नसांमध्ये गॅस तयार झाल्यानंतर 'या' भागांमध्ये होऊ लागतात वेदना
शरीराची बिघडलेली पचनक्रिया अनेक गंभीर आजारांचे कारण बनते. चुकीचा आहार, जंक फूडचे अतिसेवन, तणाव, बिघडलेले मानसिक आरोग्य, शरीरात सतत होणारे बदल इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे आहारात शरीराला पचन होणाऱ्या हलक्या आणि सहज पचन होणाऱ्या पदार्थाचे सेवन करावे. पचनक्रिया बिघडल्यानंतर अपचन, गॅस, ऍसिडिटी, बद्धकोष्ठता इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. या समस्या उद्भवू लागल्यानंतर दुर्लक्ष केले जाते. मात्र असे न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करावे. पचनक्रिया बिघडल्यानंतर शरीराच्या इतर भागांमध्ये गॅस तयार होतो.(फोटो सौजन्य – iStock)
बऱ्याचदा पचनक्रिया बिघडल्यानंतर शरीरात गॅस तयार होतो. हाच गॅस शरीराच्या इतर भागांमध्ये जमा होतो, ज्यामुळे वेदना होऊ लागतात. मज्जतंतूमध्ये वाढलेल्या वेदना अनेकदा सहन होत नाहीत. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला शरीराच्या नसांमध्ये कशामुळे गॅस तयार होतो, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. यामुळे पोटाचे आरोग्य बिघडते आणि शरीराचे नुकसान होण्याची जास्त शक्यता असते.
शरीराची पचनक्रिया बिघडल्यानंतर मज्जातंतूमध्ये गॅस तयार होण्यास सुरुवात होते. जेवलेले अन्नपदार्थ आतड्यांमध्ये गेल्यानंतर व्यवस्थित पचन न झाल्यामुळे शरीरात गॅस निर्माण होण्याची शक्यता असते. शरीरात साचून राहिलेल्या गॅसमुळे रक्तवाहिन्यांवर तणाव येऊ लागतो. ज्यामुळे शरीराच्या इतर भागांमध्ये सुद्धा वेदना वाढू लागतात. त्यामुळे आहारात हलक्या आणि सहज पचन होतील अशाच पदार्थांचे सेवन करावे.
रोजच्या आहारात सतत होणाऱ्या बदलांमुळे पचनक्रिया बिघडण्याची शक्यता असते. तळलेले अन्नपदार्थ, तिखट, मसालेदार जेवण,फास्ट फूड, कोल्ड्रिंक्स, रात्री कोणत्याही वेळी जेवणे इत्यादी अनेक गतोष्टींमुळे शरीरात अपचन होण्याची शक्यता असते. अपचन झाल्यानंतर आतड्यांमध्ये गॅस तयार होतो. याशिवाय सतत पोटात दुखणे किंवा पचनक्रिया बिघडते.
शरीरात शारीरिक हालचालींचा अभाव निर्माण झाल्यानंतर जेवलेले अन्नपदार्थ सहज पचन होत नाहीत.त्यामुळे पचनक्रिया बिघडून शरीरात गॅस होणे, मानसिक तणाव वाढणे, शारीरिक हालचालींचा अभाव इत्यादी अनेक समस्या वाढू लागतात. शरीराच्या कार्यात अडथळे निर्माण होऊन जाऊन रक्तवाहिन्यांवर दाब येतो आणि वेदना होऊ लागतात.