Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ganesh Chaturthi 2024: यंदा गणेश चतुर्थीला बनवून पहा रसमलाई मोदक, Video तून जाणून घ्या रेसिपी

बाप्पाच्या नैवेद्याची रंगत वाढवा घरी बनवा चविष्ट आणि हटके रसमलाई मोदक. बाप्पाचे आगमन अवघ्या काही दिवसांवर आले आहे. सर्वत्र बाप्पाच्या आगमनाची लगबग आता सुरु झाली असून तुम्हीही नैवेद्यासाठी मोदकांची रेसिपी शोधत असाल तर आजची मोदकांची हटके रेसिपी एकदा नवीन करून पहा. रसमलाई हा पदार्थ सर्वांच्या आवडीचा आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 03, 2024 | 03:53 PM
यंदा गणेश चतुर्थीला बनवून पहा रसमलाई मोदक, Video तून जाणून घ्या रेसिपी

यंदा गणेश चतुर्थीला बनवून पहा रसमलाई मोदक, Video तून जाणून घ्या रेसिपी

Follow Us
Follow Us:

गणेश चतुर्थी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. यावर्षी 7 सप्टेंबर रोजी गेणेशाचे आगमन होणार आहे. दरवर्षीप्रमाणे लोकांना बाप्पाच्या आगमनाची आतुरता लागली असून आता बाप्पाच्या स्वागताच्या तयारींना सुरुवात झाली आहे. गणेशाच्या स्वागताच्या तयारींमध्ये नैवेद्याचे महत्त्व फार मोलाचे. बाप्पाला मोदकांचा नैवेद्य दाखवण्याची आपल्यात प्रथा आहे. मोदक हा बाप्पाचा सर्वात प्रिय पदार्थ असल्याचे म्हटले जाते आणि म्हणूनच त्याला त्याच्या आवडीच्या मोदकांचा नैवैद्य दाखवला जातो.

आता काळानुसार, मोदकांचे अनेक नवनवीन प्रकार आले आहेत. मात्र तुम्ही कधी रसमलाई मोदक ट्राय केले आहेत का? रसमलाई ही एक मिठाई असुन लहानांपासून मोठ्यांपर्यंत ही गोड मिठाई प्रत्येकाच्या आवडीची आहे. मात्र तुम्हाला माहिती आहे का आता तुम्ही यापासून मोदकदेखील बनवू शकता. हा हटके मोदक चवीला अप्रतिम लागतो. याच्या रेसिपीचा एक व्हिडिओ @sugran_recipe नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. जाणून घेऊयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

हेदेखील वाचा – Ganesh Chaturthi 2024: बाप्पासाठी बनवा मूगडाळीचे पौष्टिक मोदक, झटपट तयार होणारी रेसिपी

साहित्य

  • 200 ग्रॅम पनीर
  • 3 चमचे पिठी साखर
  • 1/2 वाटी मिल्क पावडर
  • पिस्ता
  • गुलाबाच्या पाकळ्या
  • तूप
हेदेखील वाचा – Ganesh Chaturthi 2024: मंदिर उभारण्यासाठी बाप्पा स्वतः पृथ्वीवर अवतरले? गणेशाच्या अनोख्या मंदिराविषयी जाणून घ्या

कृती

  • रसमलाई मोदक बनवण्यासाठी सर्वप्रथम पनीरचे तुकडे करून मिक्सरच्या भांड्यात घाला आणि बारीक पेस्ट करून घ्या
  • यानंतर गॅसवर एक पॅन ठेवा आणि यात तूप टाका
  • मग यात तयार पनीरची पेस्ट टाका आणि परता
  • नंतर त्यात तीन चमचे साखर घाला आणि मिक्स करा
  • आता तुमचे सारण तयार आहे. गॅस बंद करा आणि तयार सारण एका प्लेटीत काढून घ्या
  • आता या मिश्रणात पिस्ता, गुलाबाच्या पाकळ्या घालून व्यवस्थित एकजीव करून घ्या
  • यानंतर तुमच्या आवडीनुसार या मिश्रणाचे हाताने किंवा साच्याच्या मदतीने मोदक तयार करून घ्या
  • अशाप्रकारे तुमचे रसमलाई मोदक तयार होतील
  • हे रसमलाई मोदक बाप्पाच्या नैवेद्याची रंगत वाढवतील

Web Title: Ganesh chaturthi 2024 make sweet rasmalai modak at home video recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 03, 2024 | 03:50 PM

Topics:  

  • Ganesh Chaturthi 2026
  • Ganpati festival 2024
  • Hindu Festival

संबंधित बातम्या

Ratnagiri: मुसळधार पाऊस अन् खड्ड्यांचे साम्राज्य; गणेशोत्सवाआधी कोकणातील रस्ते दुरुस्तीसाठी प्रशासनाची मोहीम
1

Ratnagiri: मुसळधार पाऊस अन् खड्ड्यांचे साम्राज्य; गणेशोत्सवाआधी कोकणातील रस्ते दुरुस्तीसाठी प्रशासनाची मोहीम

Ganesh Chaturthi: गणपतीच्या १२ नावांमागे दडलाय खास अर्थ; प्रत्येक नावाचा अर्थ आणि महत्त्व जाणून घ्या
2

Ganesh Chaturthi: गणपतीच्या १२ नावांमागे दडलाय खास अर्थ; प्रत्येक नावाचा अर्थ आणि महत्त्व जाणून घ्या

Ganeshotsav 2026: गणेशोत्सवात AIची एंट्री! आमंत्रण पत्रिकेपासून सजावटीपर्यंत ‘बाप्पाच्या स्वागतासाठी’ AI करणार मदत
3

Ganeshotsav 2026: गणेशोत्सवात AIची एंट्री! आमंत्रण पत्रिकेपासून सजावटीपर्यंत ‘बाप्पाच्या स्वागतासाठी’ AI करणार मदत

Ganesh Chaturthi: दीड ते दहा दिवसांचा गणपती; प्रत्येक दिवसामागे काय आहे महत्त्व? जाणून घ्या
4

Ganesh Chaturthi: दीड ते दहा दिवसांचा गणपती; प्रत्येक दिवसामागे काय आहे महत्त्व? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.