वाटीभर बेसनाचा वापर करून घरीच बनवा केमिकल फ्री नैसर्गिक साबण
जेवणातील चविष्ट पदार्थ बनवण्यासाठी बेसनाचा वापर केला जातो. बेसनपासून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात.बेसन आरोग्यासोबतच त्वचेसाठी सुद्धा अतिशय प्रभावी आहे. पूर्वीच्या काळापासून बेसनाचा वापर त्वचेची गुणवत्ता सुधारण्यासाठी केला जात आहे. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये चेहऱ्यावर आलेले पिंपल्स किंवा मोठे फोड घालवण्यासाठी महिला बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या स्किन केअर प्रॉडक्टचा वापर करतात. यासोबतच अनेक महागड्या क्रीमसुद्धा वापरल्या जातात. पण नेहमीच हानिकारक रसायनांपासून बनवलेल्या क्रीम्सचा वापर कारण्याऐवजी घरगुती पदार्थांचा वापर करून त्वचेची गुणवत्ता सुधारावी. यामुळे त्वचेवर नैसगरिक चमक येते.(फोटो सौजन्य – pinterest)
बेसनाच्या पिठाचा वापर करून तुम्ही घरगुती फेसपॅक, फेसमास्क, स्क्रब इत्यादी अनेक उपाय केले जातात. सर्वच घरांमध्ये बेसन उपलब्ध असते. बेसनमध्ये आढळून येणारे घटक त्वचा आतून स्वच्छ करतात आणि चेहऱ्यावरील चमक वाढवतात. यामध्ये असलेले नैसर्गिक क्लिन्झिंग गुणधर्म त्वचेच्या छिद्रांमध्ये साचून राहिलेली घाण स्वच्छ करतात. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये चेहऱ्यावर जमा होणारे अतिरिक्त तेल कमी करण्यासाठी तुम्ही बेसन पिठाचा वापर करू शकता. आज आम्ही तुम्हाला घरगुती पदार्थांचा वापर करून केमिकल फ्री नैसर्गिक साबण तयार करण्याची सोपी कृती सांगणार आहोत. हा साबण नियमित तुम्ही अंघोळीसाठी किंवा त्वचा स्वच्छ करण्यासाठी वापरू शकता.
बेसनाचा साबण तयार करण्यासाठी सर्वप्रथम, मोठ्या वाटीमध्ये बेसन घेऊन त्यात आंबेहळद, गुलाबपाणी, बदामाचे तेल, कोरफड जेल, ग्लिसरीन, विटामीन ई कॅप्सूल्स घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या. तयार केलेले सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करा. पिठामध्ये अजिबात गुठळ्या ठेवू नका. मोठ्या भांड्यात सोप बेस घेऊन वितळवून घ्या. त्यानंतर त्यात तयार केलेली बेसन पेस्ट घालून मिक्स करा. सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर साबण बनवण्यासाठी वाटीमध्ये मिश्रण ओता. पाच किंवा सहा तास ठेवून घ्या. साबण मोल्ड किंवा वाटीमध्ये ठेवलेले साबण काढून घ्या. हा साबण तुम्ही अंघोळीसाठी किंवा त्वचा स्वच्छ करण्यासाठी वापरू शकता.






