दैनंदिन आहारात दह्यासोबत चुकूनही करू नका 'या' पदार्थांचे सेवन
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीराला थंडाव्याची आवश्यकता असते. कारण थंड पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीरात वाढलेली उष्णता कमी होते आणि आरोग्याला अनेक फायदे होतात. या दिवसांमध्ये दही खाण्यास जास्त प्राधान्य दिले जाते. दह्यामध्ये असलेले गुणकारी घटक आरोग्यासाठी अतिशय प्रभावी ठरतात. याशिवाय उष्णता कमी करण्यासाठी दही, ताक, नारळ पाणी, सरबत इत्यादी पदार्थांचे सेवन करावे. दही शरीरासह पोटाला थंडावा देण्यासाठी मदत करते. दह्यामध्ये सोडियम, पोटॅशियम, फायबर, प्रथिने, कॅल्शियम, लोह आणि विटामिन डी इत्यादी अनेक घटक आढळून येतात. अनेक लोक सकाळच्या नाश्त्यात पराठा किंवा चपातीसोबत दही खातात. मात्र अनेक लोक कच्च्या पदार्थांसोबत दह्याचे सेवन करतात.(फोटो सौजन्य – iStock)
फायबरयुक्त दह्यासोबत चुकीच्या पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. दह्यामध्ये आढळून येणारे घटक चुकीच्या पदार्थांमुळे नष्ट होऊन जातात. याशिवाय दह्यासोबत कांद्याचे सेवन करणे अतिशय चुकीचे आहे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला दह्यासोबत कोणत्या पदार्थांचे सेवन करू नये, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पदार्थांच्या सेवनामुळे शरीरात विष तयार होण्याची शक्यता असते. हे पदार्थ आरोग्यासाठी अतिशय घातक ठरतात.
दह्यासोबत चुकूनही केळ्यांचे सेवन करू नये. दही आणि केळी एकत्र खाल्यामुळे पचनसंबंधित समस्या उद्भवू लागतात. आपल्यातील अनेकांना फळांच्या रायत्यासोबत दही खाण्याची सवय असते. मात्र असे केल्यामुळे पचनसंस्थेवर गंभीर परिणाम होतो आणि पचनाच्या समस्या वाढत जातात. त्यामुळे केळी खाल्यानंतर दोन तासांनी दह्याचे सेवन करावे.
रोजच्या जेवणात कांद्याचा वापर आवर्जून केला जातो. यामध्ये असलेले घटक आरोग्यासाठी अतिशय प्रभावी असतात. पण स्वभावाने उष्ण असलेल्या कांद्यासोबत चुकूनही दह्याचे सेवन करू नका. यामुळे उलट्या, गॅस आणि ऍलर्जी इत्यादी गंभीर समस्या उद्भवू शकतात. पचनक्रिया बिघडून शरीरात बदल होण्याची शक्यता असते.
सगळ्यांचा मासे खायला खूप आवडतात. पण अनेक लोक मासे बनवताना किंवा मासे खाल्यानंतर दह्याचे सेवन करतात. मासे खाल्यानंतर दह्याचे सेवन करणे अतिशय चुकीचे आहे. यामुळे शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. पोटदुखी , गॅस, अपचन आणि उलट्या इत्यादी समस्या उद्भवू लागतात. मासे आणि दही हे अतिशय चुकीचे मिश्रण आहे.
आयुर्वेदामध्ये दही आणि दुधाचे एकत्र सेवन करणे अतिशय चुकीचे मानले जाते. दही शरीरासाठी अतिशय हलके असते, पण दूध पचण्यास जास्त वेळ लागतो. त्यामुळे दही आणि दुधाचे एकत्र सेवन केल्यामुळे पचनसंबंधित समस्या उद्भवू लागतात. गॅस, आम्लता, पोट फुगणे आणि पचनासंबंधित समस्या उद्भवून आरोग्याला हानी पोहचते.