शरीरात असू शकते 'या' पोषक तत्वांची कमतरता, वेळीच घ्या उपचार
रात्रीच्या वेळी गाढ झोपेसाठी रोजच्या आहारात पौष्टिक पदार्थांचे आणि शरीराला आवश्यक असलेल्या पदार्थांचे सेवन केले जाते. मात्र काहीवेळा निरोगी आरोग्य असूनसुद्धा रात्रीच्या वेळी व्यवस्थित झोप येत नाही. झोपल्यानंतर शरीरात अनेक बदल होऊ लागतात. झोपल्यानंतर रात्रीच्या वेळी अचानक पायांना सूज येणे, पायांच्या नसांमध्ये वेदना होणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. या समस्यांकडे सगळेच लोक दुर्लक्ष करतात. पण शरीरातील विटामिनची कमतरता निर्माण झाल्यानंतरसुद्धा पायांच्या नसांना सूज किंवा वेदना होऊ लागतात. या वेदनांकडे दुर्लक्ष न करता शरीरासाठी आवश्यक असलेल्या पदार्थांचे नियमित सेवन करावे. शरीरामध्ये विटामिन बी 12 ची कमतरता निर्माण झाल्यानंतर संपूर्ण शरीरातील सर्वच अवयवांना इजा पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा योग्य सल्ला घ्यावा.(फोटो सौजन्य – iStock)
शरीरसाठी विटामिन बी 12 अतिशय महत्वाचे आहे. शरीरातील स्नायू, मज्जतंतू, दात,डोळे इत्यादी अनेक सर्वच अवयवनांसाठी विटामिन बी 12 अतिशय महत्वाचे आहे. त्यामुळे शरीरातील विटामिन बी 12 कमी झाल्यानंतर अनेक बदल दिसून येतात. पायांच्या नसांना सूज आल्यानंतर पायांमध्ये वेदना होऊ लागतात.विटामिन बी 12 ची कमतरता निर्माण झाल्यानंतर कोणत्या समस्या उद्भवतात.
विटामिन बी 12 ची कमतरता निर्माण झाल्यानंतर पायांमध्ये वेदना होणे, पायांना सूज येणे, पायांमध्ये अचानक सुन्नपणा जाणवणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. या समस्यांकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावे. शरीरामध्ये असलेल्या तांबड्या रक्तपेशींची समस्या कमी झाल्यानंतर मज्जसंस्थेवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते.
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीरात निर्माण झालेली डिहायड्रेशनची समस्या, वाढलेला तणाव, अपुरी झोप, आहारात सतत होणारे बदल इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. यामुळे बऱ्याचदा शरीरात विटामिनची कमतरता निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे शरीरात होणाऱ्या बदलांकडे योग्य लक्ष देणे आवश्यक आहे.
शरीरात विटामिन बी 12 ची कमतरता निर्माण झाल्यानंतर हातापायांमध्ये सुन्नपणा जाणवू लागतो. यामुळे बऱ्याचदा शरीरातील हाडांना सुद्धा इजा पोहचण्याची शक्यता असते. चालताना किंवा रात्रीच्या वेळी झोपल्यानंतर अचानक हातपाय सुन्न होणे किंवा मुंग्या येणे इत्यादी समस्या उद्भवू लागतात. यामुळे बऱ्याचदा अशक्तपणा, थकवा किंवा श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो.