Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तुम्ही तुमच्या मुलीला दिली का HPV लस? लसीकरणाने करा कॅन्सरपासून सुरक्षित

महिलांमध्ये सध्या सर्वाधिक आढळणारा कर्करोग म्हणजे सर्व्हायकल कॅन्सर. यासाठी HPV अर्थात लसीकरणाला सुरूवात झाली आहे आणि आपल्या मुलींना सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्ही हे करायला हवे आणि काय आहे त्याचा फायदा जाणून घ्या

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jan 25, 2025 | 11:49 AM
एचपीव्ही लसीकरणाचे महत्त्व काय आहे

एचपीव्ही लसीकरणाचे महत्त्व काय आहे

Follow Us
Close
Follow Us:

सर्व्हायकल कॅन्सर म्हणजेच गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग. हा महिलांमध्ये आढळणारा दुसरा सर्वात गंभीर कर्करोग असून या कर्करोगामुळे दरवर्षी 3,00,000 पेक्षा जास्त मृत्यू होतात. गर्भशयाच्या मुखाच्या कॅन्सरची बहुतांश प्रकरणं ही याच एचपीव्ही विषाणूमुळे होत असतात.  त्यासंबंधित वॅक्सिनमुळे गर्भाशय मुखाच्या कॅन्सरला प्रतिबंध करता येतो. जागतिक आरोग्य संघटनेने सांगितल्याप्रमाणे 2030 पर्यंत एचपीव्हीचे 90 टक्के लसीकरण पूर्ण करून येत्या शतकात हा आजार हद्दपार करण्याचे उद्दिष्ट आहे.

लैंगिक दृष्ट्या सक्रिय होण्याआधी, पौगंडावस्थेतल्या मुलामुलींना ही लस दिली तर प्रभावी ठरते. कारण एचपीव्ही संक्रमण हे लैंगिक संबंधांदरम्यान होतं आणि ही लस केवळ संसर्ग टाळू शकते, संसर्ग झाल्यानंतर ती काम करत नाही.जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार या लशीचे एक किंवा दोन डोस दिले जाऊ शकतात. रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्या लोकांना दोन किंवा तीन डोस देण्याची सूचनाही जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) दिली आहे.

काय सांगतात तज्ज्ञ

डॉ. तेजल गोरासिया, स्तन आणि स्त्री कर्करोग तज्ज्ञ/ऑन्को सर्जन, ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटर, सातारा यांनी सांगितले की, गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा एकमेव असा कर्करोग आहे जो लसीकरणाद्वारे प्रतिबंध करता येतो. प्रत्येकाने आपल्या घरातील मुलींना गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाविरूद्ध लसीकरण करण्याची शपथ घेत त्यांना निरोगी आयुष्याची भेट देऊ शकता. 

एचपीव्हीचे 100 पेक्षा जास्त प्रकार असून संक्रमणांमुळे सहसा कोणतीही लक्षणे उद्भवत नाहीत. मात्र काही प्रकारात अंगावर चट्टे उठू शकतात. हे चट्टे हातावर, पायावर, गुप्तांगांवर किंवा तोंडाच्या आत दिसू शकतात. एचपीव्ही संसर्गाच्या काही प्रकारांमुळे गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होऊ शकतो. गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा बहुतेक एचपीव्ही-16 आणि 18 मुळे होतो

काय आहे Cervical Cancer ची ओळख? साधेसे संकेतही ठरतील जीवघेणे

सर्वाधिक प्रमाण सर्व्हायकल कॅन्सरचे 

भारतीय महिलांमध्ये स्तन कर्करोगानंतर सर्वाधिक प्रमाणात गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचे अर्थात सर्व्हायकल कॅन्सरचे प्रमाण जास्त आहे. दरवर्षी भारतात सुमारे १ लाख २५ हजार महिलांना या कर्करोगाचे निदान होते व त्यातील ७५ हजार जणींचा मृत्यू होतो. यातील बहुतांश, म्हणजे ९५ टक्के महिलांना ह्यूमन पापिलोमाव्हायरसमुळे (एचपीव्ही) हा कर्करोग होतो. गर्भाशय मुखातील पेशींच्या अनियंत्रित वाढीमुळे कर्करोगाचा धोका उद्भवत असल्याचे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे. 

