ब्रायडल ग्लोसाठी महागड्या स्किन केअरचा वापर करण्याऐवजी नियमित प्या 'हे' ज्यूस, महिनाभरात त्वचा होईल सुंदर
स्ट्रॉबेरी, ब्लू बेरीचे सेवन केल्यामुळे चेहऱ्यावरील ग्लो वाढतो आणि त्वचा चमकदार दिसते. तसेच भिजवलेले चिया सीड्स फळांच्या ज्यूसमध्ये मिक्स करून पिऊ शकता. चिया सीड्समध्ये फायबर, ओमेगा ३, फॅटी ॲसिड, मिनरल्स इत्यादी घटक असतात.
काकडी, पुदिन्याचा ज्यूस एकत्र करून प्यायल्यास शरीरात वाढलेली उष्णता कमी होते आणि त्वचेची पीएच पातळी संतुलित राहण्यास मदत होते. त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी काकडीचा ज्यूस प्यावा.
गाजर आणि बीटचा एकत्र ज्यूस प्यायल्यास रक्त शुद्ध होण्यासोबतच त्वचा स्वच्छ होते. चेहऱ्यावर आलेले काळे डाग आणि सुरकुत्या कमी करण्यासाठी बीट आणि गाजरचा रस प्यावा.
हिवाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर बाजारात मोठ्या प्रमाणावर आवळे उपलब्ध असतात. आवळ्यांमध्ये असलेले विटामिन सी, लोह, ॲण्टीऑक्सिडंट्स आणि इतर घटक त्वचेची गुणवत्ता सुधारतात.
लिंबामध्ये खूप जास्त विटामिन सी असते. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर नियमित उपाशी पोटी एक ग्लास कोमट पाण्यात लिंबाचा रस मिक्स करून प्यावा. यामुळे गट हेल्थ सुद्धा चांगले राहते.