Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मेंदू तल्लख करेल, हाडेही होतील मजबूत… रोज चमचाभर खा डिंकाचा पाक; नोट करा रेसिपी

Dink Pak Recipe : डिंकामध्ये अनेक पौष्टिक गुणधर्म आढळून येतात जे आपल्या आरोग्यासाठी फायद्याचे ठरतात. आपण डिंकाचा लाडू तर बऱ्याचदा खाल्ला आहे पण तुम्ही कधी डिंकाचा पाक करून खाल्ला आहे का? जाणून घ्या रेसिपी.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 29, 2026 | 10:00 AM
मेंदू तल्लख करेल, हाडेही होतील मजबूत... रोज चमचाभर खा डिंकाचा पाक; नोट करा रेसिपी

मेंदू तल्लख करेल, हाडेही होतील मजबूत... रोज चमचाभर खा डिंकाचा पाक; नोट करा रेसिपी

Follow Us
Follow Us:
  • डिंकाचे सेवन आपल्या आरोग्यासाठी खूप फायद्याचे ठरते.
  • यातील कॅल्शियमचा स्रोत हाडे मजबूत करतो तर ओमेगा ३ मेंदूचे आरोग्य सुधारतो.
  • डिंकाचे लाडू आपण बऱ्याचदा खाल्ले आहेत पण कधी डिंकाचा पाक तुम्ही खाल्ला आहे का?
भारतीय स्वयंपाकघरात तयार होणारे पारंपरिक पदार्थ केवळ चवीपुरते मर्यादित नसतात, तर त्यामागे प्रेमासोबतच भरपूर पोषणही दडलेले असते. योग्य प्रमाणात आणि संतुलित पद्धतीने साहित्य वापरले, तर असे पदार्थ आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतात. हिवाळ्याच्या दिवसांत डिंकाचा पाक हा खास करून खाल्ला जाणारा पदार्थ आहे. डिंक हा कॅल्शियमचा उत्तम स्रोत मानला जातो आणि प्राचीन काळापासून भारतीय आहारात त्याचा वापर केला जात आहे. मेवा, दूध आणि तुपाच्या मिश्रणामुळे डिंकाचा पाक पौष्टिक तर असतोच, शिवाय चवीलाही खूप छान लागतो.

Green Chili Achar Recipe : विना तेल घरी बनवा ‘हिरव्या मिरचीचं लोणचं’, चटकदार चव जेवणाची मजा करेल द्विगुणित

डिंक पाक हा जरी गोड पदार्थ असला, तरी तो मर्यादित प्रमाणातच खाल्ला पाहिजे. वयानुसार दररोज एक किंवा दोन चमचे डिंकाचा पाक घेतल्यास शरीराला ऊर्जा मिळते आणि ताकद वाढण्यास मदत होते. डिंक पाक सेट करून त्याच्या वड्या किंवा बर्फीही बनवता येतात, ज्यामुळे रोज एक तुकडा खाणे सोपे जाते. काही जण तो स्टीलच्या डब्यात साठवून गरजेनुसार चमच्याने घेतात. योग्य पद्धतीने साठवणूक केल्यास डिंकाचा पाक बराच काळ टिकतो. चला तर मग याची रेसिपी जाणून घेऊया.

साहित्य

  • अर्धा कप डिंक
  • दोन कप डिंक
  • एक कप मिक्स सुकामेवा (बदाम, काजू, अक्रोड, मखाणे आणि पिस्ते)
  • अर्धा कप बारीक किसलेले खोबरे
  • पाव कप खसखस
  • एक मोठा चमचा सुंठाची पावडर
  • अर्धा छोटा चमचा जायफळ पावडर
  • एक छोटा चमचा हिरवी वेलची पावडर
  • अर्धा कप साजूक तूप
  • गूळ

पदार्थ पाहून तोंडाला सुटेल पाणी! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चटपटे आलू, साध्या मसाल्यांपासून बनवलेली चविष्ट रेसिपी

कृती

  • डिंकाचा पाक बनवताना सर्वप्रथम डिंक मिक्सरमध्ये बारीक दळून पावडर डिंकाचा घ्यावी. कढईत थोडे तूप गरम करून बदाम, काजू, अक्रोड आणि मखाणे मंद आचेवर भाजून घ्यावेत.
  • भाजलेले सुकामेवे थोडेसे भरड दळून ठेवावेत, त्यामुळे पाकाला छान दाणेदार पोत येतो. त्याच कढईत थोडे तूप घालून खोबरे आणि खसखस हलक्या आचेवर परतावीत. त्या किंचित सोनेरी रंगाच्या झाल्यावर बाजूला काढून ठेवाव्यात.
  • यानंतर कढईत पुन्हा तूप घालून त्यात डिंकाची पावडर टाकावी आणि सतत हलवत मंद आचेवर भाजावी. डिंक नीट भाजला गेला की त्यात आधी उकळून थंड केलेले दूध घालावे.
  • दूध आणि डिंक एकत्र करून मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवावे. त्यानंतर भाजलेले खोबरे, खसखस आणि सुकामेव्याची पूड यात मिसळावी.
  • गोडीसाठी किसलेला किंवा पूड केलेला गूळ घालावा, जेणेकरून तो पटकन विरघळेल आणि गाठी पडणार नाहीत. मिश्रण सतत ढवळत शिजवावे, जोपर्यंत त्यातून तूप सुटू लागेल.
  • शेवटी सुंठाची पावडर, वेलची पावडर आणि जायफळ पावडर घालून सर्व साहित्य नीट एकत्र करावे. अशा प्रकारे घरगुती, पौष्टिक आणि स्वादिष्ट डिंकाचा पाक तयार होतो.

Web Title: Tasty nutrition rich dinkacha pak recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 29, 2026 | 10:00 AM

Topics:  

  • easy food recipes
  • healthy recipe
  • marathi recipe

संबंधित बातम्या

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 
1

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी
2

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी

Red Chili Thecha : हिरव्या नाही यावेळी लाल मिरच्यांपासून बनवा झणझणीत ठेचा, रेसिपी नोट करा
3

Red Chili Thecha : हिरव्या नाही यावेळी लाल मिरच्यांपासून बनवा झणझणीत ठेचा, रेसिपी नोट करा

Breakfast Recipe: गोड पदार्थ खाऊन कंटाळा आला आहे? मग १० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा खमंग कुरकुरीत कांद्याचे थालीपीठ
4

Breakfast Recipe: गोड पदार्थ खाऊन कंटाळा आला आहे? मग १० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा खमंग कुरकुरीत कांद्याचे थालीपीठ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.