(फोटो सौजन्य: Pinterest)
योग्य वेळ आणि साहित्य निवडणे
बेलपत्राचे झाड लावण्यासाठी फ्रेब्रुवारी ते जुलै दरम्यानचा काळ परफेक्ट मानला जातो. यासाठी बेलपत्राचे ताजे फळ किंवा निरोगी फांदी, ८-१० इंचाची कुंडी आणि योग्य मातीचे मिश्रण यांचा वापर करा.
माती तयार करण्यासाठी ट्रिक
बेलपत्राचे झाड लावण्यासाठी अशी माती घ्या ज्यात पाणी जमा होत नाही. यासाठी ५० टक्के सामान्य बागेतील माती, ३० टक्के शेण खत किंवा गांडूळ खत यांना एकत्र मिसळा. लक्षात ठेवा, कुंडीच्या खाली एक तरी ड्रेनेज होल नक्की तयार करा. यामुळे मातीतील अतिरिक्त पाणी बाहेर पडेल.
लागवडीसाठीची ट्रिक
यासाठी बेलपत्राच्या पिकलेल्या फळातून बिया काढा आणि चांगल्या प्रकारे धुवून याला स्वच्छ करा. बियांना २४ तास पाण्यात भिजवत ठेवा. कुंडीतील मातीत १ इंच खोल बिया चांगल्या पेरा आणि मग त्यावर मातीचा हलका थर लावा. यानंतर मातीत हलकं पाणी घाला.
कलमांपासून झाड उगवा
बियांऐवजी तुम्ही जुन्या बेलपत्राच्या झाडीतून पेन्सिलच्या जाडीची ६-८ इंच लांबीची फांदी तोडून त्याचा वापर नवीन झाड उगवण्यासाठी करु शकता. यासाठी फांदीचा खालचा भाग सोलून मग त्यावर कोरफड जेल लावा. या फांदीला कुंडीतील मातीत २-३ इंच खोल दाबून पेरा आणि मग यात हलकं पाणी घाला. कलमांच्या मदतीने झाड लवकर मोठ करण्यास मदत होते.
महत्त्वाच्या टिप्स






