Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

काळवंडलेल्या त्वचेवर येईल गोल्डन ग्लो! १० रुपयांच्या ‘या’ पदार्थाचा वापर करून घरीच बनवा ब्लीच

त्वचेच्या वाढत्या समस्या कमी करण्यासाठी जायफळ आणि स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या इतर पदार्थांचा वापर करून घरीच ब्लीच तयार करावे. यामुळे त्वचेवर जमा झालेली डेड स्किन नष्ट होण्यास मदत होते.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 11, 2026 | 09:54 AM
काळवंडलेल्या त्वचेवर येईल गोल्डन ग्लो! १० रुपयांच्या 'या' पदार्थाचा वापर करून घरीच बनवा ब्लीच

काळवंडलेल्या त्वचेवर येईल गोल्डन ग्लो! १० रुपयांच्या 'या' पदार्थाचा वापर करून घरीच बनवा ब्लीच

Follow Us
Follow Us:

धावपळीच्या जीवनशैलीमुळे त्वचेकडे लक्ष देण्यासाठी जास्त वेळ मिळत नाही. पण कामाचा वाढलेला तणाव, आहारात होणारे बदल आणि अपुऱ्या झोपेमुळे त्वचेच्या समस्या दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. हऱ्यावरचे ब्लॅकहेड्स, व्हाईट हेड्स, डेड स्किन, सुरकुत्या, काळे डाग, पिंपल्स आल्यानंतर त्वचा पूर्णपणे निस्तेज होऊन जाते. चेहऱ्यावर जमा झालेल्या डेड स्किनमुळे त्वचा काळी दिसू लागते आणि त्वचेवर ग्लो पूर्णपणे निघून जातो. त्वचा काळी पडल्यानंतर महिला बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या स्किन केअरचा वापर करतात. पण वारंवार केमिकल प्रॉडक्टचा वापर केल्यामुळे त्वचेच्या समस्या वाढू लागतात. याशिवाय पार्लरमध्ये जाऊन ब्लीच, फेशियल केल्यानंतर त्वचेवरील केस सोनेरी दिसू लागतात. त्यामुळे पार्लरमध्ये जाऊन ब्लीच करण्याऐवजी घरी या पदार्थाचा वापर करून त्वचा उजळदार करू शकता.(फोटो सौजन्य – istock)

चेहऱ्यावर आलेल्या काळ्या डागांमुळे त्वचा निस्तेज झाली आहे? मग जास्वदींच्या फुलांमध्ये मिक्स करा ‘हे’ पदार्थ, त्वचा होईल देखणी

घरच्याघरी ब्लीच करण्याची सोपी पद्धत:

चेहऱ्यावरील हरवलेला ग्लो पुन्हा परत मिळवण्यासाठी कायमच बाजारात उपलब्ध असलेले महागडे स्किन केअर वापरण्याऐवजी कोणतीही आवश्यकता नाही. स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या पदार्थांचा वापर करून तुम्ही त्वचेची काळजी घेऊ शकता. यासाठी वाटीमध्ये जायफळ पावडर घेऊन त्यात अर्धा चमचा कॉफी मिक्स करा. त्यानंतर त्यात हळद आणि कोरफड जेल घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या. तयार केलेले मिश्रण व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर ब्रशच्या मदतीने चेहऱ्यावर आणि मानेवर लावून काहीवेळ तसेच ठेवा. त्यानंतर हलक्या हाताने चेहऱ्यावर मसाज करा. मसाज केल्यामुळे त्वचेची गुणवत्ता सुधारते आणि डेड स्किन नष्ट होण्यास मदत होते.

मसाज करून झाल्यानंतर त्वचा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. ब्लीच केल्यामुळे त्वचा उजळदार आणि ग्लोइंग दिसते. याशिवाय चेहऱ्यावर जमा झालेली धूळ, माती आणि घाणीचे कण स्वच्छ करण्यासाठी ब्लीच करणे फायदेशीर आहे. वारंवार बाजारात उपलब्ध असलेल्या केमिकलचा प्रॉडक्टचा वापर केल्यास कालांतराने त्वचा अतिशय संवेदनशील होऊन जाते. ज्याच्या परिणामामुळे चेहऱ्यावर लगेच पिंपल्स किंवा फोड येतात आणि त्वचा सुकून जाते. त्वचेला वरून पोषण देण्यासोबतच आतून पोषण देणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे.

