मुसळधार पावसात त्वचेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या टिप्स
संपूर्ण देशभरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचून राहते. या पाण्यामुळे आरोग्य आणि त्वचेचे नुकसान होण्याची जास्त शक्यता असते. राज्यभरात सतत पडत असलेल्या अवकाळी पावसात त्वचेच्या आरोग्याची जास्त काळजी घ्यावी. कारण पाऊस पडण्यास सुरुवात झाल्यानंतर वातावरणात आर्द्रता वाढू लागते. या आर्द्रतेचा परिणाम त्वचेवर लगेच दिसून येतो. यामुळे त्वचा अतिशय कोरडी आणि निस्तेज होऊन जाते. कोरड्या त्वचेवर कितीही मेकअप केला किंवा कोणतेही प्रॉडक्ट लावले तरीसुद्धा चांगली दिसत नाही. त्यामुळे पावसाळ्यात स्किन केअर रुटीनमध्ये बदल करणे आवश्यक आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला मुसळधार पावसात त्वचेच्या आरोग्याची कशी काळजी घ्यावी, याबद्दल काही सोप्या टिप्स सांगणार आहोत. या टिप्स नियमित फॉलो केल्यास तुमची त्वचा कायमच चमकदार राहील.(फोटो सौजन्य – iStock)
वर्षाच्या बाराही महिने भरपूर पाण्याचे सेवन करावे. पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीर हायड्रेट आणि फ्रेश राहते. थंडगार वातावरणात बऱ्याचदा सगळ्यांचं अतिशय कमी तहान लागते. मात्र तहान कमी लागते म्हणून पाण्याचे कमी सेवन करू नये. पावसाळ्यातील वातावरणात त्वचा अतिशय चिकट होऊन जाते. त्यामुळे भरपूर पाण्याचे सेवन करून त्वचा हायड्रेट आणि निरोगी ठेवावी. दिवसभरात कमीत कमी ८ ते ९ ग्लास पाणी प्यावे. भरपूर पाणी प्यायल्यामुळे शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातात आणि त्वचा फ्रेश दिसू लागते.
पावसाळ्यात त्वचा अतिशय कोरडी पडते. त्वचेतील ओलावा कमी झाल्यानंतर चेहरा निस्तेज आणि रुक्ष दिसू लागतो. अशावेळी चेहऱ्यावर मॉइस्चराइर लावावे. मॉइस्चराइर लावल्यामुळे त्वचा हायड्रेट राहते. पावसाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये मॉइस्चराइरचा वापर करावा. यादिवशी जेल बेस्ड मॉइस्चराइझर अतिशय प्रभावी ठरेल. यामुळे त्वचा चिकट किंवा तेलकट होणार नाही.
पावसाळ्यात सगळीकडे थंडावा असतो. त्यामुळे थंड पाण्याची अंघोळ करण्याऐवजी गरम पाण्याची अंघोळ करण्यास प्राधान्य द्यावे. याशिवाय अंघोळीच्या पाण्यात मीठ टाकावे. यामुळे त्वचेवर चिटकून राहिलेली घाण स्वच्छ होण्यास मदत होते. मिठाच्या पाण्याची अंघोळ नियमित केल्यामुळे इन्फेक्शनचा धोका कमी होईल आणि त्वचा फ्रेश आणि निरोगी राहील.
पुरुषांना लांब केस असलेल्या महिलाच का आवडतात? जाणून घ्या काय सांगते विज्ञान
सर्वच ऋतूंमध्ये पौष्टिक आहार घ्यावा. आहारात पचनास हलक्या असलेल्या पदार्थांचे नियमित सेवन केल्यामुळे शरीराची पचनक्रिया बिघडत नाही. पावसाळ्यात साथीच्या आजारांची लागण मोठ्या प्रमाणावर होते. या आजारांपासून शरीराचा बचाव करण्यासाठी आहारात पौष्टिक आणि उष्ण पदार्थांचे सेवन करावे.