
प्रोटीनच्या नावाखाली तुम्हीही विषाचे तर सेवन करत नाही? FSSAI ने बॅन केलेले अॅनालॉग पनीर नक्की काय आहे ते जाणून घ्या
काय आहे अॅनालॉग पनीर?
बाजारात पनीरची वाढती मागणी पाहता एक दूसरा ऑप्शन तयार करण्यात आला ज्याला अॅनालॉग पनीरच्या नावाने ओळखले जाते. पारंपारिक पनीर शुद्ध रुपात दूधापासून तयार केला जातो पण अॅनालॉग पनीर हा मिल्क सॉलिड्स, व्हेजिटेबल ऑईल आणि स्टेबलाइजर्सपासून तयार केला जातो. हा दिसायला हुबेहुब सामान्य पनीरसारखाच दिसतो. याला स्पर्श केल्यावरही सामान्य पनीरचाच भास होतो पण आरोग्यासाठी मात्र तो नुकसानकारक ठरत असतो. यामुळेच या पनीरवर बॅन लावण्यात आला आहे.
अॅनालॉग पनीर कसे तयार केले जाते?
अॅनालॉग पनीर बनवण्यासाठी स्किम्ड मिल्क पावडर, पाम तेलासारखी स्वस्त वनस्पतीजन्य चरबी, स्टार्च, इमल्सिफायर आणि प्रोसेसिंग सॉल्ट्सचा वापर केला जातो. या सर्वांना एकत्रित मिसळून यापासून एक पेस्ट तयार केली जाते. थर्मल प्रोसेसिंगच्या मदतीने याला स्टेबल केले जाते. यातील साहित्य आणि बनवण्याची अल्ट्रा प्रोसेस्ड पद्धत यामुळे हा पनीर जास्त घातक मानला जातो. या पनीरमध्ये पोषक घटकांचा साठा फार कमी असतो आणि सोडियमची मात्रा यात फार जास्त असते.
अॅनालॉग पनीरचा आरोग्यावर काय परिणाम होतो?
खराब पद्धतीतीचे व्हेजीटेबल ऑईल शरीरात अनहेल्दी फॅट्सचे प्रमाण वाढवतात ज्यामुळे कोलेस्ट्रॉल आणि हृदयविकाराची समस्या उद्भवू शकते. यामुळे आजारांचा धोका दुपटीने वाढतो. यासोबतच यात आढळणारे इमल्सिफायिंग सॉल्ट्स आणि अॅडिटिव्स शरीरात सोडियमचे प्रमाण वाढवतात ज्यामुळे हाय ब्लड प्रेशरचा धोका भरपूर वाढत असतो.
महादेवाला प्रिय… घरी बेलपत्राचं झाड कसं लावायचं? जाणून घ्या सोपी आणि योग्य पद्धत
अॅनालॉग पनीरची ओळख कशी करावी?
पनीर खरेदी करताना नेहमी त्यावरील लेबल चेक करत जा. जर लेबलमध्ये व्हेजिटेबल ऑईल किंवा इमल्सीफायर लिहिले असेल तर समजून जा की ते अॅनालॉग पनीर आहे. हा पनीर सहजरित्या तुटत नाही. शुद्ध पनीर हलक्या दाबामुळेही लगेच तुटतो किंवा त्याचा चुरा होतो. पण अॅनालॉग पनीर काहीसा रबरासारखा असतो. पनीर खरेदी करताना नेहमी चांगल्या ब्रँडचा पनीर खरेदी करा.