Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 25 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बाप्पाच्या प्रसादासाठी वाटीभर रव्यापासून बनवा मऊसूत गोड बर्फी, जाणून घ्या सोपी रेसिपी

अखेर गणेशिवोत्सवचा पवित्र सण सुरु झाला आहे. या सणानिमित्त देवाची पूजा-अर्चा करत बाप्पाच्या प्रसादासाठी नवनवीन पदार्थांची मेजवानी तयार केली जाते. यात अधिकतर गोडाच्या पदार्थांचा समावेश असतो. तुम्हालाही सहज, सोपा आणि टेस्टी असा प्रसाद बनवायचा असेल आजची ही खास रेसिपी त्वरित जाणून घ्या. ही रेसिपी फार कमी साहित्यापासून आणि कमी वेळेत बनून तयार होते.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 10, 2024 | 02:20 PM
बाप्पाच्या प्रसादासाठी वाटीभर रव्यापासून बनवा मऊसूत गोड बर्फी, जाणून घ्या सोपी रेसिपी

बाप्पाच्या प्रसादासाठी वाटीभर रव्यापासून बनवा मऊसूत गोड बर्फी, जाणून घ्या सोपी रेसिपी

Follow Us
Follow Us:

गणेशोत्सव अखेर सुरु झाला असून आपल्या या मायानगरीत आता बाप्पाचे मोठ्या जोशात आगमन झाले आहे. महाराष्ट्रातील मुख्य सणांपैकी हा एक सण आहे. हिंदू धर्मात या सणाला फार महत्त्व आहे. या सणानिमित्त बाप्पाची पूजा-अर्चा करून त्याला प्रसाद अर्पण केला जातो. आता अनेकदा या प्रसादासाठी काही गोडाचा पदार्थ बनवला जातो.

आम्हीदेखील बाप्पाच्या प्रसादासाठीची एक खास आणि सोपी रेसिपी आज तुमच्यासोबत शेअर करत आहोत. तुम्ही लाडू, मोदक हे पदार्थ तर बाप्पासाठी अनेकदा बनवले असतील मात्र घाईगडबडीच्या वेळी तुम्ही बाप्पासाठी सहज आणि सोप्या पद्धतीने रव्याची बर्फी तयार करू शकता. आज आम्ही तुम्हाला एक वाटी रव्यापासून मऊसूत आणि स्वादिष्ट बर्फी कशी तयार करायची याची एक खास रेसिपी सांगत आहोत. जाणून घ्या यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

हेदेखील वाचा – Ganesh Chaturthi Recipe: बाप्पाला करा खुश! नैवेद्यासाठी बनवा कुरकुरीत तळणीचे मोदक

साहित्य

  • रवा
  • तूप
  • साखर
  • पाणी
  • सुकं खोबरं
  • वेलची पूड
हेदेखील वाचा – गौरीगणपतीला नैवेद्यासाठी आवर्जून बनवा भोपळ्याची चटपटीत भाजी, नोट करा विदर्भ स्टाईल रेसिपी

कृती

  • रव्याची बर्फी बनवण्यासाठी सर्वप्रथम एका कढईत 3 चमचे तूप घाला
  • तूप विरघळल्यानंतर यात एक वाटी रवा टाका आणि परतून घ्या
  • रवा खरपूस भाजून झाल्यानंतर एका बाऊलमध्ये काढून घ्या.
  • त्यानंतर कढईत एक वाटी साखर घाला
  • यानंतर यात ग्लासभर पाणी टाका
  • पाण्यात साखर विरघळल्यानंतर त्यात भाजलेला रवा घालून मिक्स करा
  • नंतर यात एक कप किसलेलं खोबर आणि अर्धा चमचा वेलची पूड घाला आणि मिक्स करा आणि मग गॅस बंद करा
  • आता एका ताटाला तुपाने ग्रीस करा
  • मग यात तयार मिश्रण पसरवा आणि मग यावर ड्राय फ्रुट्सचे तुकडे गार्निश करा
  • नंतर हे मिश्रण काहीवेळ थंड करत ठेवा आणि मग चाकूच्या साहाय्याने याच्या वड्या पाडून घ्या
  • अशाप्रकारे तुमची रव्याची बर्फी काही मिनिटांतच तयार होईल

Web Title: Ganesh chaturthi recipe of soft sweet barfi from a bowl of semolina for prasad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 10, 2024 | 02:20 PM

Topics:  

  • Ganesh Chaturthi 2026
  • Ganpati festival 2024
  • Hindu Festival

संबंधित बातम्या

Kojagiri purnima: कोजागिरी पौर्णिमेला लड्डू गोपाळाची पूजा करणे का मानले जाते विशेष, जाणून घ्या विधी, नैवेद्य आणि धार्मिक महत्त्व
1

Kojagiri purnima: कोजागिरी पौर्णिमेला लड्डू गोपाळाची पूजा करणे का मानले जाते विशेष, जाणून घ्या विधी, नैवेद्य आणि धार्मिक महत्त्व

Kojagiri purnima: कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी राशीनुसार करा उपाय, तुमच्या जीवनात येईल सुख समृद्धी 
2

Kojagiri purnima: कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी राशीनुसार करा उपाय, तुमच्या जीवनात येईल सुख समृद्धी 

Kojagiri Purnima 2026: शरदाचे चांदणे आणि कोजागिरीची रात्र…! कोजागिरी पौर्णिमेनिमित्त प्रियजनांना पाठवा मराठमोळ्या शुभेच्छा
3

Kojagiri Purnima 2026: शरदाचे चांदणे आणि कोजागिरीची रात्र…! कोजागिरी पौर्णिमेनिमित्त प्रियजनांना पाठवा मराठमोळ्या शुभेच्छा

Diwali 2026: धनत्रयोदशी ते भाऊबीजपर्यंत यंदाची दिवाळी कधी? जाणून घ्या संपूर्ण यादी
4

Diwali 2026: धनत्रयोदशी ते भाऊबीजपर्यंत यंदाची दिवाळी कधी? जाणून घ्या संपूर्ण यादी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.