Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाढत्या Sinusitis च्या ५०% रुग्णांसाठी कामाची जागा कारणीभूत, लक्षणे आणि उपाय

थंड आणि कोरड्या एसी ऑफिसपासून ते धुळीने भरलेल्या कामाच्या ठिकाणांपर्यंत बदलत्या कामाच्या वातावरणामुळे शहरांमध्ये सायनसायटिसचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. डॉक्टरांचा सल्ला घ्या जाणून

  • By दिपाली नाफडे
Updated On: Dec 24, 2025 | 01:41 PM
सायनसायटिस आजार काय आहे (फोटो सौजन्य - iStock)

सायनसायटिस आजार काय आहे (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Close
Follow Us:
  • दर महिन्याला २०-५० वयोगटातील १० पैकी ५ पुरुष रुग्ण 
  • चेहऱ्यावरील वेदना/दाब, डोकेदुखी, दाट नाकातील स्त्राव, वास कमी होणे आणि खोकला अशा सायुनसायटिसशी संबंधित लक्षणांसह येतात
  • काय आहेत उपाय 
नोकरी करणाऱ्या लोकांमध्ये सायनसायटिसचे प्रमाण वाढत असून, यामागे कामाची जागा हे मोठे कारण असल्याचे डॉक्टर सांगतात. अनेक जण बंद आणि एसी असलेल्या ऑफिसमध्ये तासन्‌तास बसून काम करतात, तर काही जण धूळ, रसायने, धूर किंवा बांधकामाच्या ठिकाणी काम करतात. यामुळे नाकातील आतली त्वचा चिडचिडी होते आणि सायनसचा संसर्ग होण्याची शक्यता वाढते. डोकेदुखी, नाक बंद होणे, वारंवार सर्दी अशी लक्षणे दिसत आहेत. त्यामुळे तज्ज्ञांनी काही सोप्या सवयी अंगीकारण्याचा सल्ला दिला आहे, थेट एसीखाली बसू नका, धूळ व प्रदूषणापासून दूर राहा, नाक मीठाच्या पाण्याने धुवा, वाफ घ्या आणि गरम पाण्याचा शेक करा. भरपूर पाणी प्या, विश्रांती घ्या, पौष्टिक आहार घ्या आणि डॉक्टर सांगतील ती औषधे घ्या.

सतत डोळे आणि डोके दुखत असल तर त्या मागील कारण जाणून घ्या…

सायनसायटिस म्हणजे काय?

सायनसायटिस म्हणजे नाकाच्या आजूबाजूच्या पोकळ्या (सायनस) सुजणे आणि बंद होणे. संसर्ग, अ‍ॅलर्जी किंवा प्रदूषणामुळे या पोकळ्यांमध्ये कफ साचतो आणि त्रास होतो. याची कारणे म्हणजे सर्दी-खोकला, अ‍ॅलर्जी, धूळ-धूर, अचानक तापमान बदल किंवा नाकाच्या रचनेतील दोष. नाक कोंदणे, चेहऱ्यावर दुखणे, डोकेदुखी, दाट सर्दी, वास येणे कमी होणे, खोकला आणि थकवा ही याची सामान्य लक्षणे आहेत.

