Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कामाच्या तणावामुळे शरीरात वाढलेला थकवा दूर करण्यासाठी फॉलो करा ‘या’ टिप्स, स्वतःला करा रिफ्रेश

मानसिक तणाव वाढल्यानंतर संपूर्ण आरोग्य बिघडून जाते. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी काही टिप्स फॉलो केल्या तर तुमचा आठवड्याभराचा थकवा झटक्यात दूर होईल. कामासोबतच स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 04, 2026 | 03:40 PM
कामाच्या तणावामुळे शरीरात वाढलेला थकवा दूर करण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स, स्वतःला करा रिफ्रेश

कामाच्या तणावामुळे शरीरात वाढलेला थकवा दूर करण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स, स्वतःला करा रिफ्रेश

Follow Us
Follow Us:

जीवनशैलीत सतत होणारे बदल, कामाचा वाढलेला तणाव, बिघडलेले मानसिक आरोग्य, पोषक घटकांची कमतरता आणि अपुऱ्या झोपेचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. एकजागेवर बसून तासनतास काम करत राहिल्यामुळे केवळ शारीरिक आरोग्याचं नाहीतर मानसिक आरोग्य सुद्धा बिघडते. त्यामुळे शरीराला विश्रांतीची आवश्यकता असते. आठवड्याभराच्या धावपळीनंतर थकवा आणि मानसिक ताण जाणवतो. यामुळे शरीराला आणि मनाला विश्रांतीची आवश्यकता असते. सुट्टीच्या दिवशी खूप थकल्यासारखं वाटते आणि आपण झोपून राहतो. अशावेळी तुम्ही स्वत ला रिफ्रेश करणे गरजेचे आहे. त्यासाठी काही सोप्या गोष्टी केल्यास तुम्हाला पुन्हा एकदा कामासाठी ऊर्जा मिळते आणि ताजेतवाने वाटते. सुट्टीच्या दिवशी काही टिप्स फॉलो केल्या तर तुमचा आठवड्याभराचा थकवा झटक्यात दूर होईल.(फोटो सौजन्य – istock)

पांढरेशुभ्र दात पिवळे का पडतात? जाणून घ्या डाग पडण्यामागची खरी कारणे

छंद जोपासा:

धावपळीमुळे आठवडाभर आपल्याला कामाव्यतिरिक्त इतर कोणत्याही गोष्टीसाठी पुरेसा वेळ मिळत नाही. म्हणून सुट्टीच्या दिवशी तुमचा छंद जोपासण्याचा प्रयत्न करा. जसे की, वाचन, गाणी ऐकणे, चित्रकला, स्विमिंग, इत्यादी. आवडीच्या गोष्टी केल्याने डोपामाइन नावाचे हॅपी हॉर्मोन सक्रिय होते. यामुळे मूड फ्रेश होतो आणि मानसिक ताण खूप कमी होतो.

हलका व्यायाम, योगासने:

सुट्टीचा दिवस पूर्णपणे आराम करण्यात जातो. मात्र झोपून राहिल्याने जास्त थकवा जाणवतो. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी हलका व्यायाम आणि योगा करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही स्ट्रेचिंग, पुशअप्स, सूर्यनमस्कार करू शकता. योगासने केल्याने शरीर मोकळे होते. तसेच ध्यान केल्याने एकाग्रता वाढते आणि ऊर्जा टिकून राहते.

निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवा:

सुट्टीच्या दिवशी घरातच बसून राहण्यापेक्षा जवळच्या एखाद्या बागेत, टेकडीवर किंवा मोकळ्या मैदानात फिरायला जा. हिरवळ आणि शुद्ध हवा मानसिक थकवा दूर करण्यासाठी सर्वोत्तम ठरते. तसेच कुटुंबासोबत एकत्र वेळ घालवल्याने तुमचा मूड सुधारतो. त्यानुसार तुम्ही लाँग ड्राइव्ह, मूव्ही किंवा डिनरसाठी देखील जाऊ शकता.

स्पा किंवा मसाज करा:

जर तुम्हाला आठवड्याचा थकवा दूर करायचा असेल तर सुट्टीच्या दिवशी मसाज किंवा स्पा ट्रीटमेंट घेऊ शकता. यामुळे खूप जास्त प्रमाणात रिलॅक्स वाटते. तसेच सकाळी किंवा संध्याकाळी कोमट पाण्याने अंघोळ करा. शक्य असल्यास अंघोळीपूर्वी शरीराला तेलाने मसाज करा. यामुळे रक्तभिसरण सुधारते आणि स्नायूंचा ताण कमी होतो.

World Cancer Day 2026: डोळ्यांच्या कॅन्सरची लागण झाल्यानंतर दिसून येतात ‘ही’ महाभयंकर लक्षणे, दुर्लक्ष केल्यास गमवावी लागेल दृष्टी

डिजिटल डिटॉक्स:

आजकाल लॅपटॉप आणि फोन शिवाय कोणतेही काम अपूर्ण असते. त्यातच ऑफिसमध्ये या गोष्टींचा वापर अनिवार्यच असतो. सततच्या, स्क्रीन टाईममुळे डोळ्यांनाही त्रास होतो. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी सर्वात आधी तुम्ही डिजिटल डिटॉक्स पाळणे महत्त्वाचे आहे. सुट्टीच्या दिवशी किमान ४-५ तास डिजिटल डिटॉक्स पाळा. स्क्रीनपासून दूर राहिल्यामुळे डोळ्यांना आणि मेंदूला आराम मिळतो.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Follow these tips to get rid of body fatigue due to work stress refresh yourself happy lifestyle

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 04, 2026 | 03:40 PM

Topics:  

  • Happy Lifestyle
  • lifestlye tips
  • self care tips

संबंधित बातम्या

Pregnancy Sleep Problems: गर्भावस्थेचा शेवटचा टप्पा खूप महत्त्वाचा! महिलांनो, ‘या’ चुका अजिबात करू नका
1

Pregnancy Sleep Problems: गर्भावस्थेचा शेवटचा टप्पा खूप महत्त्वाचा! महिलांनो, ‘या’ चुका अजिबात करू नका

PCOS and Diabetes Risk: PCOS मुळे मधुमेहाचा धोका वाढू शकतो का?
2

PCOS and Diabetes Risk: PCOS मुळे मधुमेहाचा धोका वाढू शकतो का?

Asthma vs COPD: दमा की COPD? श्वास लागतोय, पण आजार नेमका कोणता? ‘या’ टेस्टशिवाय होणार नाही फरक स्पष्ट
3

Asthma vs COPD: दमा की COPD? श्वास लागतोय, पण आजार नेमका कोणता? ‘या’ टेस्टशिवाय होणार नाही फरक स्पष्ट

Lifestyle News: सकाळी उठताच हात-पाय सुन्न पडतात? शरीर देतंय ‘हे’ संकेत, दुर्लक्ष करू नका!
4

Lifestyle News: सकाळी उठताच हात-पाय सुन्न पडतात? शरीर देतंय ‘हे’ संकेत, दुर्लक्ष करू नका!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.