काय आहेत कारणे 

असुरक्षित लैंगिक संबंध, एकाधिक लैंगिक भागीदार, लैंगिक संक्रमणातून होणारे आजार, गर्भनिरोधक गोळ्यांचा दीर्घकालीन वापर, धूम्रपान ही सर्व्हायकल कॅन्सरची प्रमुख कारणे आहेत. नियमित तपासणी, अचूक निदान आणि लसीकरण हे गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण करण्याचे तीन प्रभावी मार्ग आहेत. या कर्करोगापासून बचाव करण्याबाबत जागरूकता खूपच कमी आहे. चिंताजनक बाब म्हणजे सर्वसाधारण १० टक्क्यांपेक्षा कमी महिला या तपासणी करतात. या कर्करोगाची कोणतीही लक्षणे नसतानाही महिलांनी पॅप स्मीअर तपासणी करणे आवश्यक असते. 

ही लस कशी देता येते

ही लस मुलींना देता येते. जागतिक आरोग्य संघटनेने म्हटल्याप्रमाणे, २०३० पर्यंत एचपीव्हीचे ९० टक्के लसीकरण पूर्ण करून येत्या शतकात हा आजार हद्दपार करण्याचे उद्दिष्ट आहे. जगभरातील जवळपास १४० देशांनी आता एचपीव्हीचे लसीकरण सुरू केले असून साताऱ्यातील ऑन्को लाईफ केअर कॅन्सर सेंटरच्या वतीने २०२२ पर्यंत १५९८ महिलांनी लसीकरण केले आहे. यामध्ये २० वर्षावरील ८५६ महिला तर २० वर्षाखालील ३४५  तरुणींनी लसीकरण केले आहे. १० जून २०२३ पर्यंत ३४५ महिलांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे तर, २० वर्षांपेक्षा कमी वयातील ४३ तरुणींनी लसीकरण केल्याची माहिती डॉ. प्रसाद कवारे, बीडीएस ऑन्कोडेंटिस्ट आणि संसर्ग नियंत्रण आणि लसीकरण विभागाचे प्रमुख यांनी दिली.

Cervical Cancer: लसीकरणाने प्रतिबंध करता येणार गर्भाशयाचा कर्करोग, तज्ज्ञांचा सल्ला

कधी द्यावी लस 

लैंगिकदृष्ट्या सक्रिय होण्याआधी पौगंडावस्थेत मुलींना ही लस दिली तर प्रभावी ठरते. अगदी ३५ ते ४५ वर्षे वयोगटातील प्रौढ महिला देखील या लसीसाठी पात्र आहेत, अशी माहिती तज्ज्ञांनी दिली. रुटीन पॅप स्मीअर किंवा एचपीव्ही चाचणी ग्रीवाच्या पेशींमध्ये बदल शोधण्यात मदत करू शकते. महिलांनी वयाच्या ३० वर्षांनंतर दर पाच ते दहा वर्षांनी ही तपासणी करत राहावी. त्याच वेळी, एचआयव्ही पॉझिटिव्ह महिलांनी वयाच्या 25 व्या वर्षापासून दर तीन वर्षांनी चाचणी घेणे सुरू केले पाहिजे.

Web Title: Have you given your daughter the hpv vaccine protect her from cancer with vaccination

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 25, 2025 | 11:49 AM

Topics:  

  • Cervical Cancer
  • Health Tips

संबंधित बातम्या

दिल्लीत दर 3 व्यक्तींपैकी 1 व्यक्ती Diabetes ग्रस्त, का वाढतोय आजार; काय आहेत कारणे
1

दिल्लीत दर 3 व्यक्तींपैकी 1 व्यक्ती Diabetes ग्रस्त, का वाढतोय आजार; काय आहेत कारणे

वेळेआधीच मुली झाल्या तरूण; सुरु झाली मासिक पाळी, 40 व्या वर्षीच व्हाल म्हातारे! लठ्ठपणा, डायबिटीसचा पडेल घेरा
2

वेळेआधीच मुली झाल्या तरूण; सुरु झाली मासिक पाळी, 40 व्या वर्षीच व्हाल म्हातारे! लठ्ठपणा, डायबिटीसचा पडेल घेरा

Condom Risks: ‘अशा’ पद्धतीने कंडोम वापरला तर धोका निश्चित, 5 सत्यता जाणून हादरून जाल
3

Condom Risks: ‘अशा’ पद्धतीने कंडोम वापरला तर धोका निश्चित, 5 सत्यता जाणून हादरून जाल

Baba Ramdev ने सांगितला रक्त वाढविण्याचा देशी जुगाड, बुलेट स्पीडने 7 दिवसात 7 पासून 14 पर्यंत जाईल Hemoglobin
4

Baba Ramdev ने सांगितला रक्त वाढविण्याचा देशी जुगाड, बुलेट स्पीडने 7 दिवसात 7 पासून 14 पर्यंत जाईल Hemoglobin

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.