Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सतत होणाऱ्या गॅसमुळे अपचनाचा त्रास वाढला आहे? ‘या’ पद्धतीने करा हिंगाचे सेवन, आतड्यांमधील घाण पडून जाईल बाहेर

गॅस आणि अपचनाच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी हिंगाचा लेप तयार करून पोटावर लावावा. यामुळे गॅस नष्ट होण्यासोबतच आतड्यांमधील घाण बाहेर पडून जाईल आणि शरीराला सुद्धा फायदे होतील.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 28, 2026 | 05:30 AM
सतत होणाऱ्या गॅसमुळे अपचनाचा त्रास वाढला आहे? 'या' पद्धतीने करा हिंगाचे सेवन, आतड्यांमधील घाण पडून जाईल बाहेर

सतत होणाऱ्या गॅसमुळे अपचनाचा त्रास वाढला आहे? 'या' पद्धतीने करा हिंगाचे सेवन, आतड्यांमधील घाण पडून जाईल बाहेर

Follow Us
Follow Us:

हिंगाचे गुणकारी फायदे?
अपचन कशामुळे होते?
अपचन, गॅस आणि पोटफुगीवर घरगुती उपाय?

रोजच्या आहारात सगळ्यांचं तिखट, तेलकट आणि चमचमीत पदार्थ खायला खूप जास्त आवडतात. जेवणाच्या ताटात एक तरी पदार्थ खूप जास्त तेलाचा आणि मसाल्याचा वापर करून बनवला जातो. पण सतत तिखट किंवा तेलकट पदार्थ खाणे शरीरासाठी अजिबात चांगले नाही. यामुळे शरीरात कोलेस्ट्रॉल वाढण्यासोबतच गॅस, अपचनाचा त्रास सुद्धा वाढू लागतो. पोटात वाढलेला गॅस संपूर्ण शरीराच्या कार्यात अडथळे निर्माण करतो. तिखट किंवा अतितेलकट पदार्थ पचन होण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो. हे पदार्थ काहीवेळा व्यवस्थित पचन न झाल्यामुळे पुन्हा एकदा अन्ननलिकेमध्ये परत येतात. त्यामुळे सर्वच ऋतूंमध्ये सहज पचन होणाऱ्या पदार्थांचे आवर्जून सेवन करावे. ऍसिडिटी झाल्यानंतर उलट्या, मळमळ, डोकेदुखीचा त्रास वाढू लागतो. या सर्व त्रासांपासून सुटका मिळवण्यासाठी हिंगाचे सेवन करावे. आज आम्ही तुम्हाला गॅस आणि अपचनाच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी हिंगाचे सेवन कशा पद्धतीने करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – istock)

कोरड्या खोकल्यामुळे हैराण झाला आहात? मग ‘हे’ घरगुती उपाय करून मिळवा कायमचा आराम, कायमच राहाल निरोगी

अपचनाच्या त्रासावर गुणकारी ठरेल हिंग:

जेवण बनवताना हिंगाचा वापर केला जातो. हिंगाच्या वापरामुळे ऍसिडिटी होत नाही किंवा अपचन होत नाही. मागील अनेक वर्षांपासून हिंगाचा वापर केवळ जेवण बनवण्यासाठी नाहीतर शरीरासाठी सुद्धा केला जात आहे. अपचन, गॅस आणि पोटफुगी यांसारख्या समस्या उद्भवू लागल्यास हिंगाचे सेवन करावे किंवा हिंगाचा लेप पोटावर लावावा. आयुर्वेदामध्ये हिंगाला मसाल्याचे स्थान देण्यात आले आहे. हिंगाचा लेप बनवण्यासाठी सर्वप्रथम, हातावर चिमूटभर हिंग घेऊन त्यात कोमट पाणी मिक्स करून मिश्रण बनवा. तयार केलेला लेप पोटावर लावून ठेवा.

हिंगाचा लेप नाभीच्या आतमध्ये लावू नये. यामुळे जळजळ वाढू शकते. लेप लावल्यामुळे पोटदुखी, अपचन आणि गॅसच्या समस्येपासून आराम मिळेल. दैनंदिन आहारात बऱ्याचदा तिखट किंवा तेलकट पदार्थ खाल्ल्यानंतर ऍसिडिटी वाढते, अशावेळी हिंगाचा लेप पोटावर लावल्यास गॅस कमी होईल. खाल्लेले अन्नपदार्थ व्यवस्थित पचन न झाल्यास गॅस होतो. हा गॅस कमी करण्यासाठी हिंगाचा लेप पोटावर लावावा. अस्वस्थता, पोटात गुडगुड होणे किंवा जडपणा जाणवू लागल्यास अर्धा ग्लास कोमट पाण्यात चिमूटभर हिंग टाकून मिक्स करा आणि सेवन करा.

