Ganesh Chaturthi 2025 : बाप्पाच्या प्रसादाला बनवा चविष्ट, पौष्टिक अन् पारंपारिक असं पंचखाद्य; पिढ्यानपिढ्या चालत आलीये रेसिपी
गणेशोत्सव हा आपल्या संस्कृतीतील सर्वात मंगल व पवित्र सण मानला जातो. भाद्रपद शुद्ध चतुर्थीपासून सुरू होणारा हा उत्सव दहा दिवस घराघरांत भक्तिभाव, मंगलमय वातावरण आणि एकोप्याचा संदेश देतो. बाप्पाच्या आगमनाने घरामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होते. या काळात भक्तजन विविध नैवेद्य, गोडधोड पदार्थ व खास प्रसाद तयार करून गणरायाला अर्पण करतात. मोदक हा बाप्पाचा अत्यंत आवडता पदार्थ असला, तरी त्याचबरोबर काही पारंपरिक प्रसाद देखील गणेशोत्सवात नेहमीच केला जातो. त्यात पंचखाद्य या पौष्टिक व गोड पदार्थाला विशेष स्थान आहे.
दुपारच्या जेवणासाठी २० मिनिटांमध्ये झटपट बनवा स्वादिष्ट मसालेदार भात, नोट करून घ्या पदार्थ
पंचखाद्याची खासियत
पंचखाद्य म्हणजे नावाप्रमाणेच पाच पदार्थांच्या मिश्रणातून तयार केलेला प्रसाद. यात सुके मेवे, खारीक, खडीसाखर व सुकं खोबरं यांचा समावेश असतो. हे सर्व घटक आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी असल्याने पंचखाद्य प्रसाद चविष्ट तर आहेच, पण पौष्टिकतेचा खजिनाही आहे. गणेशोत्सवात, गौरीपूजनात व इतर शुभ प्रसंगी हा प्रसाद नेहमी अर्पण केला जातो.
साहित्य
घाईगडबडीच्या वेळी सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा उत्तपम, आरोग्यासाठी ठरेल पौष्टिक पदार्थ
कृती
पंचखाद्य म्हणजे काय?
पंचखाद्य हे पाच “ख” अक्षराने सुरू होणाऱ्या पदार्थांचे मिश्रण आहे, जे गणपतीला प्रसाद म्हणून दिले जाते.
पंचखाद्य कशासाठी वापरले जाते?
हे विशेषतः गणपतीला नैवेद्य म्हणून दिले जाते. सणासुदीला, खासकरून गणेशोत्सवात हे प्रसाद म्हणून वापरले जाते.