Recipe : जेवणाची चव वाढव्यासाठी पापड उत्तम पर्याय ठरतो. नवरात्रीच्या उपवासात तुम्ही साबुदाण्याचे पापड बनवून खाऊ शकता. हे पापड निवडक साहित्यापासून तयार होतात आणि चवीला अप्रतिम लागतात.
जेवणासोबत जर कुरकुरीत पापड दिला गेला तर जेवणाची चव द्विगुणित होते. भारतीय घरांमध्ये जेवणासोबत पापड आवर्जून सर्व्ह केला जातो. आता या पापडाचे अनेक प्रकार पडतात. मेथी पापड, उडदाचे पापड, बटाट्याचे पापड असे अनेक प्रकारचे पापड भारताच्या घराघरांमध्ये बनवले जातात. आज मात्र आपण साबुदाण्याचे कुरुकुरीत पापड कसे तयार करायचे याची एक सोपी रेसिपी जाणून घेणार आहोत. हे पापड जेवणासोबत किंवा उपवासावेळी तेलात कुरकुरीत तळून खाल्ले जातात. नवरात्रीच्या फराळातही तुम्ही या पापडांचे सेवन करु शकता. मुख्य म्हणजे, हे पापड फार झटपट आणि कमी वेळेत तयार करता येतात. तुम्ही एकदाच हे पापड तयार करुन वर्षभर यांना डब्यात साठवून ठेवू शकता. लक्षात घ्या, पापड सुकवण्यासाठी कडक उन्हाची गरज असते ज्यामुळे यांनी सूर्याच्या कडक उन्हातच ४-५ दिवस सुकवा आणि मग डब्यात भरा. या रेसिपीसाठी लागणारे साहित्य आणि कृती जाणून घेऊया.