Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 22 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Food recipe: आवळ्याचा गोड लोणचा कधी खाल्लाय का? घरच्या घरी बनवा झटपट आणि चविष्ट रेसिपी

Food recipe: आंबट-गोड चवीचे आवळ्याचे लोणचे घरी बनवायचे आहे? जाणून घ्या आवळ्याचे गोड लोणचे बनवण्यासाठी लागणारे साहित्य, सोपी कृती आणि लोणचे साठवण्याची योग्य पद्धत.

  • By Siddhi Berde
Updated On: Nov 22, 2026 | 03:25 PM
Have you ever tried sweet amla (Indian gooseberry) pickle? (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Have you ever tried sweet amla (Indian gooseberry) pickle? (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • आवळ्याच्या गोड लोणच्यासाठी आवळे, गूळ, लाल तिखट आणि विविध मसाल्यांचा वापर करून घरच्या घरी चविष्ट लोणचे तयार करता येते.
  • आवळे उकडून त्यात मसाल्यांची फोडणी आणि गूळ मिसळल्याने लोणच्याला आंबट-गोड आणि किंचित तिखट अशी चव येते.
  • लोणचे स्वच्छ, कोरड्या काचेच्या बरणीत साठवा आणि नेहमी कोरडा चमचा वापरा. अधिक काळ टिकवण्यासाठी ते फ्रिजमध्ये ठेवणे योग्य ठरते.

आवळा हा आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानला जातो. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. आवळ्यापासून मुरंबा, चटणी, सरबत आणि लोणचे असे विविध पदार्थ बनवता येतात. त्यापैकी आवळ्याचा गोड लोणचा हा अनेकांच्या आवडीचा पदार्थ आहे. या लोणच्याची चव आंबट, गोड आणि किंचित तिखट असल्यामुळे जेवणाची रंगत वाढते. विशेष म्हणजे हे लोणचे बनवण्यासाठी जास्त वेळ किंवा फार मेहनत घ्यावी लागत नाही. घरातील काही मोजक्या साहित्याचा वापर करून तुम्ही सहज आवळ्याचा गोड लोणचा तयार करू शकता.(Food recipe)

आवळ्याचं लोणचं बनवण्यासाठी आवश्यक आवश्यक साहित्य

आवळ्याचा गोड लोणचा बनवण्यासाठी ५०० ग्रॅम आवळे, ३०० ग्रॅम गूळ, २ चमचे लाल तिखट, १ चमचा मोहरीची डाळ, अर्धा चमचा मेथीदाणे, अर्धा चमचा हळद, १ चमचा जिरेपूड, १ चमचा बडीशेप, चिमूटभर हिंग, २ ते ३ चमचे तेल आणि चवीनुसार मीठ घ्यावे. आवळ्याच्या आंबटपणानुसार गुळाचे प्रमाण कमी-जास्त करू शकता. यामुळे लोणच्याला योग्य गोडवा येतो आणि त्याची चव अधिक छान लागते.

Home Remedies: मानेवर वाढलेल्या टॅनिंगमुळे त्वचा काळी दिसते? मग स्वयंपाक घरातील ‘या’ पदार्थांचा वापर करून बनवा मास्क

लोणचं बनवण्याची कृती जाणून घेऊया.

सर्वप्रथम आवळे स्वच्छ धुऊन घ्या. एका भांड्यात पाणी गरम करून त्यामध्ये आवळे मऊ होईपर्यंत उकळून घ्या. आवळे थंड झाल्यानंतर त्यांच्या पाकळ्या वेगळ्या करून बिया काढून टाका. आता कढईमध्ये तेल गरम करून त्यात मोहरीची डाळ, मेथीदाणे, बडीशेप आणि हिंग घालून फोडणी तयार करा. त्यानंतर त्यात हळद, लाल तिखट, जिरेपूड आणि मीठ घालून मसाला व्यवस्थित परतून घ्या. या मसाल्यामध्ये आवळ्याच्या पाकळ्या घालून एकजीव करा. त्यानंतर किसलेला गूळ घालून मंद आचेवर मिश्रण शिजवा. गूळ पूर्णपणे वितळून आवळ्याला घट्टसर पाक तयार होईपर्यंत अधूनमधून हलवत राहा. लोणचे तयार झाल्यानंतर गॅस बंद करून ते पूर्णपणे थंड होऊ द्या.

Home decor: घर सजवण्याच्या ८ आकर्षक पद्धती; कमी खर्चात घराला द्या मॉडर्न आणि सुंदर लुक

लोणचे साठवण्याची योग्य पद्धत कोणती आहे.

तयार झालेले आवळ्याचे गोड लोणचे स्वच्छ आणि कोरड्या काचेच्या बरणीत भरून ठेवा. लोणच्यामध्ये पाण्याचा किंवा ओलाव्याचा अंश राहणार नाही याची विशेष काळजी घ्या. लोणचे काढण्यासाठी नेहमी स्वच्छ आणि कोरडा चमचा वापरा. जास्त काळ टिकवण्यासाठी लोणचे फ्रिजमध्ये ठेवणे चांगले. हे चविष्ट आंबट-गोड लोणचे पोळी, पराठा, भाकरी किंवा वरण-भातासोबत खायला अतिशय छान लागते. घरच्या घरी तयार केलेला हा पदार्थ जेवणात वेगळीच चव आणतो.

💡

Frequently Asked Questions

  • Que: आवळ्याचे गोड लोणचे बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते?

    Ans: आवळे, गूळ, लाल तिखट, मोहरीची डाळ, मेथीदाणे, हळद, जिरेपूड, बडीशेप, हिंग, तेल आणि मीठ या साहित्याचा वापर करून आवळ्याचे गोड लोणचे बनवता येते.

  • Que: आवळ्याचे गोड लोणचे कसे बनवावे?

    Ans: आवळे उकडून त्यांच्या पाकळ्या वेगळ्या करा. त्यानंतर तेलात मसाल्यांची फोडणी करून त्यात आवळे आणि गूळ मिसळा. मिश्रण घट्टसर होईपर्यंत मंद आचेवर शिजवा आणि थंड झाल्यावर बरणीत भरा.

  • Que: आवळ्याचे गोड लोणचे जास्त काळ टिकवण्यासाठी काय करावे?

    Ans: लोणचे स्वच्छ आणि पूर्णपणे कोरड्या काचेच्या बरणीत साठवा. लोणचे काढण्यासाठी कोरडा चमचा वापरा आणि ते फ्रिजमध्ये ठेवा. टिकण्याचा कालावधी साहित्यामधील ओलावा आणि साठवणुकीच्या स्वच्छतेवर अवलंबून असतो.

Web Title: Have you ever tried sweet amla indian gooseberry pickle sb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 22, 2026 | 03:25 PM

Topics:  

  • Best Food Tips
  • food
  • Healthy Foods

संबंधित बातम्या

Health care: फ्रिजमध्ये कोणते पदार्थ ठेवू नयेत? जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
1

Health care: फ्रिजमध्ये कोणते पदार्थ ठेवू नयेत? जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी

health tips: हिवाळ्यामध्ये आहारात कोणकोणत्या पदार्थांचा समावेश करावा?
2

health tips: हिवाळ्यामध्ये आहारात कोणकोणत्या पदार्थांचा समावेश करावा?

Food Recipe: दहा मिनिटात आणि कमी तेलाचा वापर करून बनवा एक आरोग्यदायी आणि स्वादिष्ट रेसिपी
3

Food Recipe: दहा मिनिटात आणि कमी तेलाचा वापर करून बनवा एक आरोग्यदायी आणि स्वादिष्ट रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.