
केसांना फुटलेल्या फाटल्यामुळे केस निस्तेज झाले आहेत? मग 'हे' घरगुती उपाय केसांसाठी ठरतील चमत्कारीत
मागील अनेक वर्षांपासून केसांची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी खोबऱ्याच्या तेलाचा वापर केला जात आहे. खोबऱ्याच्या तेलाने केसांना मालिश केल्यास केसांची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल. याशिवाय कोरड्या केसांना पोषण मिळेल. केसांना हायड्रेशन देण्यासाठी केसांना आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा खोबऱ्याचे तेल लावावे. रात्रभर ठेवल्यानंतर केस पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावेत. हा उपाय नियमित केल्यास केसांच्या बऱ्याच समस्यांपासून सुटका मिळेल.
त्वचेसोबत केसांची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी कोरफड जेलचा वापर केला जात आहे. कोरफडमध्ये असलेले घटक केसांसाठी अतिशय गुणकारी ठरतात. यासाठी ताज्या कोरडफचा गर वाटीमध्ये घेऊन त्यात थोडस खोबऱ्याचं तेल घालून मिक्स करा. त्यानंतर तयार केलेले मिश्रण केसांवर लावून हलक्या हाताने मसाज करा. ३० ते ४० मिनिटं ठेवून केस शॅम्पूचा वापर करून स्वच्छ धुवून घ्या. यामुळे केसांची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल.
लिंबाच्या वापरामुळे टाळूवर वाढलेला इन्फेक्शनचा धोका कमी होईल आणि केस स्वच्छ होतील. यासाठी वाटीमध्ये दही आणि लिंबाचा रस एकत्र मिक्स करून घ्या. तयार केलेले मिश्रण केसांवर लावून काहीवेळ तसेच ठेवा. त्यानंतर केसांना हलक्या हाताने मसाज करून केस शॅम्पूचा वापर करून स्वच्छ धुवून घ्या. यामुळे टाळूवर वाढलेला कोंडा कमी होईल आणि केस अतिशय सॉफ्ट होतील आणि केसांची खराब झालेली गुणवत्ता सुधारेल.
मुलतानी मातीचा वापर त्वचेसोबत केसांसाठी सुद्धा केला जात आहे. मुलतानी माती चेहऱ्यावर लावल्यामुळे त्वचेवरील अतिरिक्त तेल कमी होते आणि त्वचा चमकदार दिसते. त्वचेसोबतच केसांसाठी सुद्धा तुम्ही मुलतानी मातीचा वापर करू शकता. यासाठी वाटीमध्ये मुलतानी माती घेऊन त्यात गुलाबपाणी मिक्स करा. तयार केलेली पेस्ट केसांवर लावून काहीवेळ तशीच ठेवा. त्यानंतर केस पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.