फोटो सौजन्य - social media
दक्षिण भारतातील चित्रपट असो वा खाद्यपदार्थ दोघांचे चाहते जगभरात आहेत. इडली, मेंदूवडा, रसम, सांबर म्हणजे नाव ऐकताच जिभेला चटक लागते. तोंडाला पाणी सुटत. दाक्षिणात्य संस्कृतीत जेवणात नारळाचा तसेच तांदळाचा वापर जास्त केला जातो. तसेच त्यांच्या प्रत्येक पदार्थांचा क्रेझ संपूर्ण भारतभर आहे. पूर्वीच्या काळी फक्त दक्षिण भारतीयांचा मानला जाणारा प्रसिद्ध नास्ता इडली तर आता हळूहळू पूर्ण भारतीयांचा नास्ता बनत चालला आहे. काही ठिकाणी तर आता, लोक जेवणात पण इडली खायला लागले आहेत. बघता बघता त्या इडलीच्या अनेक व्हरायट्या यायला सुरु झाल्या. चॉकलेट इडली, चिकन इडली, पनीर इडली असे असंख्य व्हरायट्या इडलीच्या येत आहेत. एकंदरीत, लोकं भेटेल तो खाद्यपदार्थ बिचार्या इडलीत भारत आहेत. खव्वयांच्या प्रतिक्रिया पण वेगवेगळ्या आहेत. कारण कुणाला ते आवडत आहे तर कुणाला नाही. पण लोकं असे वेगवगळे उद्योग करायचे काय थांबत नाही आहेत.
इंस्टाग्रामवर फूड पंडित नावाच्या एका हॅन्डलने एक व्हिडियो पोस्ट केला आहे, ज्यात एक डोसा विक्रेता डोसा बनवताना दिसत आहे. आता तुम्ही म्हणाल यात नवल काय? नवल हेच कि तो डोसा विक्रेता साधा डोसा किंवा मसाला डोसा बनवत नसून चक्क गुलाबजामचा डोसा बनवत आहे. जर तुम्हालाही या पठ्ट्याचा पराक्रमाची चव घ्यायची असेल तर या पठ्ट्याची नक्कीच भेट घ्या. त्याच्याकडून रेसिपी घेऊन स्वतःच्या रिस्कवर घरातल्यांना हा नवीन पदार्थ नक्कीच खाऊ घाला.
या इंस्टग्राम पोस्टखाली अनेक खव्वयांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. एक म्हणतो कि, “असा डोसा बनवताना भावा देवाची पण भीती नाही वाटली का?” तर दुसरा देवाकडे स्वतःला वर बोलवून घेण्याचं साखडच देवाला घालतोय. अशा अनेक प्रतिक्रिया तुम्हाला खालील व्हिडियोच्या कमेंट सेक्शनमध्ये पाहायला मिळेल. तर नक्की वाचा आणि पोटभर हसा….