Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 21 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चटपटीत नाश्त्यासाठी घरीच गव्हाच्या पिठापासून बनवा पौष्टिक नूडल्स, लहान मुलेही होतील खुश

बाजारातील नूडल्स तर तुम्ही बऱ्याचदा खाल्ले असतील मात्र यावेळी घरीच गव्हाच्या पिठापासून पौष्टिक आणि चवदार असे नूडल्स बनवून पहा. या रेसिपीने तुम्ही घरातील सर्वांना खुश करू शकता. जाणून घ्या याची सोपी रेसिपी.

  • By नुपूर भगत
Updated On: Nov 24, 2024 | 11:08 AM
चटपटीत नाश्त्यासाठी घरीच गव्हाच्या पिठापासून बनवा पौष्टिक नूडल्स, लहान मुलेही होतील खुश

चटपटीत नाश्त्यासाठी घरीच गव्हाच्या पिठापासून बनवा पौष्टिक नूडल्स, लहान मुलेही होतील खुश

Follow Us
Follow Us:

सकाळचा नाश्ता हा आपल्या रोजच्या जीवनातील एक अविभाज्य भाग. नाश्ता कधीही चुकवू नये, सकाळचा नाश्ता आपल्याला दिवसभर उत्साहित राहण्यास एनर्जी प्रदान करत असत. आता नाश्ता म्हटलं की, तेच तेच पदार्थ आठवू लागतात जसे की, पोहा, उपमा मात्र आम्ही तुम्हाला सांगतो की, हे बोरिंग नाश्त्याचे प्रकार सोडा आणि आता घरीच बनवा सर्वांच्या आवडीचे चायनीज नूडल्स! नूडल्स हा एक असाल खाद्यपदार्थ आहे जो लहानांनाच काय तर मोठ्यांनाही खायला फार आवडतो. हा एक पाश्चात्य पदार्थ जरी असला तरी जगभरात या पदार्थाचे भरपूर चाहते आहेत. अशात तुम्हीही हे नूडल्स अनेकांदा हॉटेलमध्ये किंवा स्ट्रीट फूड कॉर्नरवर खाल्ले असेल.

नूडल्स चवीला छान लागत असले तरी यात मैद्याचा वापर केला जातो जो आपल्या आरोग्यासाठी चांगला नाही. अशात आज आम्ही तुम्हाला गव्हाच्या पिठापासून पौष्टिक पण चविष्ट असे नूडल्स कसे तयार करायचे याची एक सोपी रेसिपी सांगत आहोत. ही रेसिपी तुमच्या घरातील सर्वांनाच खुश करेल शिवाय फार कमी वेळेत बनून तयार देखील होईल. चला तर मग आता अजिबात वेळ न घालवता जाणून घेऊयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

रेसिपीच्या बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा

साहित्य

  • एक वाटी पिठ
  • मिठ
  • नूडल्स मसाला
  • चिरलेला कांदा
  • तुमच्या आवडीच्या भाज्या (कोबी, शिमला मिरची, कॉर्न, गाजर)
  • शेजवान चटणी
  • तेल
रेसिपीच्या बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा

कृती

  • गव्हाच्या पिठाचे नूडल्स तयार करण्यासाठी सर्वप्रथम परातीत एका वाटी पीठ घ्या
  • यानंतर यात मीठ घाला आणि थोडे थोडे पाणी घालून पीठ व्यवस्थित घट्ट मळून घ्या
  • पीठ मळून झाल्यावर पिठाच्या गोळ्याला हलके तेल लावा
  • यानंतर दोन वाटी पाणी गरम करायला ठेवा
  • आता शेव तयार करण्याचे साचे घ्या आणि यात तयार पिठाचा गोळा टाका
  • आता गॅसवर ठेवलेल्या टोपातील पाणी गरम झाले की थेट यात नूडल्स पाडा
  • हे नूडल्स काही मिनिटे उकळवून घ्या, यावेळी यांना फार हलवू नका नाहीतर नूडल्स तुडतील
  • नूडल्स उकळले की गॅस बंद करा आणि यातील पाणी बाजूला काढून नूडल्स हवेवर ठेवा
  • आता दुसरीकडे गॅसवर कढई ठेवा आणि यात तेल टाका
  • तेल गरम झाले की यात चिरलेला कांदा आणि तुमच्या आवडीच्या भाज्या टाका
  • सर्व भाज्या छान परतून, शिजवून घ्या
  • मग यात शेजवान सॉस आणि बाजारात मिळणारा नूडल्स मसाला टाका
  • तुम्ही यात तुमच्या आवडीचे सॉस देखील टाकू शकता
  • शेवटी तयार नूडल्स यात टाका आणि साहित्यात नीट मिक्स करून झाकण ठेवून 1-2 मिनिटे शिजवून घ्या
  • आता तयार नूडल्स एका प्लेटमध्ये खाण्यासाठी सर्व्ह करा

Web Title: Home made nutritious wheat noodles recipe read in detail

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 24, 2024 | 11:08 AM

Topics:  

  • marathi recipe
  • noodles recipe

संबंधित बातम्या

विना कांदा लसूण नैवेद्यासाठी अशाप्रकारे बनवा रसरशीत बटाट्याची भाजी, चव अशी की सर्वच बोटं चाटतील
1

विना कांदा लसूण नैवेद्यासाठी अशाप्रकारे बनवा रसरशीत बटाट्याची भाजी, चव अशी की सर्वच बोटं चाटतील

Falooda Recipe : घरी कसा बनवायचा थंडगार फालुदा? ही रेसिपी नोट करा, लहान मुले होतील खुश
2

Falooda Recipe : घरी कसा बनवायचा थंडगार फालुदा? ही रेसिपी नोट करा, लहान मुले होतील खुश

Sabudana Papad Recipe : बाजारातून विकत कशाला घ्यायच? घरीच बनवा कुरकुरीत, वर्षभर टिकणारा ‘साबुदाण्याचा पापड’
3

Sabudana Papad Recipe : बाजारातून विकत कशाला घ्यायच? घरीच बनवा कुरकुरीत, वर्षभर टिकणारा ‘साबुदाण्याचा पापड’

Navratri 2026 : नवरात्रीच्या व्रतात काही चटपटीत खायचंय? मग अशाप्रकारे बनवा ‘उपवासाचा बटाटा बडा’
4

Navratri 2026 : नवरात्रीच्या व्रतात काही चटपटीत खायचंय? मग अशाप्रकारे बनवा ‘उपवासाचा बटाटा बडा’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.