग्यासाठी कोणत्या सवयी नियमित फॉलो कराव्यात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.

नियमित चालणे आणि व्यायाम करणे:

निरोगी आरोग्यासाठी नियमित चालणे आवश्यक आहे. याशिवाय सकाळी उठल्यानंतर ​नियमित चालणे, सायकलिंग, जलद चालणे किंवा योगासने करणे आवश्यक आहे. नियमित व्यायाम केल्यामुळे शरीराचा रक्तदाब नियंत्रणात राहतो, कोलेस्ट्रॉल कमी होते याशिवाय मधुमेहाचा धोका कमी होऊन शरीर निरोगी राहते. सकाळी उठल्यानंतर नियमित ३० मिनिटं चालल्यामुळे हार्ट अटॅकचा धोका कमी होतो. हृदयाच्या निरोगी आरोग्यासाठी नियमित चालावे.

आहारात मीठ साखरेचे कमी सेवन:

जास्त प्रमाणात मीठ आणि साखरेचे सेवन केल्यामुळे आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. या पदार्थांमध्ये हानिकारक घटक आढळून येतात. प्रक्रिया केलेले पदार्थ, पॅकेज्ड फूड, कोल्ड्रिंक्स, बेकरी पदार्थ इत्यादी पदार्थांमध्ये भरपूर प्रमाणात साखर आणि मीठ आढळून येते. त्यामुळे हृदयाच्या निरोगी आरोग्यासाठी नियमित आहारात पालेभाज्या, फळे आणि निरोगी अन्नपदार्थांचे सेवन करावे.

हिरव्या पालेभाज्या:

दैनंदिन आहारात हिरव्या पालेभाज्या किंवा फळांचे सेवन केल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. हृदयाच्या आरोग्यासाठी फायबर,अँटीऑक्सिडंट्स युक्त पदार्थांचे रोजच्या आहारात नियमित सेवन करावे. हिरव्या पालेभाज्यांसोबतच सफरचंद, डाळिंब, केळी, पेरू इत्यादी फायबरयुक्त फळांचे सेवन केल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात.

वारंवार शरीराची पचनक्रिया बिघडते? नसांमध्ये गॅस तयार झाल्यानंतर ‘या’ भागांमध्ये होऊ लागतात वेदना, बिघडते संपूर्ण आरोग्य

तणाव नियंत्रणात ठेवावा:

शरीरात वाढलेला मानसिक तणाव अनेक आजारांचे कारण बनतो. त्यामुळे शरीरात वाढलेला मानसिक तणाव कमी करण्यासाठी नियमित ध्यानधारणा, प्राणायाम, गाणी ऐकणे किंवा आवडीच्या क्रिया करणे आवश्यक आहे. शरीरात वाढणाऱ्या ‘कॉर्टिसोल’ नावाच्या हार्मोन्समुळे मानसिक तणाव मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता असते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Follow these simple habits in your daily life to avoid heart attack health care tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 06, 2025 | 08:48 AM

Topics:  

  • daily health tips
  • heart attck
  • heart care tips

संबंधित बातम्या

थंडीत Heart Attack चा धोका का वाढतो? हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून अशी घ्या शरीराची काळजी
1

थंडीत Heart Attack चा धोका का वाढतो? हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून अशी घ्या शरीराची काळजी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.