Foods For Colon Cancer: आतड्यांचा कॅन्सर होऊ नये म्हणून आहारात करा ‘या’ पदार्थांचे सेवन, लक्षणे दिसण्याधीच आतडे होतील मजबूत

हिंगाचे पाणी प्यायल्यामुळे आतड्यांमध्ये जमा झालेली घाण बाहेर पडून जाण्यास मदत होईल आणि शरीर स्वच्छ होईल. पण हिंगाचा वापर मर्यादित प्रमाणात करावा. हिंगाचा लेप लावल्यानंतर त्वचेवर जळजळ, खाज किंवा लालसरपणा जाणवू लागल्यास लगेच लेप पाण्याने स्वच्छ धुवून टाकावा. सतत पोटदुखी, उलट्या, जुलाब किंवा इतर कोणतीही लक्षणे दिसू लागल्यास हिंगावर अवलंबून न राहता डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते उपचार करावेत. हिंगाचा लेप हा पारंपरिक उपचार पद्धतीमध्ये येतो.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: सतत गॅस आणि अपचन होण्याची कारणे कोणती?

    Ans: चुकीचा आहार, जास्त तळलेले किंवा मसालेदार पदार्थ खाणे, कमी पाणी पिणे, पटकन जेवणे, बद्धकोष्ठता आणि पचनक्रिया मंद होणे यामुळे गॅस व अपचनाचा त्रास होऊ शकतो.

  • Que: हिंग पचनासाठी कसा फायदेशीर ठरू शकतो?

    Ans: हिंगाचा वापर पारंपरिकरित्या पचन सुधारण्यासाठी केला जातो. तो पोटातील फुगणे, गॅस आणि अस्वस्थता कमी करण्यास काही प्रमाणात मदत करू शकतो.

  • Que: गॅससाठी हिंगाचे सेवन कसे करावे?

    Ans: हिंगाचा अतिशय कमी प्रमाणात वापर जेवणात केला जाऊ शकतो. काही लोक कोमट पाण्यात थोडा हिंग मिसळून घेतात, मात्र कोणत्याही घरगुती उपायाचा अतिरेक टाळावा.

Web Title: Has persistent gas aggravated your indigestion consume asafoetida in this way to flush out waste from your intestines

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 28, 2026 | 05:30 AM

Topics:  

  • acidity
  • Health Care Tips
  • home remedies

संबंधित बातम्या

पोटात साचून राहिलेल्या गॅसमुळे अपचनाच्या समस्या वाढल्या आहेत? ‘या’ पद्धतीने करा ओव्याचे सेवन, पचनक्रिया राहील सुरळीत
1

पोटात साचून राहिलेल्या गॅसमुळे अपचनाच्या समस्या वाढल्या आहेत? ‘या’ पद्धतीने करा ओव्याचे सेवन, पचनक्रिया राहील सुरळीत

ब्लॅकहेड्स- टॅनिंगमुळे त्वचा निस्तेज झाली आहे? मग चमचाभर मसूर डाळीचा ‘या’ पद्धतीने करा वापर, नॅचरल स्क्रबने त्वचा दिसेल सुंदर
2

ब्लॅकहेड्स- टॅनिंगमुळे त्वचा निस्तेज झाली आहे? मग चमचाभर मसूर डाळीचा ‘या’ पद्धतीने करा वापर, नॅचरल स्क्रबने त्वचा दिसेल सुंदर

मान आणि पाठीवर साचलेला मळ दूर करायचाय? मग घरीच अशाप्रक्रारे तयार करा बेसन-दह्याचा नैसर्गिक क्लींजर
3

मान आणि पाठीवर साचलेला मळ दूर करायचाय? मग घरीच अशाप्रक्रारे तयार करा बेसन-दह्याचा नैसर्गिक क्लींजर

Sweets Cravings: सतत गोड खावंसं का वाटतं? शरीराच्या ‘या’ संकेतांकडे दुर्लक्ष करू नका
4

Sweets Cravings: सतत गोड खावंसं का वाटतं? शरीराच्या ‘या’ संकेतांकडे दुर्लक्ष करू नका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.