'थ्री-डी मॉडेल'वरच होणार कर्करोग संशोधन? 'टूडी' आता पडणार मागे; आयआयटी मुंबईच्या अभ्यासातून नवी दिशा
कर्करोगावरील संशोधनासाठी आतापर्यंत प्रामुख्याने वापरल्या जाणाऱ्या ‘टूडी’ म्हणजे द्विमितीय प्रयोगशाळा मॉडेलऐवजी ‘थ्रीडी’ म्हणजे त्रिमितीय मॉडेल अधिक परिणामकारक ठरू शकते, असा महत्त्वपूर्ण निष्कर्ष आयआयटी मुंबईच्या संशोधकांनी मांडला आहे. हे संशोधन कर्करोगाच्या संशोधनात मैलाचा दगड मानला जात आहे.अभ्यासात मेंदूच्या ग्लिओब्लास्टोमा या आक्रमक कर्करोगावरील थ्रीडी ‘ट्युमरॉइ’ आणि मेंदूसारख्या मऊ वातावरणाचा वापर केल्यावर कर्करोगाचे अधिक वास्तव स्वरूप आणि त्यामागील जैविक प्रक्रिया स्पष्टपणे दिसून आल्याचे संशोधकांनी सांगितले. आयआयटी मुंबईतील प्रा. अभिजित मजुमदार यांच्या मेकॅनोबायोलॉजी प्रयोगशाळेने टाटा मेमोरियल सेंटर आणि भारतीय विज्ञान संस्था, बंगळुरू यांच्या सहकार्याने हे संशोधन केले आहे. संशोधनात कर्करोगाच्या पेशी पारंपरिक कडक प्लास्टिकच्या पृष्ठभागावर आणि त्रिमितीय ट्युमरॉइ मध्ये वाढवून त्यांची तुलना करण्यात आली.(फोटो सौजन्य – istock)
महिनाभरात कपडे होतील सैल! वजन कमी करण्यासाठी उपाशी पोटी करा ‘या’ पेयाचे सेवन, पचनक्रिया राहील सुरळीत
संशोधकांना आढळले की, थ्रीडी ट्युमरॉइड्समध्ये वाढवलेल्या पेशींमध्ये एनईएटी१ आणि एमएएलएटी१ या कर्करोगाशी संबंधित रेणूंचे प्रमाण लक्षणीय वाढले होते. या रेणूंवर नियंत्रण मिळवल्यानंतर कर्करोगाच्या पेशींची वाढ, प्रसार आणि आक्रमकता कमी झाल्याचेही प्रयोगांत दिसून आले. याउलट, पारंपरिक टूडी मॉडेलमध्ये हे महत्त्वाचे बदल स्पष्टपणे दिसून आले नाहीत.
संशोधकांच्या मते, प्रत्यक्ष शरीरातील कर्करोग हा त्रिमितीय स्वरूपाचा असतो. त्यामुळे सपाट पृष्ठभागावर होणारे संशोधन अनेकदा रोगाचे संपूर्ण चित्र दाखवत नाही. ट्युमरॉइड्समुळे पेशींमधील परस्परसंवाद, वाढ आणि प्रसार यांचे अधिक वास्तव चित्र समोर येते. त्यामुळे भविष्यात कर्करोगावरील औषधांची परिणामकारकता तपासण्यासाठी आणि नवीन औषध-लक्ष्ये शोधण्यासाठी थ्रीडी मॉडेलचा वापर अधिक उपयुक्त ठरू शकतो.
‘कर्करोगाचे वर्तन समजून घेण्यासाठी केवळ जनुकांचा नव्हे, तर पेशींच्या भौतिक वातावरणाचाही तितकाच महत्त्वाचा वाटा असतो. त्यामुळे भविष्यातील कर्करोग संशोधनात मऊ जेल आणि थ्रीडी ट्युमरॉइड्सचा समावेश करणे आवश्यक ठरू शकते, अशी माहिती – प्रा. अभिजित मजुमदार यांनी दिली आहे.
Ans: 3D मॉडेलमध्ये कर्करोगाच्या पेशींची त्रिमितीय रचना प्रयोगशाळेत तयार केली जाते. त्यामुळे पेशींचे वर्तन शरीरातील परिस्थितीच्या अधिक जवळून अभ्यासता येऊ शकते.
Ans: 2D मॉडेलमध्ये पेशी सपाट पृष्ठभागावर वाढवल्या जातात, तर 3D मॉडेलमध्ये पेशींच्या त्रिमितीय परस्परसंवादाचा अभ्यास करता येतो. त्यामुळे कर्करोगाच्या वाढीचा आणि औषधांच्या परिणामांचा अधिक सखोल अभ्यास करण्यास मदत होऊ शकते.
Ans: या संशोधनामुळे कर्करोगाच्या पेशींचे वर्तन आणि उपचारांना त्यांचा प्रतिसाद समजून घेण्यासाठी अधिक प्रगत प्रयोगशाळा मॉडेल विकसित करण्याच्या दिशेने नवी संधी निर्माण होऊ शकते.






