फोटो सौजन्य: iStock
आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक जणांना डोकेदुखी होत असते. अशावेळी अनेक जण डोकेदुखीला दुर्लक्ष करतात आणि आपल्या कामाकडे लक्ष देत असतात. मात्र हीच डोकेदुखी जर झपाट्याने वाढताना दिसत असेल किंवा वारंवार होत असेल तर मग याकडे दुर्लक्ष करणे तुमच्याच अंगलट येऊ शकते. यामुळे तुमच्या कामावर तर परिणाम होईलच पण यासोबतच आरोग्यावर सुद्धा परिणाम होईल.
या धावपळीच्या जीवनात आपण डोकेदुखीला सामान्य मानू लागतो. पण प्रत्यक्षात असे करू नये, कारण या डोकेदुखीमुळे अनेक आजार आपल्याला घेरू शकतात. जर आपण वेळीच त्याबद्दल जाणून घेतले तर आपण गंभीर आजारांपासून आपला बचाव करू शकतो.
पॅसिव्ह स्मोकिंग ठरतेय धोकादायक, धुम्रपान न करणाऱ्यांनाही फुफ्फुसाच्या कर्करोगाचा धोका
ब्रेन ट्यूमर: त्याच ठिकाणी वारंवार वेदना होणे, जी कालांतराने तीव्र होत जाते. अशावेळी पेनकिलर सारख्या औषधांनीही हि वेदना थांबत नाही, तर मग हे ब्रेन ट्यूमरचे लक्षण असू शकते.
मायग्रेन: जर तुम्हाला डोकेदुखीसोबत मळमळ, तीव्र प्रकाशामुळे चिडचिड किंवा अंधुक दृष्टी जाणवत असेल तर हे मायग्रेन असू शकते. हा एक न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे, ज्यामध्ये औषधांसोबत लाइफस्टाइल मेनेजमेंट आवश्यक आहे.
सायनस इन्फेक्शन: डोकेदुखीसोबत नाक बंद होणे, चेहऱ्यावर जडपणा आणि कपाळावर दाब येणे हे सायनस इन्फेक्शनचे लक्षण असू शकते.
डोळ्यांच्या समस्या: डोळ्यांचे आजार किंवा डोळ्यांचा थकवा यामुळे डोकेदुखी होऊ शकते.
काही जणांना अपूर्ण झोपेमुळे डोकेदुखी सुरु होते जी कालांतराने थांबते सुद्धा. मात्र दररोज डोकेदुखी कधी होते? या प्रश्नाचे उत्तर जाणून घेणे महत्वाचे आहे.
वाढलेले वजन कमी करण्यासाठी संध्याकाळच्या नाश्त्यात बनवा हाय प्रोटीन सॅलड, नोट करून घ्या रेसिपी
जेव्हा सकाळी उठताच वेदना तीव्र होतात, जेव्हा वेदनांसोबत मळमळ, अंधुक दृष्टी किंवा अशक्तपणाची भावना असते, आणि जेव्हा औषध घेतल्यानंतरही वेदना कायम राहते अशावेळी समजून जावा की तुम्हाला दररोज डोकेदुखी जाणवत आहे.
डोकेदुखीला क्षुल्लक समजणे ही एक मोठी चूक ठरू शकते. शरीराची धोक्याची सूचना तुम्ही ऐकली पाहिजे. जर तुम्ही वेळीच लक्ष दिले तर तुम्ही अनेक गंभीर आजार टाळू शकता. पुढच्या वेळी तुम्हाला हलकी डोकेदुखी देखील झाली तर त्याकडे दुर्लक्ष करू नका, कारण कधीकधी एक छोटीशी खूण सर्वात मोठा धोका निर्माण करू शकते.