Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mutton Dum Biryani Recipe: नॉनव्हेज लव्हर्ससाठी खास, घरी बनवा चमचमीत मटण दम बिर्याणी 

नॉनव्हेज लव्हर्ससाठी मटण बिर्याणी म्हणजे स्वर्गसुखच! शेफ दीपक गोरे यांनी मटण बिर्याणीची एक खास रेसिपी शेअर केली आहे. या रेसिपीच्या मदतीने तुम्ही घरीच रेस्टॉरंट स्टाईल परफेक्ट मटण दम बिर्याणी बनवू शकता. 

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 01, 2025 | 10:04 AM
Mutton Dum Biryani Recipe: नॉनव्हेज लव्हर्ससाठी खास, घरी बनवा चमचमीत मटण दम बिर्याणी

Mutton Dum Biryani Recipe: नॉनव्हेज लव्हर्ससाठी खास, घरी बनवा चमचमीत मटण दम बिर्याणी

Follow Us
Follow Us:

बिर्याणीचे नाव काढले की सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटते. नॉनव्हेज लव्हर्ससाठी तर बिर्याणी म्हणजे जीव की प्राण. बिर्याणी अनेक वेगवेगळ्या प्रकारे बनवली जाते. आज आम्ही तुमच्यासाठी या लेखात मटण बिर्याणीची एक खास रेसिपी घेऊन आलो आहोत. विकेंडचा दिवस जवळ येऊन ठेपला आहेत अशात तुम्ही या विकेंडला मटण बिर्याणीची ही लज्जतदार बिर्याणी घरी ट्राय करू शकता. याची चव घरातील सर्वांनाच खुश करेल आणि कुटुंबातील सर्वच तुमची प्रशंसा करू लागतील. शेफ दीपक गोरे (इन हाऊस कलिनरी शेफ, टाटा संपन्न , टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट लिमिटेड (TCPL)) यांनी ही रेसिपी शेअर केली आहे. या रेसिपीच्या मदतीने तुम्ही घरीच रेस्टॉरंट स्टाईल मटण बिर्याणी बनवू शकता. चला तर मग लागणारे साहित्य आणि कृती जाणून घेऊया.

उन्हाळ्यासाठी परफेक्ट रेसिपी! लहान मुलांसाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा बनाना चॉकलेट आईस्क्रीम

साहित्य:

  • मटण मॅरिनेशनसाठी:
  • 1 किलो मटण तुकडे
  • 1 कप घट्ट दही
  • 2 टेबलस्पून आले-लसूण पेस्ट
  • 2 हिरव्या मिरच्या (उभ्या चिरलेल्या)
  • टाटा संपन्न 1 टीस्पून हळद
  • टाटा संपन्न 2 टीस्पून लाल तिखट
  • टाटा संपन्न 2 टीस्पून धणे पावडर
  • टाटा संपन्न 1 टीस्पून गरम मसाला
  • 1 टेबलस्पून लिंबाचा रस
  • चवीनुसार टाटा संपन्न मीठ
  • चिरलेली कोथिंबीर आणि पुदिना
  • 3 टेबलस्पून तळलेला कांदा

तांदूळ शिजवण्यासाठी:

  • 2 कप लांब दाण्याचा बासमती तांदूळ (30 मिनिटे भिजवलेला)
  • 1 तेजपत्ता
  • 4-5 लवंगा
  • 3-4 हिरवी वेलची
  • 1 काळी वेलची
  • 1 इंच दालचिनी
  • 8-10 मिरी
  • चवीनुसार टाटा संपन्न मीठ

बिर्याणी बनवण्यासाठी:

  • 4 हिरवी वेलची
  • 4 लवंगा
  • 4 इंच दालचिनी
  • 1 काळी वेलची
  • 2 तेजपत्ते
  • 1 टेबलस्पून शाही जीरं (थोडंसं भाजून जाडसर वाटलेलं)
  • 2 मोठे कांदे (पातळ चिरलेले)
  • 1 कप चिरलेली कोथिंबीर
  • 1 कप चिरलेला पुदिना
  • 4 हिरव्या मिरच्या (उभ्या चिरलेल्या)
  • ½ टीस्पून केशर (¼ कप गरम दुधात भिजवलेले)
  • 4 टेबलस्पून साजूक तूप
  • 2 टेबलस्पून तेल
  • 1 कप तळलेला कांदा (बिरिस्ता)
  • ¼ कप दूध
  • काही थेंब गुलाब पाणी
  • काही थेंब केवडा पाणी (ऐच्छिक)

कृती:

Recipe: विकेंडला घरीच बनवा रेस्टाॅरंट स्टाइल ‘पनीर दो प्याजा’; चव अशी की घरातील सर्वच होतील खुश

मटण मॅरिनेशन:

