पाठीवर वाढलेला काळेपणा कमी करण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या टिप्स
शरीर स्वच्छ करण्यासाठी नियमित साबण किंवा बॉडी वॉशचा वापर करून स्वच्छ अंघोळ केली जाते. अंघोळ केल्यामुळे शरीरासोबतच मन सुद्धा खूप फ्रेश राहते. अंघोळ करताना हात पाय पाठ, त्वचा इत्यादी सर्वच अवयव स्वच्छ केले जातात. पण बऱ्याचदा अंघोळ करताना पाठीच्या त्वचेकडे व्यवस्थित लक्ष दिले जात नाही. पाठ स्वच्छ करण्यासाठीं अनेक लोक स्क्रबरचा वापर करतात. मात्र दिवसभर अंगावर साचून राहिलेल्या घामामुळे पाठीवर डेड स्किन जमा होण्यास सुरुवात होते. पाठीवर जमा झालेली डेड स्किन हळूहळू वाढत जाते. अंगावर साचून राहिलेल्या घामायले पाठीवर काळे डाग किंवा खाज येण्याची शक्यता असते. याशिवाय बॅकलेस कपडे घातल्यानंतर पाठीवरील डाग किंवा इन्फेक्शन वाढण्याची शक्यता असते. त्वचेसंबंधित अनेक समस्या उद्भवू लागल्यानंतर महिला सतत दुर्लक्ष करतात.(फोटो सौजन्य – istock)
हात, पाय आणि चेहऱ्याच्या त्वचेची खूप जास्त काळजी घेतली जाते. मात्र पाठीकडे सर्वच दुर्लक्ष करतात. काळवंडलेली पाठ स्वच्छ करण्यासाठी काही महिला बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या स्किन केअर प्रॉडक्टचा वापर करतात. मात्र हे प्रॉडक्ट त्वचेचे नुकसान करतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला काळवंडलेली पाठ स्वच्छ करण्यासाठी काही घरगुती उपाय सांगणार आहोत. हे उपाय केल्यामुळे पाठीवर वाढलेला काळेपणा कमी होईल आणि डेड स्किन निघून जाईल.
घामामुळे पाठीवर डेड स्किन साचून राहते. पाठीवर साचून राहिलेल्या डेड स्किनमुळे हळूहळू पाठीवर काळेपणा वाढू लागतो. यासाठी तुम्ही ओट्स आणि दह्याच्या मिश्रणाचा वापर करू शकता. यासाठी मिक्सरच्या भांड्यात ओट्स टाकून बारीक पावडर करून घ्या. त्यानंतर त्यात दही टाकून मिक्स करा. तयार करून घेतलेली पेस्ट पाठीवर लावून काहीवेळ तशीच ठेवा. त्यानंतर पाण्याने त्वचा स्वच्छ करून घ्या. यामुळे पाठीवर वाढलेला काळेपणा कमी होण्यास मदत होईल. हा उपाय केल्यामुळे पाठीवर वाढलेला काळेपणा कमी होईल. आठवडाभर नियमित ओट्स आणि दह्याचे मिश्रण पाठीवर लावल्यास तुम्ही पाठ स्वच्छ होईल.
संत्र्याच्या सालीमध्ये असलेले गुणधर्म त्वचेवर वाढलेला काळेपणा कमी करण्यासाठी मदत करतात. बाजारात संत्र्याच्या सालीची पावडर विकत मिळते. वाटीमध्ये संत्र्याची साल घेऊन त्यात आवश्यकतेनुसार दूध मिक्स करा. तयार केलेली पेस्ट पाठीवर लावून घ्या. त्यानंतर २० मिनिटं ठेवून पाण्याने स्वच्छ करून घ्या. हा उपाय नियमित केल्यास पाठीवर वाढलेला काळेपणा कमी होईल आणि तुमची पाठ स्वच्छ होईल. पाठीवर वाढलेली डेड स्किन आणि काळेपणा कमी करण्यासाठी संत्र्याची साल प्रभावी आहे.