
पांढऱ्या केसांसाठी कायमच केमिकल हेअर डायचा वापर करता? केसांना लावा 'या' हिरव्या पानांचा रस, केस होतील काळेभोर
Hair Care: सर्वच महिलांसह पुरुषसुद्धा केसांची खूप जास्त काळजी घेतात. नियमित हेअर केअर रुटीन, आठवड्यातून एकदा हेअर मास्क, हेअर स्पा तर काहीवेळा हेअर ट्रीटमेंट सुद्धा करून घेतल्या जातात. पण वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे आणि शरीरातील पोषक घटकांच्या कमतरतेमुळे तरुण वयात सुद्धा केस पांढरे होतात. केस पांढरे झाल्यानंतर ते काळे करण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेले वेगवेगळे हेअर डाय, कलर आणि इतर वेगवेगळ्या ट्रीटमेंट सुद्धा करून घेतल्या जातात. पण हेअर डायमध्ये असलेल्या अमोनियासारख्या घटकांमुळे केस कोरडे, रुक्ष आणि निस्तेज होऊन खूप जास्त गळू लागतात. केस गळू लागल्यामुळे ते पूर्णपणे पातळ होऊन जातात.(फोटो सौजन्य – istock)
वारंवार केमिकल प्रॉडक्टचा वापर केल्यामुळे केसांच्या मुळांना हानी पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे कायमच केमिकल प्रॉडक्ट वापरण्याऐवजी घरगुती उपाय करून केसांची काळजी घ्यावी. पांढरे केस नॅचरली काळे करण्यासाठी या हिरव्या पानांचा रस केसांवर लावावा, जेणेकरून केस काळे दिसतील आणि केसांच्या समस्या वाढणार नाहीत. नॅचरल हेअर डाय लावल्यामुळे केस हळूहळू काळेभोर आणि घनदाट होण्यास मदत होईल. चला तर जाणून घेऊया नॅचरल हेअर डाय बनवण्याची सोपी कृती.
हेअर डाय बनवण्यासाठी सर्वप्रथम, सुकलेली ऋषीची पाने पाण्यामध्ये टाकून उकळवून घ्या. पानांचा पूर्ण अर्क पाण्यात उतरल्यानंतर आणि मिश्रण घट्टसर झाल्यानंतर गॅस बंद करा. त्यानंतर मिश्रण पूर्णपणे थंड करण्यासाठी ठेवा. थंड झाल्यानंतर रोजच्या शाम्पूमध्ये तयार केलेले पानांचे मिश्रण मिक्स करून केसांच्या मुळांवर आणि पांढऱ्या केसांवर लावून हलक्या हाताने मसाज करा आणि १५ ते २० मिनिटं तसेच ठेवा. त्यानंतर पाण्याने केस स्वच्छ धुवून टाका. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा या पद्धतीने केसांवर ऋषीच्या पानांचे मिश्रण लावल्यास केस नॅचरली सॉफ्ट आणि काळेभोर दिसतील.
Hair Fall: शॅम्पूमुळे केस गळतात का? केसांच्या आरोग्यासाठी जाणून घ्या ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी
केसांसाठी नॅचरल प्रॉडक्टचा वापर करताना लगेच फरक दिसून येत नाही. यासाठी नेहमी नेहमी पदार्थांचा वापर करणे आवश्यक आहे. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा हेअर डाय लावून केसांची वाट लावून घेण्याऐवजी ऋषीची पाने लावून केस काळे भोर करावेत. जर तुमचे केस पूर्णपणे पांढरे झाले असतील तर एकदाच घरगुती उपाय करून केस काळे होणार नाहीत. यासाठी आठवड्यातून एकदा किंवा दोनदा ऋषीची पाने केसांना लावणे आवश्यक आहे.