जपानी महिलांप्रमाणे पांढरीशुभ्र त्वचा हवी आहे? मग घरीच तयार करा Japanese Night Cream, त्वचेवर येईल ग्लो

जायफळमध्ये अँटीबॅक्टेरियल, अँटी इन्फ्लामेटरी, अँटीऑक्सिडंट्स गुणधर्म सुद्धा मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. त्यामुळे योग्य प्रमाणात त्वचेसाठी जायफळाचा वापर करावा. जायफळ लावल्यामुळे त्वचेवर वाढलेला काळेपणा कमी होतो आणि त्वचा सुंदर दिसते. कॉफी पावडरमध्ये नायट्रस ऑक्साईड सत्ता, ज्यामुळे त्वचेवरील डेड स्किन कमी होऊन त्वचा स्वच्छ होते. हळदीमध्ये असलेले अँटीबॅक्टेरियल गुणधर्म त्वचेवर आलेले पिंपल्स कमी करण्यास मदत करतात. त्यामुळे घरगुती पदार्थांचा वापर त्वचेसाठी करावा.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: घरच्या घरी नैसर्गिक ब्लीच बनवता येते का?

    Ans: होय, काही सौम्य घरगुती घटकांचा वापर करून त्वचेसाठी फेसपॅक किंवा ब्राइटनिंग मास्क तयार करता येतो. मात्र त्याला रासायनिक ब्लीचचा पर्याय समजू नये.

  • Que: १० रुपयांच्या पदार्थाचा त्वचेसाठी वापर कसा करावा?

    Ans: लेखात सांगितलेल्या पदार्थाचा वापर त्वचेच्या प्रकारानुसार योग्य घटकांसोबत मिसळून पॅकच्या स्वरूपात करता येतो. संवेदनशील त्वचा असल्यास विशेष काळजी घ्यावी.

  • Que: फेसपॅक वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट का करावी?

    Ans: नवीन घटकामुळे काही व्यक्तींना लालसरपणा, खाज किंवा जळजळ होऊ शकते. त्यामुळे चेहऱ्यावर वापरण्यापूर्वी हाताच्या छोट्या भागावर पॅच टेस्ट करणे योग्य आहे.

Web Title: Get a golden glow on dull skin make bleach at home using this ingredient costing just 10 rupees

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2026 | 09:54 AM

Topics:  

  • glowing face
  • home remedies
  • skin care tips

संबंधित बातम्या

चेहऱ्यावर आलेल्या काळ्या डागांमुळे त्वचा निस्तेज झाली आहे? मग जास्वदींच्या फुलांमध्ये मिक्स करा ‘हे’ पदार्थ, त्वचा होईल देखणी
1

चेहऱ्यावर आलेल्या काळ्या डागांमुळे त्वचा निस्तेज झाली आहे? मग जास्वदींच्या फुलांमध्ये मिक्स करा ‘हे’ पदार्थ, त्वचा होईल देखणी

केसांची मूळ कमकुवत झाली आहेत? मग ‘या’ हिरव्या पानांचा वापर करून घरीच तयार करा नॅचरल आयुर्वेदिक तेल, केस होतील घनदाट
2

केसांची मूळ कमकुवत झाली आहेत? मग ‘या’ हिरव्या पानांचा वापर करून घरीच तयार करा नॅचरल आयुर्वेदिक तेल, केस होतील घनदाट

जपानी महिलांप्रमाणे पांढरीशुभ्र त्वचा हवी आहे? मग घरीच तयार करा Japanese Night Cream, त्वचेवर येईल ग्लो
3

जपानी महिलांप्रमाणे पांढरीशुभ्र त्वचा हवी आहे? मग घरीच तयार करा Japanese Night Cream, त्वचेवर येईल ग्लो

तरुण वयात केस पांढरे झाले आहेत? आलं आणि लिंबाचा ‘या’ पद्धतीने वापर करून बनवा इन्स्टंट हेअर डाय, केस होतील काळेभोर
4

तरुण वयात केस पांढरे झाले आहेत? आलं आणि लिंबाचा ‘या’ पद्धतीने वापर करून बनवा इन्स्टंट हेअर डाय, केस होतील काळेभोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.