कोरड्या आणि निस्तेज केसांसाठी 'या' पानांचा वापर करून बनवा औषधी टोनर
वातावरणात सतत होणारा बदल, कामाचा वाढलेला तणाव, आहारातील बदल, अपुरी झोप इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यासह केस आणि त्वचेवर लगेच दिसून येतो. त्यामुळे आरोग्यासोबतच केस आणि त्वचेची जास्त काळजी घ्यावी. बऱ्याचदा धूळ, माती, प्रदूषणामुळे केस गळणे किंवा केसांमध्ये कोंडा वाढण्याची शक्यता असते. केसांमध्ये वाढलेल्या कोंड्यामुळे केस अतिशय निस्तेज आणि कोरडे होऊन जातात. केसांची गुणवत्ता खराब झाल्यानंतर केसांसंबधित अनेक वेगवेगळ्या समस्या वाढू लागतात. केस निस्तेज होणे, रुक्ष होणे, कोरडे होणे, केसांना फाटे फुटणे किंवा इतरही समस्या उद्भवू लागतात.(फोटो सौजन्य – istock)
केसांची गुणवत्ता खराब झाल्यानंतर महिला बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या हेअर केअर प्रॉडक्टचा वापर करतात. सतत शॅम्पू, कंडिशर किंवा कोणतेही हेअर सिरम लावल्यामुळे केस अतिशय कोरडे होऊन जातात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला केसांची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी तुळशीच्या पानांचे टोनर बनवण्याची सोपी कृती सांगणार आहोत. आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध असलेले टोनर केस मजबूत आणि चमकदार करण्यासाठी मदत करते.
तुळशीच्या पानांचा वापर धार्मिक गोष्टींसाठी वापरला जातो. पण औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेली तुळशीची पाने केस, त्वचा आणि आरोग्यासाठी गुणकारी आहेत. नियमित एक तुळशीचे पान चावून खाल्यास शरीरातील गंभीर आजारांपासून सुटका मिळेल. तुळशीच्या पानांचा वापर करून बनवलेले टोनर नियमित वापरल्यास केस गळती थांबेल. टाळूवर वाढलेला कोंडा कमी करण्यासाठी तुळशीच्या पानांच्या टोनरचा वापर करावा. तुळशीच्या पानांच्या सुगंधामुळे केस कायमच फ्रेश आणि मजबूत राहतील. निरोगी आणि मजबूत केसांसाठी तुळशीच्या टोनरचा वापर करावा. हे टोनर तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये घरीसुद्धा बनवू शकता.
तुळशीच्या पानांचे टोनर बनवण्यासाठी सर्वप्रथम, टोपात एक ग्लास पाणी घेऊन गरम करून घ्या. पाण्याला उकळी आल्यानंतर गुलाब पाणी आणि तुळशीची पाने टाकून चमच्याने मिक्स करून घ्या. पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस बंद करा. तयार करून घेतलेले पाणी व्यवस्थित थंड करा. तुळशीचे टोनर गाळून घ्या आणि स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा. नियमित रात्री किंवा सकाळी उठल्यानंतर केसांच्या मुळांवर टोनर लावा. यामुळे केसांची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल आणि तुमचे केस मजबूत राहतील.