Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ganeshotsav 2026: देवाला दाखवलेला नैवेद्य कधीपर्यंत समोर ठेवावे, काय आहे शास्त्राचा नियम

ganeshotsav 2026: देवासमोर ठेवलेला नेवैद्य साधारण किती वेळेपर्यंत ठेवावा आणि समोरून कधी उचलावा. शास्त्रात नक्की याबाबत काही सांगितले आहे का? आरोग्यासाठी काय योग्य? जाणून घ्या

  • By दिपाली नाफडे
Updated On: Sep 16, 2026 | 05:27 PM
नैवेद्य कधी खावा (फोटो सौजन्य - ChatGPT)

नैवेद्य कधी खावा (फोटो सौजन्य - ChatGPT)

Follow Us
Follow Us:
  • गणपती बाप्पाच्या समोरून दाखवलेला प्रसाद नक्की किती वेळ ठेवावे 
  • देवापुढील नेवैद्य उचलून कधी खावा 
  • काय सांगते शास्त्र 
Ganeshotsav 2026: घरी बाप्पा आल्यानंतर त्याला नेवैद्य तर आपण ठेवतोच. पण पूजा झाल्यानंतर देवापुढे ठेवलेला नैवेद्य नक्की कधी उचलावा? आरती झाल्यावर १० मिनिटांनी नैवेद्य काढावा की नैवेद्याचे ताट रात्रभर तसेच ठेवावे? याबाबतीत प्रत्येक घरांमध्ये वेगवेगळ्या परंपरा आहेत. अनेकजण नैवेद्य रात्रभर ठेवणे शुभ मानतात, तर काहीजण आरती झाल्यावर लगेचच त्याचा प्रसाद म्हणून त्याचं वाटप करतात. पण शास्त्रानुसार नक्की काय सांगितलं जातं हेच आज आपण व्हिडिओमधून जाणून घेऊया. 

देवाला नैवेद्य अर्पण करून नंतर प्रसाद ग्रहण करावा हे तर सर्वज्ञात आहे. श्रीमद्भगवद्गीतेच्या नवव्या अध्यायाच्या २६ व्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं आहे की, 

पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति

याचा अर्थ असा आहे की, जर भक्ताने शुद्ध भावनेने पाने, फुले, फळे किंवा पाणी अर्पण केले, तर देव ते स्वीकारतो. हा श्लोक नैवेद्याच्या प्रमाणापेक्षा किंवा किंमतीपेक्षा भक्ताच्या भक्तीवर आणि भावनांच्या शुद्धतेवर भर देतो.

Gauri Aagman 2026: फुले, दिवे आणि कापडाने घरच्या घरी करता येतील ‘या’ भन्नाट आयडिया

किती वेळानंतर नैवेद्य उचलावा 

शास्त्राच्या श्लोकांमध्ये किती वेळानंतर नेवैद्य समोरून उचलावा हे सांगण्यात आलं नाहीये. पूजेची पद्धत, देवता, पंथ आणि कौटुंबिक परंपरेनुसार वेळ बदलू शकतो. पण सर्वसाधारण घरगुती पूजेमध्ये क्रम पाळला जाऊ शकतो. आता तो क्रम कोणता तर 

  • देवासाठी अन्न एका वेगळ्या, स्वच्छ भांड्यात ठेवा
  • नैवेद्य अर्पण करताना, आपल्या निवडलेल्या देवतेच्या मंत्राचा जप करा
  • काही वेळ शांत राहा आणि जप किंवा प्रार्थना करा
  • आरती झाल्यावर नैवेद्य काढा
  • प्रथम, थोडा प्रसाद घ्या आणि नंतर तो कुटुंबातील सर्वांमध्ये वाटा.

नैवेद्य रात्रभर देवापुढे ठेवावे का?

