Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गणेशोत्सवात ग्लोइंग त्वचेसाठी घरच्या घरी बनवा ‘हे’ फेसपॅक, त्वचेवर येईल सुंदर चमक

बाप्पाच्या आगमन सोहळ्यासाठी कोकण, पुण्यासह मुंबईमध्ये बाप्पाच्या आगमनाची जोरात तयारी चालू आहे. गणपती बाप्पाचे घरात आगमन झाल्यानंतर बाप्पाचे भक्त मनोभावे गणपतीची पूजा करतात. बाप्पाच्या नैवेद्यात अनेक गोडाचे पदार्थ बनवले जातात. काहींच्या घरी गणपती बाप्पा 10 दिवस तर काहींच्या 5 आणि दीड दिवस गणपती असतो. गणपती आगमनाच्या 3 दिवसांनंतर गौराईसुद्धा येतात. घरी गणपती आल्यानंतर घरातील सर्व महिला छान नटून थटून तयार होतात.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 02, 2024 | 11:44 AM
ग्लोइंग त्वचेसाठी घरच्या घरी बनवा 'हे' फेसपॅक

ग्लोइंग त्वचेसाठी घरच्या घरी बनवा 'हे' फेसपॅक

Follow Us
Follow Us:

संपूर्ण देशभरात गणेश चतुर्थी मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरी केली जाणार आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाच्या वर्षीसुद्धा गणपती बाप्पाचे थाटामाटात आगमन होणार आहे. बाप्पाच्या आगमन सोहळ्यासाठी कोकण, पुण्यासह मुंबईमध्ये बाप्पाच्या आगमनाची जोरात तयारी चालू आहे. गणपती बाप्पाचे घरात आगमन झाल्यानंतर बाप्पाचे भक्त मनोभावे गणपतीची पूजा करतात. बाप्पाच्या नैवेद्यात अनेक गोडाचे पदार्थ बनवले जातात. काहींच्या घरी गणपती बाप्पा 10 दिवस तर काहींच्या 5 आणि दीड दिवस गणपती असतो. गणपती आगमनाच्या 3 दिवसांनंतर गौराईसुद्धा येतात. घरी गणपती आल्यानंतर घरातील सर्व महिला छान नटून थटून तयार होतात.

गणपती बाप्पा येण्याच्या २ दिवस आधीपासूनच आगमनाची तयारी केली जाते. बाप्पाचा नैवेद्य, घरी आलेल्या पाहुण्यांची व्यवस्थित सोय करण्यासाठी पहाटे लवकर उठावे लागते. पहाटे लवकर उठल्यामुळे चेहऱ्यावर पूर्णपणे थकवा जाणवतो. चेहऱ्यावर थकवा जाणवू लागल्यानंतर चेहऱ्याचे सौदंर्य कमी होऊन जाते. त्यामुळं;ए आज आम्ही तुम्हाला चेहऱ्याचे कमी झालेले सौदंर्य पुन्हा वाढवण्यासाठी काही फेसपॅक सांगणार आहोत. हे फेसपॅक तुम्हीसुद्धा वापरू शकता. यामुळे गणपती उत्सवात तुमच्या चेहऱ्याची चमक वाढून त्वचेला सुद्धा फायदे होतील.

हे देखील वाचा: कमी वयात केस पांढरे झाले आहेत? मग आहारात करा ‘या’ पदार्थांचे सेवन,पांढऱ्या केसांपासून मिळेल सुटका

ग्लोइंग त्वचेसाठी घरच्या घरी बनवा ‘हे’ फेसपॅक

हळद दुधाचा फेसपॅक:

हळद दुधाचा फेसपॅक लावल्यामुळे चेहऱ्यावर ताण कमी होऊन त्वचा उजळदार दिसते. फेसपॅक बनवण्यासाठी एका वाटीमध्ये दूध घेऊन त्यात चिमूटभर हळद मिक्स करा. हळद मिक्स करून झाल्यानंतर संपूर्ण मिश्रण चेहऱ्यावर लावून कोरडे करून घ्या. त्यानंतर हलक्या हाताने चेहऱ्यावर मसाज करून 10 मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवा. हा उपाय गणपती येण्याच्या आधल्या दिवशी करा.

