Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रात्रीच्या जेवणाला द्या पंजाबी तडका! घरी बनवा थंडीच्या वातावरणातील लोकप्रिय डिश ‘सरसो दा साग’ नि ‘मक्के दी रोटी’

पंजाबची चव आता तुमच्या घरात अनुभवा! आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत 'सरसो दा साग' आणि 'मक्के दी रोटी'ची एक चविष्ट रेसिपी. पंजाब राज्याची ही एक पारंपरिक डिश आहे जी थंडीच्या वातावरणात मोठ्या प्रमाणात खाल्ली जाते.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 30, 2025 | 09:31 AM
रात्रीच्या जेवणाला द्या पंजाबी तडका! घरी बनवा थंडीच्या वातावरणातील लोकप्रिय डिश 'सरसो दा साग' नि 'मक्के दी रोटी'

रात्रीच्या जेवणाला द्या पंजाबी तडका! घरी बनवा थंडीच्या वातावरणातील लोकप्रिय डिश 'सरसो दा साग' नि 'मक्के दी रोटी'

Follow Us
Follow Us:

रात्रीच जेवण ही एक अशी वेळ आहे जेव्हा घरातील सर्व मंडळी एकत्र बसून आपल्या जेवणाचा आस्वाद घेतात. बहुतेक घरात सर्व मंडळी कामाच्या निमित्ताने बाहेर असल्याचे रात्री जेवणाची वेळ सर्वांच्या एकत्र येण्याचे कारण बनते. अशात रात्रीच्या जेवणाला तुम्ही काहीतरी हटके, चवदार आणि आरोग्यासाठी पौष्टिक असं जेवण बनवू शकता. आज आम्ही तुमच्यासाठी पंजाबची पारंपरिक डिशची रेसिपी घेऊन आलो आहोत जी तुमच्या जेवणाची रंगत आणखीन वाढवेल.

नागपंचमीनिमित्त घर बनवा सुगंधी हळदीच्या पानांतील पातोळ्या, सणासुदीला हवा पारंपरिक पदार्थाचा गोडवा

सरसो दा साग आणि मक्के दी रोटी हे पारंपरिक पंजाबी जेवण खास करून थंडीच्या दिवसांत खूपच प्रसिद्ध आहे. सरसो (मोहरीच्या पानांचा साग) हा लोखंड, फायबर्स आणि अँटीऑक्सिडंट्सने भरलेला असून आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. तर मक्केची रोटी ही शरीराला उष्णता देणारी आणि सागासोबत खूपच स्वादिष्ट लागते. चला तर मग त्वरित जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

सरसो दा साग रेसिपी:

साहित्य:

  • मोहरीची पाने – २ कप (स्वच्छ धुऊन चिरलेली)
  • पालक – १ कप
  • बथुआ (ऐच्छिक) – ½ कप
  • हिरवी मिरची – २
  • लसूण पाकळ्या – ५-६
  • अद्रक – १ इंच तुकडा
  • कांदा – १ मध्यम (बारीक चिरलेला)
  • टोमॅटो – १ (चिरलेला)
  • मक्केचे पीठ – २ टेबलस्पून
  • मीठ – चवीनुसार
  • तूप / लोणी – २ टेबलस्पून
  • पाणी – आवश्यकतेनुसार
कृती:
  • यासाठी सर्वप्रथम सर्व हिरव्या भाज्या कुकरमध्ये १ कप पाण्यात, मिरची, लसूण आणि अद्रक घालून ३-४ शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घ्या.
  • कुकर थंड झाल्यावर सगळं मिश्रण थोडं थोडं मॅश करून घ्या किंवा मिक्सरमध्ये थोडंसं फिरवून घ्या (पूरेसं गाळून नाही, किंचित भरडच राहू द्या).
  • त्यात मक्क्याचं पीठ थोडं थोडं करून मिसळा, जेणेकरून सागाला थोडा जाडसरपणा येईल.
  • कढईत तूप गरम करून त्यात कांदा परतवा, मग टोमॅटो घालून मस्त परतून घ्या.
  • या फोडणीत सागाचे मिश्रण घालून मध्यम आचेवर १५-२० मिनिटे ढवळत शिजवा.
  • वरून थोडं बटर घाला आणि तयार साग खाण्यासाठी सर्व्ह करा.
चविष्ट सारण अन् कुरकुरीत ब्रेड… यंदाच्या पावसाळ्यात ‘ब्रेड पकोडा’ बनवून खाल्ला की नाही? सोपी रेसिपी नोट करा

मक्के दी रोटी रेसिपी:

साहित्य:

  • मक्क्याचे पीठ – २ कप
  • मीठ – चवीनुसार
  • गरम पाणी – लागेल तसं
  • तूप / लोणी – शेकण्यासाठी
कृती:
  • सर्वप्रथम मक्क्याच्या पिठात मीठ घालून गरम पाण्याने घट्टसर गोळा मळून घ्या.
  • पीठाचे लहान गोळे करून प्लास्टिकच्या दोन शीट्समधून थापून किंवा हाताने दाबून पोळी बनवा.
  • गरम तव्यावर ही रोटी दोन्ही बाजूंनी खरपूस भाजा. वरून तूप किंवा लोणी लावा.
  • गरम गरम सर्व्ह करा: ही रोटी गरम असतानाच सागासोबत खा.
टिप:

साजूक तुपात थोडं हिंग, लसूण आणि लाल मिरचीची तडका दिल्यास साग अजून चवदार लागतो.
साग व रोटीसोबत गूळ आणि लोणी दिल्यास पारंपरिक चव येते.

Web Title: Give punjabi tadka for dinner make popular winter dishe sarso da saag and makke di roti at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 30, 2025 | 09:31 AM

Topics:  

  • healthy recipe
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

Manchurian Chili Recipe : इंडो-चायनीज लव्हर्ससाठी खास, अशाप्रकारे घरी बनवा हाॅटेल स्टाईल ‘मंचुरियन चिली’
1

Manchurian Chili Recipe : इंडो-चायनीज लव्हर्ससाठी खास, अशाप्रकारे घरी बनवा हाॅटेल स्टाईल ‘मंचुरियन चिली’

विना गॅस आणि विना तेल तयार करा ‘हे’ झटपट स्नॅक! चवीशी अजिबात तडजोड नाही; शेजारीही नक्कीच विचारतील रेसिपी
2

विना गॅस आणि विना तेल तयार करा ‘हे’ झटपट स्नॅक! चवीशी अजिबात तडजोड नाही; शेजारीही नक्कीच विचारतील रेसिपी

Recipe : टी-टाईम स्नॅक्ससाठी आहे परफेक्ट, झटपट घरी बनवा टेस्टी चाॅकलेट बिस्कीट
3

Recipe : टी-टाईम स्नॅक्ससाठी आहे परफेक्ट, झटपट घरी बनवा टेस्टी चाॅकलेट बिस्कीट

Recipe : लहान मुलांच्या टिफीनसाठी तयार करा चीज पराठा, टिफिन मिनिटांत होईल फिनिश
4

Recipe : लहान मुलांच्या टिफीनसाठी तयार करा चीज पराठा, टिफिन मिनिटांत होईल फिनिश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.