Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Recipe: डाळ न भिजवता, अवघ्या काही मिनिटांतच तांदळाच्या पिठापासून तयार करा कुरकुरीत मेदूवडा

तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही डाळ न भिजवताही अवघ्या काही मिनिटांतच तांदळाचे मेदूवडे तयार करू शकता. सकाळच्या घाईगडबडीच्या वेळी नाश्त्यासाठी ही एक परफेक्ट रेसिपी आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Nov 23, 2024 | 03:00 PM
Recipe: डाळ न भिजवता, अवघ्या काही मिनिटांतच तांदळाच्या पिठापासून तयार करा कुरकुरीत मेदूवडा

Recipe: डाळ न भिजवता, अवघ्या काही मिनिटांतच तांदळाच्या पिठापासून तयार करा कुरकुरीत मेदूवडा

Follow Us
Follow Us:

सकाळचा नाश्ता आपल्या आरोग्यासाठी फायद्याचा ठरत असतो, ज्यामुळे सकाळचा नाश्ता कधीही स्किप करू नये. आता नाश्ता म्हटला की, तेच तेच नाश्त्याचे बोरिंग पदार्थ आठवू लागतात. अनेकांना नाश्त्यात साऊथ इंडियन पदार्थ खायला फार आवडतात. यात इडली, मेदुवडा, डोसा या पदार्थांचा समावेश असतो मात्र हे पदार्थ बनवणे इतके सोपे नाही यासाठी तांदूळ, डाळ भिजत घालून याची पेस्ट करून मग हे मिश्रण आंबवावे लागते आणि मग यापासून पदार्थ बनवले जातात. या संपूर्ण प्रक्रियेत बराच वेळ जातो.

तुम्ही चविष्ट आणि झटपट तयार होणार नाश्त्याच्या रेसिपीच्या शोधात असाल तर आजची ही रेसिपी तुमच्या फायद्याची असणार आहे. आज आम्ही तुम्हाला झटपट काही मिनिटांचं मेदुवडा कसा तयार करायचा याची एक सोपी रेसिपी सांगत आहोत. बाहेरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असणारा हा मेदुवडा अनेकांना सकाळच्या नाश्त्यासाठी एक उत्तम पर्याय वाटतो. मात्र यासाठी आदल्या दिवशीच डाळ भिजवून ठेवावी लागते. अशात आज आम्ही तुम्हाला झटपट मेंदू वडा कसा तयार करता येईल याची एक अनोखी रेसिपी सांगत आहोत. हा मेदू वडा तांदळाच्या पिठापासून तयार केला जाईल. तांदळाच्या पिठापासून तयार केलेला हा मेंदू वडा चवीला छान लागतो आणि कमी वेळेत बनून तयार होतो. जाणून घ्या यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

रेसिपीच्या बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा

साहित्य

  • 2 कप तांदळाचे पीठ
  • 3-4 बटाटा
  • 1 चमचा किसलेलं आलं
  • 3-4 हिरव्या मिरच्या
  • तेल
  • मीठ
रेसिपीच्या बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा

कृती

  • तांदळाचा पिठाचा मेदुवडा तयार करण्यासाठी सर्वप्रथम गॅसवर एक मोठे टोप ठेवा
  • यात पाणी टाका आणि या पाण्याला उकळी येऊ द्या
  • पाण्याला उकळी आली की यात तूप आणि मीठ टाका
  • यानंतर यात तांदळाचे पीठ टाका आणि ढवळून झाकून एक वाफ घ्या
  • यानंतर हे तांदळाचे पीठे एका परातीत काढा आणि यात उकडलेला बटाटा, मीठ घालून पीठ मळून घ्या
  • आता तयार पिठाचे मेंदू वडे तयार करा
  • दुसरीकडे गॅसवर एक कढई ठेवा आणि यात तेल टाका
  • तेल गरम झाले की मध्यम आचेवर तयार मेदुवडे छान सोनेरी रंग येईपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या
  • गरमा गरम तांदळाचे वडे एका प्लेटीत काढा
  • तयार मेंदू वडे नारळाची चटणी आणि सांबारासोबत खाण्यासाठी सर्व्ह करा

Web Title: Make instant rice medu vada in just a few minutes make sure to try this easy recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 23, 2024 | 03:00 PM

Topics:  

  • marathi recipe
  • medu vada

संबंधित बातम्या

Ganeshotsav 2026 : गणपती बाप्पाच्या प्रसादात बनवा गोड, मऊ, पारंपारिक गुलगुले, नोट करा रेसिपी
1

Ganeshotsav 2026 : गणपती बाप्पाच्या प्रसादात बनवा गोड, मऊ, पारंपारिक गुलगुले, नोट करा रेसिपी

Raw Banana Kofta : कच्च्या केळीचे कोफ्ते ट्राय केलेत का? शेफने सांगितली राजस्थानची पारंपारिक रेसिपी
2

Raw Banana Kofta : कच्च्या केळीचे कोफ्ते ट्राय केलेत का? शेफने सांगितली राजस्थानची पारंपारिक रेसिपी

Ganeshotsav 2026 : यंदाचा गणेशोत्सव साजरा करा हटके, घरी बनवा दुबई स्टाईल ‘कुनाफा मोदक’, रेसिपी करा नोट
3

Ganeshotsav 2026 : यंदाचा गणेशोत्सव साजरा करा हटके, घरी बनवा दुबई स्टाईल ‘कुनाफा मोदक’, रेसिपी करा नोट

Janmashtami Special: पंचामृत तयार करण्याचा 1:2:4:8:16 फाॅर्म्यूला काय आहे? जाणून घ्या योग्य पद्धत
4

Janmashtami Special: पंचामृत तयार करण्याचा 1:2:4:8:16 फाॅर्म्यूला काय आहे? जाणून घ्या योग्य पद्धत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.