Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गटारी स्पेशल! घरी बनवा चवदार आणि मसालेदार रवा बोंबील फ्राय; खास दिवसाचा खास मेन्यू

Rava Bombil Fry Recipe : बोंबील रवा फ्राय ही कोळीवाड्याची एक सुप्रसिद्ध डिश आहे. यात बोंबील माशाला मसाले आणि रव्यामध्ये कोट करून तव्यावर कुरकुरीत फ्राय केले जाते. तुमच्या गटारीच्या मेजवानीत ही रेसिपी असायलाच हवी.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 19, 2025 | 10:25 AM
गटारी स्पेशल! घरी बनवा चवदार आणि मसालेदार रवा बोंबील फ्राय; खास दिवसाचा खास मेन्यू

गटारी स्पेशल! घरी बनवा चवदार आणि मसालेदार रवा बोंबील फ्राय; खास दिवसाचा खास मेन्यू

Follow Us
Follow Us:

लवकरच श्रावण सुरु होणार आहे अशात अनेकांचा गटारी प्लॅन आतापासूनच रंगू लागला आहे. गटारी स्पेशल प्रत्येकाच्या घरी नॉनव्हेजचा प्लॅन बनतो. कोणी बाहेरून जेवण ऑर्डर करतं तर कुणी घरीच चविष्ट मेजवानीचा प्लॅन करतं. अहो, चविष्ट पदार्थ जर घरीच तयार करता येत असेल तर त्यासाठी उगाच पैसे का घालवायचे? हाच विचार करत आता आजची रेसिपी वाचा आणि गटारीसाठी घरी जेवणाचा स्पेशल प्लॅन बनवा.

तुम्ही कधी Veg Panini खाल्ला आहे का? कुरकुरीत ब्रेडमध्ये भरलेली चिजी स्टफिंग, हलक्याफुलक्या नाश्त्यासाठी उत्तम पर्याय

बोंबील, ज्याला इंग्रजीत Bombay Duck म्हणतात, हा एक कोवळा व रसाळ मासा आहे जो कोकण व मुंबईत विशेष लोकप्रिय आहे. याचे रवा फ्राय हे पारंपरिक व चविष्ट कोळीवाडा-शैलीतील डिश आहे. बाहेरून कुरकुरीत आणि आतून नरमसरसा असा बोंबील रवा फ्राय चवीलाही अफलातून लागतो आणि भात, भाकरी किंवा अगदी स्टार्टर म्हणूनही सर्व्ह करता येतो. चला जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

साहित्य

  • बोंबील (Bombil) – 5-6 (साफ केलेले व मधोमध कापलेले)
  • लिंबाचा रस – 1 चमचा
  • मीठ – चवीनुसार
  • हळद – ½ चमचा
  • लाल तिखट – 1½ चमचा
  • आलं-लसूण पेस्ट – 1 चमचा
  • बारीक रवा – ½ कप
  • तांदळाचे पीठ (ऐच्छिक) – 2 चमचे
  • तेल – तळण्यासाठी
गटारी स्पेशल! रविवारची मजा करा द्विगुणित; घरी बनवा मसालेदार आणि चविष्ट ‘सुक्कं चिकन’

कृती

  • बोंबील रवा फ्राय बनवण्यासाठी सर्वप्रथम बोंबील स्वच्छ धुऊन घ्या व पाणी निथळू द्या. त्यानंतर त्यात मीठ, हळद आणि लिंबाचा रस घालून 10 मिनिटे मॅरिनेट करा.
  • यांनंतर एका वाडग्यात लाल तिखट, आलं-लसूण पेस्ट घालून बोंबीलमध्ये चांगलं मिक्स करा आणि 10-15 मिनिटे झाकून मॅरीनेट करून घ्या.
  • दुसऱ्या ताटात बारीक रवा आणि तांदळाचं पीठ मिक्स करून ठेवा.
  • प्रत्येक बोंबीलला या रवा-पीठाच्या मिश्रणात लावून दोन्ही बाजूंनी हलक्या हाताने थापून घ्या. रवा बोंबीलमध्ये छान कोट करा.
  • तवा गरम करा. त्यावर थोडं तेल टाका.
  • रवा लावलेले बोंबील तव्यावर ठेवा आणि मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या.
  • आता तुमचा चविष्ट रवा बोंबील फ्राय तयार आहे
  • बोंबील अतिशय नाजूक असतो, म्हणून तव्यावर उलटताना हलक्या हाताने सांभाळा.
  • अजून चवदार हवे असल्यास थोडं कोथिंबीर-हिरवी मिरची पेस्टही मॅरिनेशनमध्ये घालू शकता.
  • तयार रवा बोंबील फ्राय तुम्ही तांदळाच्या भाकरीसोबत अथवा चपातीसोबत खाण्यासाठी सर्व्ह करा.

Web Title: Gatari special make tasty crispy and spicy rava bombil fry note recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 19, 2025 | 10:24 AM

Topics:  

  • food recipe
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

Pitru Paksha: पितृपक्षात मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने बनवा अख्ख्या गव्हाची खीर, ‘या’ टिप्स फॉलो केल्यास पदार्थ होईल चविष्ट
1

Pitru Paksha: पितृपक्षात मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने बनवा अख्ख्या गव्हाची खीर, ‘या’ टिप्स फॉलो केल्यास पदार्थ होईल चविष्ट

Manchurian Chili Recipe : इंडो-चायनीज लव्हर्ससाठी खास, अशाप्रकारे घरी बनवा हाॅटेल स्टाईल ‘मंचुरियन चिली’
2

Manchurian Chili Recipe : इंडो-चायनीज लव्हर्ससाठी खास, अशाप्रकारे घरी बनवा हाॅटेल स्टाईल ‘मंचुरियन चिली’

विना गॅस आणि विना तेल तयार करा ‘हे’ झटपट स्नॅक! चवीशी अजिबात तडजोड नाही; शेजारीही नक्कीच विचारतील रेसिपी
3

विना गॅस आणि विना तेल तयार करा ‘हे’ झटपट स्नॅक! चवीशी अजिबात तडजोड नाही; शेजारीही नक्कीच विचारतील रेसिपी

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी
4

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.