काय सांगतात डॉक्टर 

पुण्यातील अपोलो स्पेक्ट्रा रूग्णालयातील ईएनटी तज्ज्ञ डॉं. सुश्रुत देशमुख म्हणाले, “सध्या एअर कंडिशनरमधील थंड हवा नाकातील मार्ग कोरडे करते, त्यामुळे ते संसर्गासाठी अधिक संवेदनशील होतात. नीट स्वच्छ न केलेल्या व्हेंट्समधून धूळ, बुरशीचे बीजाणू व सूक्ष्मजीव पसरू शकतात. बाहेरील उष्णता आणि आतल्या थंड वातावरणातील सततचा बदल सायनसेसना चिडचिडा बनवतो व वारंवार सूज निर्माण करतो. बांधकाम, उत्पादन, वेअरहाऊस किंवा रस्त्यालगतच्या भागात काम करणाऱ्यांना धूळ, सिमेंट पावडर, रसायने व प्रदूषित हवेचा सातत्याने संपर्क येतो. योग्य संरक्षण न वापरल्यास हे त्रासदायक घटक थेट सायनसच्या आवरणाला सूज आणतात आणि दीर्घकालीन लक्षणे निर्माण होतात. सुमारे ५०% सायनसायटिस प्रकरणे कामाच्या ठिकाणामुळे उद्भवत आहेत. दर महिन्याला २०-५० वयोगटातील १० पैकी ५ पुरुष रुग्ण चेहऱ्यावरील वेदना/दाब, डोकेदुखी, दाट नाकातील स्त्राव, वास कमी होणे व खोकला अशा सायनसायटिसशी संबंधित लक्षणांसह येतात.”

डोकेदुखीचे सुद्धा असतात प्रकार, यातूनच मिळतात वेगवेगळ्या आजरांचे चिन्ह

काय आहेत उपाय 

डॉ. देशमुख पुढे म्हणाले,* “रुग्णांची तपासणी करून गरज असल्यास नाकाची एंडोस्कोपी किंवा सीटी स्कॅन केला जातो आणि उपचार दिले जातात. सायनसायटिस टाळण्यासाठी आणि नियंत्रणात ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या, वाफ घ्या, गरम शेक करा, धूम्रपान-मद्यपान टाळा, अ‍ॅलर्जी नियंत्रणात ठेवा, डॉक्टरांनी सांगितलेली औषधे घ्या आणि पुरेशी विश्रांती घ्या. एसी ऑफिसमध्ये काम करणाऱ्यांनी एसीची नियमित साफसफाई करावी आणि थेट थंड हवेच्या खाली बसू नये. आपली लाइफस्टाईल जपावी, धुळीच्या ठिकाणी काम करणाऱ्यांनी मास्क वापरावा आणि कामानंतर चेहरा व नाक स्वच्छ धुवावे. 10 दिवसांपेक्षा जास्त काळ त्रास असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.”

Web Title: For 50 percent of patients with increasing sinusitis the workplace is the cause symptoms and remedies

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 24, 2025 | 01:41 PM

Topics:  

  • Health Tips
  • lifestyle news

संबंधित बातम्या

Christmas 2025 : ख्रिसमसला मुलांच्या चेहऱ्यावर हसू फुलवायचंय? मग त्यांना गिफ्ट करा या खास भेटवस्तू
1

Christmas 2025 : ख्रिसमसला मुलांच्या चेहऱ्यावर हसू फुलवायचंय? मग त्यांना गिफ्ट करा या खास भेटवस्तू

सांता जाड नव्हताच! लाल कपडे, रेनडिअर आणि भेटवस्तू… जाणून घ्या सांताक्लॉज कसा बनला ‘ख्रिसमसचा राजा’
2

सांता जाड नव्हताच! लाल कपडे, रेनडिअर आणि भेटवस्तू… जाणून घ्या सांताक्लॉज कसा बनला ‘ख्रिसमसचा राजा’

Christmas 2025 : अंकांचा अनोखा योग! शतकातून एकदाच येणाऱ्या तारखेमुळे यंदाचा ख्रिसमस ठरतोय खास
3

Christmas 2025 : अंकांचा अनोखा योग! शतकातून एकदाच येणाऱ्या तारखेमुळे यंदाचा ख्रिसमस ठरतोय खास

वैद्यकीय विश्वालाही आव्हान! छत्तीसगढमधील 14 वर्षांच्या मुलीचं शरीर बनत चाललंय दगड, या दुर्मिळ रोगाचं नक्की नाव काय?
4

वैद्यकीय विश्वालाही आव्हान! छत्तीसगढमधील 14 वर्षांच्या मुलीचं शरीर बनत चाललंय दगड, या दुर्मिळ रोगाचं नक्की नाव काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.