कमीत कमी साहित्यामध्ये बनवा उपवासाचे मोदक
5 ऑगस्ट रोजी सुरु झालेला श्रावण महिना संपण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. श्रावण महिन्यात सगळीकडे आनंद आणि उत्साहाचे वातावरण असते. श्रावण महिना संपण्याआधी घराघरात गणपती बाप्पाचे आगमन होते. गणपती बाप्पाचे आगमन झाल्यानंतर सगळीकडे एक वेगळाच उत्साह असतो. अनेक महिला गणेश चतुर्थीच्या दिवशी उपवास करतात. उपवासाच्या दिवशी काय पदार्थ बनवावा? असा प्रश्न सर्वच महिलांना पडतो. अनेक घरांमध्ये साबुदाणा खिचडी, बटाट्याची भाजी किंवा वेफर्स खाल्ले जातात. पण रिकाम्या पोटी हे पदार्थ अनेकदा आरोग्यासाठी हानिकारक ठरतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला उपवासाच्या दिवशी फराळात उपवासाचे मोदक कसे बनवायचे याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हे मोदक ५ मिनिटांमध्ये झटपट बनवले जातात. मोदक तुम्ही गणपतीच्या नैवेद्यासाठी सुद्धा बनवू शकता.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: Ganesh Chaturthi: गणपती उत्सवात घरी आलेल्या पाहुण्यांसाठी बनवा गोड बालुशाही, मिठाई खाऊन पाहुणे होतील खुश