Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गटारी स्पेशल : स्टार्टर्सला ट्राय करा काहीतरी नवीन; घरी बनवा टेस्टी Sweet And Spicy Chicken

आजही ही रेसिपी एखाद्या पार्टीसाठी किंवा विकेंडसाठी एक परफेक्ट स्टार्टर डिश आहे. याची चव इतकी कमाल आहे की, खाताक्षणी सगळ्यांच्या तोंडातून "वा!" निघेल. नोट करा सोपी आणि झटपट चिकन रेसिपी!

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 22, 2025 | 01:46 PM
गटारी स्पेशल : स्टार्टर्सला ट्राय करा काहीतरी नवीन; घरी बनवा टेस्टी Sweet And Spicy Chicken

गटारी स्पेशल : स्टार्टर्सला ट्राय करा काहीतरी नवीन; घरी बनवा टेस्टी Sweet And Spicy Chicken

Follow Us
Follow Us:

गटारीच्या मेजवानीत काही नवीन आणि चवदार करण्याच्या विचारात असाल तर आजची ही रेसिपी तुमच्या मेन्यूमध्ये समाविष्ट व्हायलाच हवी. आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत चिकनची एक टेस्टी, क्रिस्पी आणि स्पायसी डिश जि चवीला अप्रतीम लागते. ही एक स्टार्टर डिश आहे, तुम्ही पार्टीज किंवा कोणत्या खास प्रसंगी देखील हा पदार्थ बनवून ट्राय करू शकता.

लहान मुलांच्या डब्यासाठी १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चमचमीत लसूण पराठा, नोट करून घ्या पदार्थ

क्रिस्पी स्वीट चिली चिकन ही एक झटपट बनणारी, कुरकुरीत, आणि थोडीशी गोडसर आणि तिखट अशी परफेक्ट स्टार्टर रेसिपी आहे. पार्टी असो वा खास डिनर, ही रेसिपी नेहमीच हिट ठरते. तुम्हाला चिकन खायला आवडत असेल तर तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करायला हवी. याची चव तुम्हालाच काय तर तुमच्या घरच्यांनाही खुश करेल आणि तुमच्या गटारीच्या मेजवानीची रंगत वाढवेल. चला जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

साहित्य

चिकन मॅरिनेशनसाठी:

  • बोनलेस चिकन (क्यूब्स) – २५० ग्रॅम
  • अंडं – १
  • कॉर्नफ्लोअर – २ टेबलस्पून
  • मैदा – २ टेबलस्पून
  • आले-लसूण पेस्ट – १ टीस्पून
  • काळी मिरी पूड – ½ टीस्पून
  • मीठ – चवीनुसार
  • तेल – तळण्यासाठी
सॉससाठी:
  • स्वीट चिली सॉस – २ टेबलस्पून
  • टोमॅटो सॉस – १ टेबलस्पून
  • सोया सॉस – १ टीस्पून
  • लाल तिखट किंवा चिली फ्लेक्स – ½ टीस्पून
  • मध – १ टीस्पून (ऐच्छिक – गोडसर चव हवी असल्यास)
  • आले-लसूण पेस्ट – ½ टीस्पून
  • तेल – १ टेबलस्पून
  • कांदापात किंवा ताजी कोथिंबीर – सजावटीसाठी
गटारी स्पेशल : बिर्याणीची झंझट नको वाटते मग यंदाच्या मेजवानीत करा मसालेदार चिकन खिचडीचा बेत

कृती

  • यासाठी सर्वप्रथम एका बाउलमध्ये चिकनचे तुकडे, आले-लसूण पेस्ट, अंडं, मैदा, कॉर्नफ्लोअर, काळी मिरी पूड आणि मीठ एकत्र करून मिक्स करा. १५-२० मिनिटांसाठी मॅरिनेट करून ठेवा.
  • कढईत तेल गरम करून मॅरिनेट केलेले चिकन मध्यम आचेवर कुरकुरीत आणि सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या.
  • एका टिश्यू पेपरवर काढा जेणेकरून अतिरिक्त तेल निघून जाईल.
  • दुसऱ्या पॅनमध्ये १ टेबलस्पून तेल गरम करा. त्यात आले-लसूण पेस्ट घालून हलके परतवा.
  • आता त्यात स्वीट चिली सॉस, टोमॅटो सॉस, सोया सॉस, चिली फ्लेक्स आणि मध घालून मिक्स करा. सॉस २-३ मिनिटे मंद आचेवर उकळू द्या.
  • तळलेले चिकन सॉसमध्ये घालून चांगले परतून घ्या, जेणेकरून सगळ्या तुकड्यांवर सॉस व्यवस्थित लागेल.
  • वरून कांदापात किंवा कोथिंबीर घालून सजवा आणि गरम गरम सर्व्ह करा.
  • अजून कुरकुरीतपणा हवा असल्यास चिकन डबल फ्राय करू शकता.
  • व्हेज व्हर्जनसाठी पनीरचा वापर करू शकता.
  • झणझणीत, गोडसर आणि कुरकुरीत क्रिस्पी स्वीट चिली चिकन तयार आहे!

Web Title: Gatari special note down crispy sweet chili chicken recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 22, 2025 | 01:46 PM

Topics:  

  • food recipe
  • gatari party
  • marathi recipe

संबंधित बातम्या

घरी आलेल्या पाहुण्याच्या स्वगतासाठी बनवा मऊ, लुसलुशीत तोंडात विरघळणारे रताळ्याचे गुलाबजाम, नोट करुन घ्या रेसिपी
1

घरी आलेल्या पाहुण्याच्या स्वगतासाठी बनवा मऊ, लुसलुशीत तोंडात विरघळणारे रताळ्याचे गुलाबजाम, नोट करुन घ्या रेसिपी

Monsoon Special Recipe : संध्याकाळच्या नाश्त्याला घरी बनवा कुरकरील आणि मसालेदार ‘ब्रेड पकोडा’
2

Monsoon Special Recipe : संध्याकाळच्या नाश्त्याला घरी बनवा कुरकरील आणि मसालेदार ‘ब्रेड पकोडा’

गोड पदार्थाने करा दिवसाची सुरुवात! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा हेल्दी टेस्टी क्रिमी मखाणा खीर, लहान मुलांसह मोठेसुद्धा खातील आवडीने
3

गोड पदार्थाने करा दिवसाची सुरुवात! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा हेल्दी टेस्टी क्रिमी मखाणा खीर, लहान मुलांसह मोठेसुद्धा खातील आवडीने

Monsoon Special : पावसाच्या सरीत घरी बनवून खा गरमागरम स्ट्रीट स्टाईल चटपटीत ‘भाजलेला मका’, फार सोपी आहे रेसिपी
4

Monsoon Special : पावसाच्या सरीत घरी बनवून खा गरमागरम स्ट्रीट स्टाईल चटपटीत ‘भाजलेला मका’, फार सोपी आहे रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.