Navratri 2026 : नवरात्रीच्या व्रतात काही चटपटीत खायचंय? मग अशाप्रकारे बनवा ‘उपवासाचा बटाटा बडा’
Upvas Batata Vada Recipe : नवरात्रीचा उपवास केलाय पण चटपटीत खाण्याची इच्छाही होतेय? मग टेन्शन नाॅट, ही रेसिपी फाॅलो करा आणि घरीच बनवा कुरकुरीत, रुचकर चवीचे उपवासाचे बटाटे वडे. याची रेसिपी आहे फार सोपी.
Navratri 2026 : नवरात्रीच्या व्रतात काही चटपटीत खायचंय? मग अशाप्रकारे बनवा 'उपवासाचा बटाटा बडा'
Follow Us
Follow Us:
नवरात्रीाठी खास रेसिपी.
उपवासाचा टेस्टी पदार्थ.
उपवासाचे बटाटे वडे कसे बनवायचे.
नवरात्रीच्या सणाला आता सुरुवात झाली असून हा सण देशभरात आनंदाने साजरा होत आहे. यानिमित्त देवीच्या ९ रुपांची पूजा केली आहे. देवीची पूजा करत अनेकजण या ९ दिवसांत व्रत-वैकल्य आणि उपवास करु पाहतात. तथापि, उपवासाचे पदार्थ फार मर्यादित असल्याने तेच तेच पदार्थ खाऊन अनेकांना कंटाळा येतो. तुम्हालाही जर उपवासात काहीतरी टेस्टी आणि चटपटीत खाण्याची इच्छा होत असेल तर आपलं मन मारण्याची काही गरज नाही. तुम्ही उपवासात सर्वांच्या आवडीचे बटाटे वडे तयार करु शकता. होय, तुम्ही बरोबर ऐकलंत. बाटाटा वडा पण थोड्या अनोख्या पद्धतीत बनवून तुम्ही उपवासाच्या दिवशीही याचा आनंद लुटु शकता. बाहेरुन कुरकुरीत आणि आतून मऊ चवीचा हा वडा तुमच्या क्रेव्हिंग्स दूर करण्यात आणि तुमच्या तोंडाचे चोचले पुरवण्यास मदत करेल. चला तर मग लगेच या भन्नाट रेसिपीसाठी लागणारे साहित्य आणि कृती जाणून घेऊया.
यासाठी सर्वप्रथम बटाट्यांना पाण्याने चांगलं धुवून घ्या.
बटाट्यांना कुकरमध्ये घालून याच्या साधरण ४-५ शिट्ट्या करा.
बटाटे चांगले उकडले की त्यांना थंड करा आणि बटाट्याच्या साली वेगळी करा.
बटाट्यांना चांगल मॅश करा आणि त्यात सैंधव मीठ, काळी मिरी पूड, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, धणे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घाला.
सर्व साहित्य चांगलं एकजीव करुन मिश्रणाचे गाळे तयार करा.
दुसरीकडे बॅटर तयार करण्यासाठी राजगिऱ्याचे पीठ, सैंधव मीठ, काळी मिरी पूड, पांढरे तीळ आणि बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून थोडं जाडसर पीठ तयार करा.
आता गॅसवर कढई ठेवून त्यात तेल गरम करत ठेवा.
तेल चांगले तापले की, बटाट्यांच्या गोळ्याला बॅटरमध्ये बुडवून हळूवारपणे तेलात सोडा.
मध्यम आचेवर दोन्ही वड्यांना चांगला कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या.
तुमचे उपवासाचे बटाटे वडे तयार आहेत, शेंगदाण्याच्या चटणीसोबत तुम्ही यांना खाण्यासाठी सर्व्ह करु शकता.
Web Title: Navratri 2026 make crispy and tasty upvas batata vada at home nb