Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ganesh Chaturthi 2024: बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी घरी बनवा पारंपरिक सातूचे लाडू

अखेर बाप्पाचे आपल्या मायानगरीत आगमन झाले आहे. बाप्पाचे आगमन होताच त्याला विविध पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. या गणेश चतुर्थीनिमित्त नैवेद्याला किंवा प्रसादाला तुम्हाला काही पारंपरिक बनवायचे असल्यास तुम्ही सातूच्या लाडवांची रेसिपी ट्राय करू शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 11, 2024 | 01:01 PM
Ganesh Chaturthi 2024: बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी घरी बनवा पारंपरिक सातूचे लाडू

Ganesh Chaturthi 2024: बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी घरी बनवा पारंपरिक सातूचे लाडू

Follow Us
Follow Us:

गणेशोत्सव सण अखेर सुरु झाला आहे. हिंदू धर्मातील पवित्र सणांपैकी हा एक आहे. या सणानिमित्त भगवान गणेशाची मनोभावनेने पूजा करत त्याला प्रसन्न करण्यासाठी नवनवीन पदार्थांचा प्रसाद अर्पण केला जातो. याकाळात अनेकजण वेगवेगळे गोडाचे पदार्थ बनवून या दिवसाची रंगत वाढवण्याचा प्रयत्न करत असतात.

तुम्ही बाप्पासाठी अनेकदा मोदक, खीर असे प्रकार बनवले असतील. मात्र काही वेगळे आणि पारंपरिक करू इच्छित असाल तर तुम्ही बाप्पासाठी सातूचे लाडू बनवू शकता. अनेकांना या पदार्थाविषयी फारसे काही ठाऊक नाही, हा पारंपरिक पदार्थ आहे . या लाडवांची चव फार अप्रतिम असते, त्यामुळे हे लाडू घरातील प्रत्येकाच्या पसंतीस पडतील. शिवाय तुमचे कौतुकही होईल. चला तर मग या अनोख्या आणि पारंपरिक पदार्थाची रेसिपी जाणून घेऊयात.

हेदेखील वाचा – Quick Recipe: नाश्त्याची रंगत वाढावा! घरी बनवा हेल्दी आणि टेस्टी पालक कबाब

साहित्य

  • 250 ग्रॅम भाजलेले हरभरे
  • काजू
  • बदाम
  • सूर्यफूल बिया
  • मनुका
  • पिस्ता
  • एक वाटी तूप
  • एक कप गव्हाचे पीठ
  • रवा अर्धा कप
  • एक कप गूळ
  • एक चमचा वेलची पूड
हेदेखील वाचा – बाप्पाच्या प्रसादासाठी वाटीभर रव्यापासून बनवा मऊसूत गोड बर्फी, जाणून घ्या सोपी रेसिपी

कृती

  • सातूचे लाडू बनवण्यासाठी सर्वप्रथम भाजलेले हरभरे सोलून मिक्सरमध्ये टाकून याची एक बारीक पावडर बनवून घ्या
  • असे केल्याने, मदतीने तुम्ही घरच्या घरी ताजा सातू बनवू शकाल
  • यानंतर गॅसवर एक पॅन ठेवून यात तूप टाका
  • मग यात बारीक चिरलेले बदाम, काजू, पिस्ता आणि सूर्यफुलाच्या बिया चांगल्या प्रकारे तळून घ्या
  • यांनतर यात मनुके घाला आणि छान परतून घ्या
  • सर्व साहित्य परतून एका प्लेटीत काढून घ्या
  • आता गॅसवर एक कढई ठेवा आणि यात तूप टाका
  • यात एक वाटी गव्हाचे पीठ टाकून चांगले भाजून घ्या
  • गव्हाच्या पिठाला सुवासिक वास येऊ लागल्यावर त्यात एक छोटा कप रवा टाका आणि सोबत सातूही घाला
    सर्वकाही नीट भाजून घ्या. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही यात आणखीन तूप घालू शकता, जेणेकरून हे चांगले भाजले जाईल
  • आता त्यात भाजलेले ड्रायफ्रुट्स टाका आणि हे मिश्रण मिक्स करून चांगले ढवळा
  • नंतर यात गूळ घालून मिक्स करा
  • मग यात वेलची पूड घाला आणि साहित्य नीट ढवळून घ्या
  • आता गॅस बंद करून मिश्रण थंड होऊ द्या
  • मिश्रण थंड झाले की याचे लाडू वळून घ्या
  • अशाप्रकारे तुमचे सातूचे लाडू तयार होतील

Web Title: Ganesh chaturthi recipe of traditional sattu ladoo for ganpati bappa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 11, 2024 | 01:01 PM

Topics:  

  • food recipe
  • Ganesh Chaturthi 2026

संबंधित बातम्या

Ganeshotsav 2026: गणेशोत्सवात AIची एंट्री! आमंत्रण पत्रिकेपासून सजावटीपर्यंत ‘बाप्पाच्या स्वागतासाठी’ AI करणार मदत
1

Ganeshotsav 2026: गणेशोत्सवात AIची एंट्री! आमंत्रण पत्रिकेपासून सजावटीपर्यंत ‘बाप्पाच्या स्वागतासाठी’ AI करणार मदत

Ganesh Chaturthi: दीड ते दहा दिवसांचा गणपती; प्रत्येक दिवसामागे काय आहे महत्त्व? जाणून घ्या
2

Ganesh Chaturthi: दीड ते दहा दिवसांचा गणपती; प्रत्येक दिवसामागे काय आहे महत्त्व? जाणून घ्या

Legal Notice To Vidyanand Bapat: ४८ तासांत बिनशर्त माफी मागा…; विद्यानंद बापटांना कोणी पाठवली कायदेशीर नोटीस?
3

Legal Notice To Vidyanand Bapat: ४८ तासांत बिनशर्त माफी मागा…; विद्यानंद बापटांना कोणी पाठवली कायदेशीर नोटीस?

Ganesh Chaturthi 2026 : भारतातील 5 सुप्रसिद्ध गणपती पंडाल, एकदा तरी नक्की भेट द्या
4

Ganesh Chaturthi 2026 : भारतातील 5 सुप्रसिद्ध गणपती पंडाल, एकदा तरी नक्की भेट द्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.