'ही' घरगुती दंतमंजन दातांच्या समस्यांपासून कायमचा मिळवून देईल आराम
दातांचे आरोग्य कायमच चांगले आणि निरोगी असणे फार आवश्यक आहे. कारण त्वचेच्या सौंदर्य खुलून दिसण्यासाठी स्मित आणि सुंदर हास्य मदत करते. पण बऱ्याचदा कामाच्या धावपळीमध्ये आरोग्यासोबतच दातांच्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी जास्तीचा वेळ मिळत नाही. दातांवर वाढलेला पिवळेपणा, कुजलेले किंवा किडलेले दात, दातांना कीड लागणे, हिरड्यांमध्ये वाढलेल्या वेदना इत्यादी बऱ्याच समस्या उद्भवू लागतात. याशिवाय हिरड्यांतून रक्त येणे, दुर्गंधी, दातांची संवेदनशीलता इत्यादी समस्या लहान वयातच उद्भवतात. त्यामुळे दातांच्या आरोग्याकडे व्यवस्थित लक्ष देणे फार गरजेचे आहे. दात पांढरेशुभ्र व स्वच्छ दिसावे यासाठी अनेक वेगवेगळे उपाय केले जातात. कधी टूथपेस्ट बदलली जाते तर कधी बाजारात उपलब्ध असलेल्या माऊथ फ्रेशनचा वापर केला जातो.(फोटो सौजन्य – istock)
चमचाभर तांदळाचा वापर करून घरीच तयार करा महागडी क्रीम, हिवाळ्यातही राहील सुंदर आणि चमकदार त्वचा
वारंवार केमिकलयुक्त टूथपेस्टचा वापर केल्यामुळे दातांच्या वरील कवच खूप जास्त घासले जाते आणि दात कमकुवत होतात. हिरड्यांमधून रक्त येण्यास सुरुवात झाल्यानंतर हळूहळू दातांच्या समस्या आणखीनच वाढत जातात. त्यामुळे दात स्वच्छ करण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या केमिकल युक्त टूथपेस्टचा वापर करण्याऐवजी घरगुती दंतमंजन वापरावे. औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेल्या पदार्थांचा वापर केल्यास तोंडात वाढलेले जंतू नष्ट होतात आणि दात स्वच्छ होण्यास मदत होते. तोंडाच्या दुर्गंधीपासून आराम मिळवण्यासाठी घरगुती पदार्थांचा वापर करून बनवलेल्या दंतमंजनाचा वापर करावा. यामुळे दात पांढरेशुभ्र दिसतील.
लवंग काड्या आणि सैंधव मिठाचा वापर केल्यामुळे हिरड्यांना आलेली सूज कमी होते. याशिवाय हिरड्यांमधून येणाऱ्या दुर्गंधीपासून आराम मिळवण्यासाठी दंतमंजचा वापर करावा. दातांवर साचून राहिलेला पिवळा थर कमी करण्यासाठी तुरटी आणि मीठ फायदेशीर ठरते. यामुळे डाग निघून जातात. दातांवरील चमक वाढवण्यासाठी कायमच घरगुती आणि आयुर्वेदिक पदार्थांपासून बनवलेल्या दंतमंजनाचा वापर करावा.






