
ठाण्यात जीबीएस व्हायरसचा शिरकाव! आरोग्यासंबंधित 'ही' लक्षणे दिसताच वेळीच घ्या डॉक्टरांचा सल्ला
जीबीएस व्हायरस कोणत्या विषाणूंमुळे पसरतो?
जीबीएस व्हायरसची गंभीर लक्षणे?
थंडीत आजरांची शरीराला लागण का होते?
ठाणे: वर्षाच्या सुरुवातीला पुण्यात हाहाकार माजवलेल्या जीबीएस व्हायरसचा ठाण्यात शिरकाव झाला असून ठाणे शहरात आतापर्यंत दोन जणांना याची लागण झाल्याची माहिती मिळत आहे. यातील एक रुग्ण कळवा रुग्णालयात असून दुसरा रुग्ण ज्युपिटर रुग्णालयात दाखल असल्याची माहिती मिळत आहे. या वर्षांच्या सुरुवातीला पुणे, बारामती आदी ठिकाणी जीबीएस व्हायरसने धुमाकूळ घातला होता. आता वर्षाच्या शेवटी त्याने ठाण्यात धडक दिल्याने हा विषय थोडा चिंताजनक झाला आहे. कळवा रुग्णालयात दोन दिवसांपूर्वी या विषाणूची लागण झालेल्या एक कुमारवयीन गटातील रुग्ण दाखल झाला असून सध्या त्याला अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटर वर ठेवण्यात आले असून परिस्थिती गंभीर असल्याची माहिती रुग्णालयाकडून सांगण्यात आले आहे. (फोटो सौजन्य – istock)
जीबीएस व्हायरस म्हणजे गुइलेन-बॅरे सिंड्रोम. हा मेंदूसंबंधित अतिशय दुर्मिळ आजार आहे. या आजाराची लागण झाल्यानंतर संपूर्ण शरीरात अनेक गंभीर बदल दिसून येतात. हे विषाणू शरीराच्या रोगप्रतिकारशक्तीसोबतच मज्जातंतूंवर सुद्धा हल्ला करतात. ज्यामुळे स्नायू कमकुवत होतात, मुंग्या येतात आणि काहीवेळा अर्धांगवायू, पायात अशक्तपणा आणि मुंग्या येण्यापासून सुरुवात होऊन आजार शरीराच्या वरील अवयवांवर हल्ला करतो.
थंडीच्या दिवसांमध्ये शरीराला झपाट्याने कोणत्याही साथीच्या आजाराची लागण होते. जीबीएस व्हायरस अन्नपदार्थांमधून शरीरात प्रवेश करतो. दूषित पाणी, दूषित अन्न किंवा दूषित मांसाहारी पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीराला गंभीर विषाणूची लागण होण्याची शक्यता असते. त्यामुळे थंडीच्या दिवसांमध्ये रस्त्र्यावरील अन्नपदार्थांचे सेवन करणे टाळावे.
तर दुसरा रुग्ण हा ज्युपिटर मध्ये दाखल असून तो तरुण वयोगटातील आहे. त्यालाही दोन दिवसापूर्वी दाखल करण्यात आले आहे. या विषाणूची लागण झालेल्या रुग्णाची स्नायूची शक्ती झापाट्याने कमी होत जाते त्यामुळे त्याचा तोल जाणे, लकवा मारणे अशी लक्षणे दिसतात.
Ans: GBS (Guillain-Barré Syndrome) हा एक गंभीर आजार आहे जिथे रोगप्रतिकारशक्ती चुकून शरीरातील मज्जासंस्थेवर हल्ला करते, ज्यामुळे स्नायू कमकुवत होतात आणि हालचाल करणे कठीण होते.
Ans: पायांमध्ये मुंग्या येणे किंवा अशक्तपणा जाणवणे, जो हळूहळू हात आणि शरीराच्या वरच्या भागात पसरतो.
Ans: अनेकदा जिवाणू किंवा विषाणू संसर्गामुळे होते (उदा. पोट खराब करणारे जंतू) आणि दूषित पाणी किंवा अन्न खाल्ल्याने पसरू शकते.