
तुम्ही कधी Paneer Shawarma खाल्ला आहे का? मऊ ब्रेडमध्ये रोल केलेले स्मोकी आणि झणझणीत पनीर खाल तर पदार्थाचे फॅन व्हाल
शॉवर्मा ही एक लोकप्रिय मिडल ईस्ट डिश असून ती भारतात देखील खूपच लोकप्रिय झाली आहे. वास्तविक हा पदार्थ चिकनपासून तयार केला जातो मात्र आज आम्ही तुमच्यासाठी याचे एक व्हेज व्हर्जन म्हणजेच पनीर शॉवर्माची एक स्वादिष्ट रेसिपी घेऊन आलो आहोत. गरमागरम पनीर मसाल्याने माखलेले, भाजलेले आणि सॉस, कोशिंबीरसह रोलमध्ये गुंडाळलेला हा शॉवर्मा काय भारीच लागतो!
भाजी काय बनवावी सुचत नाही? ५ मिनिटांमध्ये झटपट बनवा चमचमीत कांद्याची चटणी, नोट करा रेसिपी
तुम्ही पनीर लव्हर्स असाल तर तुम्हाला ही रेसिपी नक्कीच खूप आवडेल. व्हेज खाद्यपदार्थांमध्ये पनीर हा सर्वांच्या आवडीचा आहे. हा फक्त चावीलाच चांगला नाही तर आरोग्यासाठीही तितकाच फायदेशीर आहे. यात प्रथिने, कॅल्शियम आणि इतर पोषक तत्वांचा समृद्ध स्रोत असल्याने, पनीर हाडांसाठी, स्नायूंच्या वाढीसाठी आणि शरीराच्या इतर कार्यांसाठी खूप महत्वाचे आहे. अनेकांना असे वाटते की शॉवर्मा हा चिकनपासूनच तयार केला जातो मात्र असे नाही आम्ही तुम्हाला सांगतो की, तुम्ही हा पदार्थ पनीरपासूनही तयार करु शकता. चला तर मग यासाठी लागणारे साहित्य आणि कृती जाणून घेऊया.
(पनीर मॅरिनेशनसाठी)