Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

थंडीत कोलेस्ट्रॉल वाढले आहे का? न्यूट्रोशनिस्टने सांगितले 3 भाज्यांचे सेवन जे कोणत्या औषधाहून कमी नाही

How To Lower Cholestrol : हिवाळ्यात वाढणारे बॅड कोलेस्ट्रॉल हृदयासाठी धोकादायक ठरू शकते. मात्र काही हंगामी आणि नैसर्गिक पदार्थांच्या मदतीने ही पातळी सहज नियंत्रणात ठेवता येते. हे कोणते पदार्थ आहेत ते जाणून घ्या.

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 30, 2025 | 08:15 PM
थंडीत कोलेस्ट्रॉल वाढले आहे का? न्यूट्रोशनिस्टने सांगितले 3 भाज्यांचे सेवन जे कोणत्या औषधाहून कमी नाही

थंडीत कोलेस्ट्रॉल वाढले आहे का? न्यूट्रोशनिस्टने सांगितले 3 भाज्यांचे सेवन जे कोणत्या औषधाहून कमी नाही

Follow Us
Close
Follow Us:
  • हिवाळ्यात शरीरात वाईट कोलेस्ट्रॉलचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढते.
  • नैसर्गिक फायबर आणि सॅपोनिनमुळे वाईट कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते.
  • काही नैसर्गिक पदार्थांचे सेवन करून वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करता येते.
मागील काही काळापासून हृदयाच्या समस्या फार वेगाने वाढत चालल्या आहेत. यामागचं मूळ कारण म्हणजे शरीरात वाढत असलेले कोलेस्ट्रॉल. कोलेस्ट्रॉल हा मेणासारखा पदार्थ आहे जो शरीरात साचत जातो. शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण पेशी तयार करण्यासाठी, हार्मोन्स आणि व्हिटॅमिन डी बनवण्यासाठी आवश्यक आहे पण याचे जास्तीचे प्रमाण अनेक आजारांना आमंत्रण देते. शरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहणे फार महत्त्वाचे आहे.चुकीच्या खाण्याच्या सवयी आणि जीवनशैलीमुळे शरीरात वाईट कोलेस्ट्रॉलचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढते, ज्यामुळे हृदयविकारासारख्या गंभीर आजारांचा धोका वाढतो.

आजीबाईच्या बटव्यातील गुणकारी उपाय! पांढरे केस काळे करण्यासाठी मेहेंदीमध्ये मिक्स करा ‘हे’ पदार्थ, केसांना मिळेल लाल- बर्गंडी रंग

ही समस्या हिवाळ्यात जास्त वाढते कारण याकाळात शारीरिक हालचाली लक्षणीयरीत्या कमी होतात, लोक गोड आणि तळलेले पदार्थ जास्त पसंत करतात ज्यामुळे शरीरात चरबी साठू लागते. या सर्वांमुळे कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते. आपण काही हेल्दी पदार्थांचे सेवन करून शरीरात वाढलेल्या कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करू शकता. क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट ख्याती पटेल यांनी एका इंस्टाग्राम पोस्टद्वारे अशा हिवाळ्यातील पदार्थांची यादी शेअर केली जे शरीरात वाढणाऱ्या कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात करण्यास मदत करतात.

हिवाळ्यात मेथी खा

हिवाळ्यात अनेक भाज्या स्वस्त होतात. या हंगामी भाज्यांचे सेवन शरीराला अनेक फायदे मिळवून देते. हिवाळ्यात जर तुम्ही मेथीचे सेवन केले तर ते शरीरात साठलेल्या कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास तुमची मदत करेल. मेथीमध्ये नैसर्गिक विरघळणारे फायबर असते, जे तुमच्या आतड्यांमधील पित्ताशी बांधले जाते, ज्यामुळे ते साठवलेल्या कोलेस्टेरॉलपासून पित्त आम्ल तयार करते. यामुळे तुमचे वाईट कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी होते. मेथीमध्ये सॅपोनिन नावाचे एक संयुग देखील असते, जे तुम्ही खाल्लेल्या पदार्थांमधून कोलेस्टेरॉलचे शोषण कमी करते. रोजच्या आहारात तुम्ही मेथीपासून अनेक पदार्थ बनवून खाऊ शकता जसे की, मेथी पराठा, लसूणी मेथीची भाजी आणि मेथी कढी.

हिरवा लसूण

पोषणतज्ज्ञांच्या मते, हिरवा लसूण हिवाळ्यातील एक असे सुपरफूड आहे ज्याविषयी अनेकांना फारशी माहिती नाही. जेव्हा तुम्ही हिरवा लसूण सोलता किंवा चिरता तेव्हा ते अलिसिन नावाचे संयुग सोडते. हे तुमच्या शरीरात स्टॅटिन औषधे ज्या एन्झाइमला लक्ष्य करतात त्याच एन्झाइमला लक्ष्य करते. हे शरीरात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करण्यास मदत करते. यामुळे धमन्या ब्लॉक करू शकणारे ऑक्सिडाइज्ड एलडीएलचे प्रमाण देखील कमी होते. तुम्ही सॅलड किंवा भाज्यांमध्ये याचा समावेश करू शकता.

वाढत्या वयात शरीरातील अवयव होतात म्हतारे! जाणून घ्या कोणत्या अवयवांची क्षमता वयासोबत कमी होऊन जाते

आवळा तुमच्या आहाराचा एक भाग बनवा.

आवळ्याची ख्याती जुन्या काळापासून प्रसिद्ध आहे. आवळ्यातील पोषकघटक शरीराच्या अनेक समस्यांना दूर करण्यास आपली मदत करते आणि यातीलच एक म्हणजे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करणे. आवळा अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध आहे, जे लिव्हरमधील खराब कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास आणि ट्रायग्लिसराइडची पातळी कमी करण्यास मदत करते. तुम्ही तुमच्या आहारात आवळ्याची भाजी, लोणचे, रस आणि सॅलड समाविष्ट करू शकता.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. 

Web Title: Foods that reduce bad cholesterol in winter lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 30, 2025 | 08:15 PM

Topics:  

  • Bad Cholesterol
  • lifestyle news
  • Winter Care

संबंधित बातम्या

भारतात वाढत चाललाय कलरफूल आहाराचा ट्रेंड; वेगवेगळ्या रंगांच्या फळ-भाज्यांमुळे शरीराला मिळतात अनेक फायदे
1

भारतात वाढत चाललाय कलरफूल आहाराचा ट्रेंड; वेगवेगळ्या रंगांच्या फळ-भाज्यांमुळे शरीराला मिळतात अनेक फायदे

Toxic Relationship मधून बाहेर पडायला त्रास होतोय का? 5 मंत्र फॉलो कराच, आरामात व्हाल Move On, येणार नाही Ex ची आठवण
2

Toxic Relationship मधून बाहेर पडायला त्रास होतोय का? 5 मंत्र फॉलो कराच, आरामात व्हाल Move On, येणार नाही Ex ची आठवण

वाढत्या थंडीत रोज अंघोळ करावी का? रिसर्चमध्ये करण्यात आला आश्चर्यकारक खुलासा, कारण वाचून व्हाल आनंदी
3

वाढत्या थंडीत रोज अंघोळ करावी का? रिसर्चमध्ये करण्यात आला आश्चर्यकारक खुलासा, कारण वाचून व्हाल आनंदी

थंडीत Heart Attack चा धोका का वाढतो? हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून अशी घ्या शरीराची काळजी
4

थंडीत Heart Attack चा धोका का वाढतो? हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून अशी घ्या शरीराची काळजी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.