  • मटण स्वच्छ धुवून पाणी पूर्ण निथळून घ्या.
  • एका मोठ्या भांड्यात मटण, दही, आले-लसूण पेस्ट, हिरव्या मिरच्या, हळद, तिखट, धणे पावडर, गरम मसाला,
  • लिंबाचा रस आणि मीठ घाला
  • त्यात चिरलेली कोथिंबीर, पुदिना आणि 3 टेबलस्पून तळलेला कांदा मिसळा
  • सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून मटणला मॅरिनेट करून ठेवा
  • झाकण ठेवा आणि किमान २ तास, शक्य झाल्यास रात्रभर फ्रिजमध्ये ठेवा

 तांदूळ शिजवणे:

  • मोठ्या भांड्यात भरपूर पाणी उकळा. त्यात तेजपत्ता, लवंगा, वेलची, दालचिनी, मिरी आणि मीठ घाला.
  • भिजवलेला तांदूळ त्यात टाका आणि तो७०% शिजेपर्यंतउकळा (त्यात अजून किंचित घट्टपणा राहायला हवा).
  • तांदूळ गाळून मोठ्या ताटात थोडा गार करायला ठेवा.

 बिर्याणी तयार करणे:

  • जाड बुडाच्या मोठ्या भांड्यात तूप आणि तेल गरम करा.
  • त्यात वाटलेलं शाही जीरं आणि बाकी गरम मसाले टाका आणि सुगंध येईपर्यंत परता.
  • चिरलेला कांदा घाला आणि तोसोनेरी आणि कुरकुरीतहोईपर्यंत तळा. निम्मा कांदा बाजूला काढून ठेवा.
  • त्याच भांड्यात मॅरिनेट केलेलं मटण घालून ७-८ मिनिटं मध्यम आचेवर परता.

 बिर्याणीचे थर देणे:

  • मटणाच्या मिश्रणावरअर्धा शिजवलेला तांदूळनीट पसरवा.
  • त्यावर तळलेला कांदा, चिरलेली कोथिंबीर आणि पुदिना शिंपडा.
  • थोडंसं केशर दुध, गुलाब पाणी आणि केवडा पाणी टाका.
  • उरलेला तांदूळ त्यावर घाला आणि पुन्हा कांदा, कोथिंबीर, पुदिना, केशर दुध, गुलाब पाणी आणि केवडा पाणी टाका.
  • शेवटी, वरून उरलेलं तूप ओता.

दम प्रक्रिया:

  • भांड्याचं झाकण घट्ट बंद करा. झाकण नीट सील करण्यासाठी कणकेचा गोळा लावू शकता.
  • ३०-३५ मिनिटं मंद आचेवर शिजवा. तळाला जळू नये म्हणून भांड्याखाली तवा ठेवा.
  • शिजल्यावर १० मिनिटं तसेच ठेवून द्या आणि मग झाकण उघडा.

 सर्व्हिंग:

  • हळूवारपणे मिक्स करा, जेणेकरून प्रत्येक थराचा स्वाद मिसळेल.
  • रायता, मिरचीचे सालन किंवा ताज्या कोशिंबिरीसोबतगरमागरम सर्व्ह करा.
  • चवदार आणि सुगंधी मटण दम बिर्याणीचा आस्वाद घ्या!

Web Title: Make restaurant style tasty mutton dum biryani at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 27, 2025 | 03:48 PM

Topics:  

  • dum biryani
  • food recipe
  • marathi recipe

संबंधित बातम्या

नागपंचमीच्या नैवेद्यासाठी बनवा मराठमोळे पारंपरिक पदार्थ! सणाचा आनंद होईल द्विगुणित
1

नागपंचमीच्या नैवेद्यासाठी बनवा मराठमोळे पारंपरिक पदार्थ! सणाचा आनंद होईल द्विगुणित

श्रावणातील सणांचा आनंद आणि गोडवा वाढवण्यासाठी झटपट बनवा रवा बेसन बर्फी, जिभेवर रेंगाळत राहील पदार्थाची चव
2

श्रावणातील सणांचा आनंद आणि गोडवा वाढवण्यासाठी झटपट बनवा रवा बेसन बर्फी, जिभेवर रेंगाळत राहील पदार्थाची चव

Recipe : मंचुरियन चिली नाही यावेळी बनवा फ्लाॅवर चिली, रेसिपी नोट करा
3

Recipe : मंचुरियन चिली नाही यावेळी बनवा फ्लाॅवर चिली, रेसिपी नोट करा

चणा डाळ पटकन शिजवायचा असेल तर फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स! स्वयंपाकघरातील काम होतील झटपट
4

चणा डाळ पटकन शिजवायचा असेल तर फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स! स्वयंपाकघरातील काम होतील झटपट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.