सतत होणाऱ्या केस गळतीमुळे त्रस्त आहात? मग आवळा आणि कोरफडचा 'या' पद्धतीने करा वापर
हल्ली महिलांसह पुरुषांमध्ये सुद्धा केस गळतीची समस्या मोठ्या प्रमाणावर वाढू लागली आहे. बऱ्याचदा केस गळण्यास सुरुवात झाल्यानंतर लक्ष दिले जात नाही. पण वारंवार दुर्लक्ष केल्यामुळे केसांच्या समस्या आणखीनच वाढत जातात आणि केसांमध्ये टक्कल पडण्याची भीती निर्माण होते. सतत गळणाऱ्या केसांमुळे कमी वयातच टक्कल पडण्याची भीती असते. केसांच्या समस्या वाढू लागल्यानंतर महिला बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या हेअर केअर प्रॉडक्टचा वापर करतात. पण वारंवार केमिकल युक्त शॅम्पू आणि महागड्या सीरमचा वापर करतात. मात्र यामुळे केसांच्या समस्या कमी होण्याऐवजी आणखीनच वाढत जातात. केस गळणे, केसांमध्ये कोंडा होणे, टाळूवरील इन्फेक्शन इत्यादी केसांसंबधित समस्या वाढू लागल्यानंतर केसांची वाढ थांबते आणि लवकर नवीन केस येत नाहीत.(फोटो सौजन्य – istock)
केसांच्या समस्या वाढू लागल्यानंतर महागड्या ट्रीटमेंट किंवा इतर कोणतेही उपाय करण्याऐवजी घरगुती उपाय करून केसांची काळजी घ्यावी. घरगुती उपाय केल्यामुळे केस गळणे थांबते आणि नवीन केस येण्यास मदत होते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला केसांच्या वाढत्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी आवळा आणि कोरफडचा वापर कसा करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. यामुळे केसांमधील नैसर्गिक चमक टिकून राहते आणि केस अतिशय सुंदर दिसतात.
हेअर पॅक बनवण्यासाठी सर्वप्रथम, मोठ्या वाटीमध्ये आवळा पावडर, कोरफड जेल आणि खोबऱ्याचे तेल टाकून मिक्स करा. तयार केलेले मिश्रण व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर काहीवेळ तसेच ठेवा. त्यानंतर केस विंचरून केसांच्या मुळांपासून ते अगदी टोकापर्यंत संपूर्ण केसांना लावून घ्या. त्यानंतर ४५ मिनिटं ठेवून शॅम्पूच्या सहाय्याने केस स्वच्छ धुवून घ्या. यामुळे केसांच्या समस्या कमी होतील आणि केसांची वाढ होईल. कोरफड जेलमुळे केसांवरील नैसर्गिक चमक वाढेल आणि केस सुंदर दिसतील.
‘या’ जादुई तेलाने होईल केसातील कोंडा त्वरीत फुर्र, गुडघ्यापेक्षाही लांब आणि घनदाट होतील केस
आवळ्यामध्ये विटामिन सी मोठ्या प्रमाणावर आढळून येते. यामुळे त्वचेवर वाढलेले काळे डाग, रॅश आणि इतर समस्या कमी होते. आवळ्याचे सेवन केल्यामुळे केसांच्या मुळांना पोषण मिळते आणि केस चमकदार होतात. आवळ्यामध्ये विटामिन सी, खनिजे आणि अँटी -ऑक्सिडंट्स इत्यादी आवश्यक घटक टाळूवर वाढलेले इन्फेक्शन कमी करतात आणि केस सुंदर करण्यासाठी मदत करतात. कोरफड गरचा वापर केल्यामुळे केसांवरील चमक कायम टिकून राहते आणि केस अतिशय मऊ होतात.






