
दोनदा गर्भपाताच्या गोळ्या खाल्ल्यानंतर गरोदर न राहिल्याचे काय होते कारण (फोटो सौजन्य - Freepik)
यानंतर, जेव्हा महिलेने पुन्हा गर्भधारणा करण्याचा प्रयत्न केला तेव्हा ती गर्भवती राहू शकली नाही. महिलेची समस्या ऐकल्यानंतर, डॉक्टरांना केसचा संपूर्ण इतिहास कळला आणि त्यानंतरच खरी समस्या समोर आली. पण ही समस्या नक्की कोणती होती आणि सध्या महिलांना अशी समस्या उद्भवू शकते याबाबत अधिक माहिती आपण घेऊया.
गेल्या दोन वर्षांपासून हे जोडप्याचा गर्भधारणेचा प्रयत्न
एका इन्स्टाग्राम व्हिडिओमध्ये, प्रजनन तज्ज्ञ डॉ. महिमा स्पष्ट करतात की, २७ वर्षीय एक जोडपे अलीकडेच त्यांच्याकडे सल्लामसलत करण्यासाठी आले होते. या जोडप्याचे लग्न सहा वर्षांपासून झाले होते आणि गेल्या दोन वर्षांपासून ते गर्भधारणेचा प्रयत्न करत होते, परंतु प्रत्येक वेळी त्यांना निराशाच मिळाली. अनेक प्रयत्न करूनही, ती महिला गर्भवती राहू शकली नाही, ज्यामुळे जोडप्यावर मानसिक ताण निर्माण झाला.
वय वर्ष 27, 3 वेळा आई होता होता झाले Miscarriage,1 टेस्ट आणि समोर आलं कारण बसला धक्का…
दोन वेळा राहिली होती गरोदर
तज्ज्ञांनी स्पष्ट केले की, जेव्हा जोडप्याचा वैद्यकीय इतिहास तपासला गेला तेव्हा असे दिसून आले की ती महिला यापूर्वी दोनदा गर्भवती होती आणि दोन्ही वेळा तिने MTP गोळ्या घेतल्या होत्या. पहिल्या वेळी गोळी घेतल्यानंतर, थोड्या काळासाठी रक्तस्त्राव झाला, नंतर हा रक्तस्राव स्वतःहून थांबला आणि महिलेचे आयुष्य पूर्ववत झाले होते.
दुसऱ्यांदा गोळी घेतल्यानंतर रक्तस्त्राव थांबला नाही
स्त्रीरोगतज्ज्ञांच्या मते, जेव्हा ती महिला दुसऱ्यांदा गर्भवती झाली तेव्हा तिने गर्भपात करण्यासाठी एमटीपी गोळी घेतली. पण यावेळी परिस्थिती वेगळी होती कारण, रक्तस्राव थांबण्याऐवजी, जवळजवळ दोन महिने होत राहिला. काळजीत पडलेल्या महिलेने अनेक डॉक्टरांचा सल्ला घेतला. विविध स्कॅन आणि चाचण्या करण्यात आल्या, परंतु अहवालात कोणतीही मोठी समस्या आढळली नाही आणि सर्व काही सामान्य असल्याचे निष्पन्न झाले होते.
पती-पत्नींचे अहवाल सामान्य
तज्ज्ञांनी पुढे स्पष्ट केले की दुसऱ्यांदा रक्तस्त्राव थांबल्यानंतर सुमारे एक वर्षानंतर, जेव्हा महिलेने पुन्हा गर्भधारणा करण्याचा प्रयत्न केला तेव्हा ती गर्भवती राहू शकली नाही. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, पती-पत्नी दोघांचेही अहवाल सामान्य होते. आवश्यक त्या सर्व चाचण्या व्यवस्थित परत आल्या, परंतु तरीही, जोडप्याला गर्भधारणा होऊ शकली नाही.
नक्की काय होती समस्या
डॉक्टर स्पष्ट करतात की महिलेचा संपूर्ण इतिहास काळजीपूर्वक ऐकल्यानंतर आणि तिच्या मागील गर्भधारणेदरम्यान घडलेल्या घटनांशी जोडल्यानंतरच तिला खरे कारण कळले. खरं तर, मागील गर्भधारणा संपवण्यासाठी गोळी घेतल्यानंतर झालेल्या दीर्घ रक्तस्त्रावादरम्यान महिलेला अँटीबायोटिक्स देण्यात आले होते, परंतु तिचे गर्भाशय पूर्णपणे बरे होऊ शकले नाही. ही अंतर्निहित समस्या तिच्या पुढील गर्भधारणेवर परिणाम करत राहिली. गर्भपातानंतरचा संसर्ग ही एक मोठी समस्या होती.
गर्भपातानंतरचा संसर्ग म्हणजे नक्की काय
तज्ज्ञ स्पष्ट करतात की गर्भपातानंतरचा संसर्ग म्हणून ओळखली जाणारी ही स्थिती एंडोमेट्रियमच्या आतील थराला नुकसान पोहोचवते. अल्ट्रासाऊंडवर गर्भाशय पूर्णपणे निरोगी दिसत असले तरी आणि महिलेची मासिक पाळी नियमित राहते, परंतु आतील थर खराब होतो. म्हणूनच गर्भधारणा टिकू शकत नाही. डॉक्टरांनी प्रथम या समस्येवर उपचार केले जेणेकरून ती भविष्यात गर्भधारणा करू शकेल.
पहा व्हिडिओ