ग्लोइंग त्वचेसाठी घरच्या घरी बनवा ‘हे’ फेसपॅक

अळशीच्या बियांचा फेसपॅक:

अळशीच्या बिया आणि तांदळाचे पाणी त्वचेसाठी अतिशय प्रभावी आहे. खराब आणि टॅन झालेली त्वचा सुधारण्यासाठी अळशी आणि तांदळाचा वापर करा. फेसपॅक बनवण्यासाठी मिक्सरमधून अळशीच्या बिया बारीक करून घ्या. त्यानंतर तांदळाच्या पिठामध्ये अळशीच्या बियांची पावडर टाकून मिक्स करा. हे मिश्रण बनवताना त्यात पाणी मिक्स करा. जास्त पाणी मिश्रणात टाकू नये. त्यानंतर तयार केलेला फेसपॅक त्वचेला लावून कोरडा होण्यासाठी ठेवा. यामुळे त्वचेचा रंग सुधारण्यास मदत होईल.

हे देखील वाचा: शरीर स्वच्छ करण्यासाठी आहारात करा ‘या’ डिटॉक्स ड्रिंकचा समावेश, यकृत होईल स्वच्छ

ग्लोइंग त्वचेसाठी घरच्या घरी बनवा ‘हे’ फेसपॅक

बदाम फेसपॅक:

बाजारात बदामाचा वापर करून तयार केलेले अनेक फेसपॅक उपलब्ध आहेत. पण घरी बनवलेला फेसपॅक त्वचेसाठी अतिशय प्रभावी आहे. बदाम फेसपॅक बनवण्यासाठी बदाम घेऊन ते दुधात उगळून घ्या. त्यानंतर तयार केलेले मिश्रण चेहऱ्याला लावा. संपूर्ण चेहऱ्याला लावून झाल्यानंतर त्वचा कोरडी होण्यासाठी ठेवा. 10 मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवून घ्या. हा उपाय गणपतीच्या दोन दिवस आधी नियमित केल्यास त्वचा खूप जास्त चमकेल.

 

टीप – आम्ही देत असलेली माहिती ही तज्ज्ञांशी बोलून आणि रिसर्च करून देत आहोत. हा लेख केवळ तुमच्या माहितीसाठी लिहिण्यात आला आहे. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते, त्यामुळे कोणत्याही प्रकारचा उपाय करण्यापूर्वी पॅच टेस्ट करायला विसरू नका.

Web Title: Ganesh chaturthi make a homemade face pack to get a glow in ganesh festival

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 02, 2024 | 11:44 AM

Topics:  

  • Ganesh Chaturthi 2026
  • Ganpati festival 2024
  • Hindu Festival

संबंधित बातम्या

Anant Chaturdashi 2026: २५ सप्टेंबरला विसर्जनाचा शुभ मुहूर्त? सकाळपासून रात्रीपर्यंत नक्की कधी होऊ शकतं विसर्जन
1

Anant Chaturdashi 2026: २५ सप्टेंबरला विसर्जनाचा शुभ मुहूर्त? सकाळपासून रात्रीपर्यंत नक्की कधी होऊ शकतं विसर्जन

Mumbai cha Raja : बाप्पाच्या ऐतिहासिक मिरवणुकीतच आलं विघ्न, म्हणून ‘मुंबईचा राजा’चं शुक्रवारी विसर्जन नाही?
2

Mumbai cha Raja : बाप्पाच्या ऐतिहासिक मिरवणुकीतच आलं विघ्न, म्हणून ‘मुंबईचा राजा’चं शुक्रवारी विसर्जन नाही?

Mumbai Metro 3: अनंत चतुर्दशीला मुंबईकरांचा प्रवास होणार सोपा; Aqua Line ची सेवा रात्रभर राहणार सुरू
3

Mumbai Metro 3: अनंत चतुर्दशीला मुंबईकरांचा प्रवास होणार सोपा; Aqua Line ची सेवा रात्रभर राहणार सुरू

Ganeshotsav 2026 : बाप्पाच्या विसर्जनसाठी घरी तयार करा ‘केसर मलाई मोदक’, ही आहे हलवाई स्टाईल रेसिपी
4

Ganeshotsav 2026 : बाप्पाच्या विसर्जनसाठी घरी तयार करा ‘केसर मलाई मोदक’, ही आहे हलवाई स्टाईल रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.