विना कांदा लसूण नैवेद्यासाठी अशाप्रकारे बनवा रसरशीत बटाट्याची भाजी, चव अशी की सर्वच बोटं चाटतील
नवरात्रीत कन्यापूजनासाठी सात्त्विक जेवण बनवताना कांदा-लसूण टाळला जातो. अशावेळी बटाट्याची रसरशीत भाजी हा उत्तम पर्याय ठरू शकतो. कमी साहित्यामध्ये चविष्ट भाजी बनवण्यासाठी काही सोप्या टिप्स जाणून घ्या.
विना कांदा लसूण नैवेद्यासाठी अशाप्रकारे बनवा रसरशीत बटाट्याची भाजी, चव अशी की सर्वच बोटं चाटतील
Follow Us
Follow Us:
योग्य मसाल्यांचा वापर करून भाजीला छान चव आणता येते.
टोमॅटोमुळे भाजीला छान रंग आणि आंबटसर चव मिळते.
कन्यापूजनाच्या जेवणात पुरीसोबत ही बटाट्याची भाजी सर्व्ह करू शकता.
नवरात्रीत कन्यापूजन केले जाते, ज्यासाठी कांदा-लसूण यांचा वापर न करता सात्त्विक जेवण बनवण्याची प्रथा असते. आता तुम्हाला वाटेल की, कांदा आणि लसणाशिवाय भाजीला चव कशी लागेल किंवा जेवण बेचव बनेल पण तसं नाहीये. खरंतर योग्य प्रकारे ही डिश बनवल्यास नॉर्मल भाजीहूनही अधिक चवदार ही भाजी बनते. यासाठी फक्त तुम्ही तुम्ही योग्य रेसिपीफॉलो करणे गरजेचे आहे. विना कांदा, लसूण बटाट्याची रसरशीत भाजी कशी करायची हे जर तुम्हाला माहिती नसेल तर आजची बातमी तुमच्या कामाची ठरणार आहे.