
फ्रॅक्चर झालंय? मग आहाराकडे लक्ष द्या! हाडं लवकर जोडण्यासाठी ‘हे’ घरगुती पदार्थ ठरतील रामबाण
संतुलित आहार
जेवणात भरपूर कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि पोटॅशियमचा समावेश करावा. कारण यामुळे हाडांची झालेली झीज भरून निघते आणि स्नायू बळकट होतात.
कॅफिनयुक्त पेय टाळा
सोडायुक्त कॅफिनयुक्त पेय पदार्थाचे सेवन करू नये, कारण यामुळे रिकव्हरी होण्यास वेळ लागेल.
वजनदार सामान न उचलणे
वजनदार सामान उचलू नये, यामुळे फॅक्चर बोनवर अनावश्यक भार पडती आणि पीडिताची समस्या आणखी वाढू शकते.
पालेभाज्यांचे सेवन
कोणत्याही प्रकारच्या पालेभाज्यांमध्ये आणि ब्रोकलीमध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असते.
अंजीर खा
अंजीर हे सुकामेव्यात टेस्ट असण्यासोबतच अनेक गुणांनी युक्त असते. यामध्ये कॅल्शियम आणि आयरन अधिक प्रमाणात असते. सोबतच फायबरसुध्दा असते.
भेंडीचे सेवन करा
एक वाटी भेंडी खाल्ल्याने तुम्हाला 40 ग्राम कॅल्शियम मिळेल, जर तुम्ही आठवड्यातुन दोन वेळा भेंडी खाल्ली तर यामुळे तुमचे दात निरोगी राहतील,
हे खाल्लायने फायबर आणि कॅल्शियम दोन्हीही मिळते.
सारडाईन मासा
सारडाईन एक समुद्रातील मासा आहे. ज्यामध्ये ३३ टक्के कॅल्शियम असते. आठवड्यातून १ वेळा हे अवश्य खा.
बदामाचे दूध
बदामाचे दूध आणि बदामामध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असते. सोबतच यामध्ये अन्य पोषकतत्त्वही उपलब्ध – असते.
आंबट फळे
ज्या आंबट फळांमध्ये सिट्रस एसिड असते, त्यामध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन उपलब्ध असते. तुम्ही इम्युनिटी वाढवण्यासाठी आणि आजारांना दूर ठेवण्यासाठी संत्री आणि लिंबूचे सेवन आठवड्यातुन दोनदा अवश्य करावे.
तिळाचे सेवन
एक चमचा तिळामध्ये एक ग्लास दूधा येवढे कॅल्शियम असते. तुम्ही रोज एक चमचाभर तीळ खाऊ शकता किंवा तिळाचे लाडू बनवून त्याचे सेवन करू शकता.
चीजचे सेवन करा
प्रत्येक प्रकारची चीज मग ती, मरमेसन असो वा मॉजरेला किंवा शैड्डर, यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते.
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.