सर्वसाधारण घरगुती पूजेमध्ये, दूध, खीर, हलवा, पुरी-भाज्या, शिजवलेला भात, गोड पदार्थ आणि कापलेली फळे यांसारखे पदार्थ असतात जे रात्रभर उघडे ठेवू नयेत. हे कोणत्याही वाईट गोष्टीच्या भीतीने नाही, तर पवित्रता आणि अन्न सुरक्षेसाठी आहे. उघड्या अन्नात धूळ, मुंग्या किंवा इतर कीटक शिरू शकतात. उष्ण हवामानात दूध आणि शिजवलेले अन्न लवकर खराब होऊ शकते. त्यामुळे सहसा हा नेवैद्य जास्त काळ ठेऊ नये. उरलेले पदार्थ रेफ्रिजरेटमध्ये तुम्ही सध्याच्या सोयीसाठी ठेऊ शकता. यामागे धार्मिक आधार नाही तर आरोग्याची सुरक्षा हे मोठं कारण आहे. 

Ganeshotsav 2026: गणपतीच्या नैवेद्याला महागाईचा फटका; मावा-चॉकलेटसह या मोदकांना मागणी

रेफ्रिजरेटरमध्ये ठेवणे योग्य की अयोग्य 

पूजेनंतर दूध, खीर, हलवा किंवा इतर नाशवंत प्रसाद स्वच्छ, झाकण असलेल्या भांड्यात फ्रिजमध्ये ठेवता येतो. प्रसाद मुद्दाम खराब करण्याविरुद्ध शास्त्रे काही सांगत नाहीत. अन्नाचा आदर करणे म्हणजे ते स्वच्छ ठेवणे, वेळेवर सेवन करणे आणि वाया न घालवणे. तसंच सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुटुंब जेवढे खाऊ किंवा वेळेवर वाटू शकेल, तेवढेच देवाला अर्पण करणे उत्तम.

अर्पणाचा खरा अर्थ म्हणजे ताट देवापुढे किती वेळ राहते हा नाही. गीतेनुसार, त्याच्या मुळाशी भक्ताच्या शुद्ध भावना आहेत. म्हणून, भक्तीभावाने अर्पण करा, पूजा पूर्ण झाल्यावरच ते सेवन करा आणि अन्नाची स्वच्छता राखा.

Web Title: Ganeshotsav 2026 for how long should the naivedya presented to the deity be kept before the idol

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 16, 2026 | 05:25 PM

Topics:  

  • Festival News
  • Ganeshotsav 2026
  • Ganpati Festival

संबंधित बातम्या

Ganeshotsav: ना दरवाढ, ना हाल! गणेशोत्सवात पुणेकरांचा प्रवास होणार सोपा; PMP चा मोठा दिलासा
1

Ganeshotsav: ना दरवाढ, ना हाल! गणेशोत्सवात पुणेकरांचा प्रवास होणार सोपा; PMP चा मोठा दिलासा

Ratnagiri: बाप्पा, पुढच्या वर्षी लवकर या! टाळ-मृदुंगाच्या गजरात बाप्पाला साश्रू नयनांनी निरोप
2

Ratnagiri: बाप्पा, पुढच्या वर्षी लवकर या! टाळ-मृदुंगाच्या गजरात बाप्पाला साश्रू नयनांनी निरोप

Nita Ambani: नथ, चांदबालीचा शाही हार, तब्बल 3 वर्षात झाला तयार; नीता अंबानीच्या नेकलेसने दिपतील डोळे
3

Nita Ambani: नथ, चांदबालीचा शाही हार, तब्बल 3 वर्षात झाला तयार; नीता अंबानीच्या नेकलेसने दिपतील डोळे

Gauri Aagman 2026: फुले, दिवे आणि कापडाने घरच्या घरी करता येतील ‘या’ भन्नाट आयडिया
4

Gauri Aagman 2026: फुले, दिवे आणि कापडाने घरच्या घरी करता येतील ‘या’ भन्नाट आयडिया

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.