Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 21 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ragi Benefits: नाचणीमध्ये लपलाय आरोग्याचा खजिना, खाण्याची योग्य पद्धत आणि फायदे

Ragi Benefits For Health: नाचणीमध्ये प्रथिने, लोह आणि कॅल्शियम मुबलक प्रमाणात आढळते. वजन कमी करण्यासाठीही नाचणीचे पीठ फायदेशीर आहे. तज्ज्ञांकडून जाणून घ्या त्याचे फायदे, तोटे आणि खाण्याची योग्य पद्धत. नाचणी हे अत्यंत फायदेशीर असे धान्य आहे.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jun 24, 2024 | 10:33 AM
नाचणीचे फायदे (फोटो सौजन्य - iStock)

नाचणीचे फायदे (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Follow Us:

आयुर्वेदात योग्य खाण्याच्या सवयी ही निरोगी राहण्याची गुरुकिल्ली असल्याचे म्हटले जाते. योग्य खाणे म्हणजे तुम्ही तुमच्या आहारात योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात पौष्टिक पदार्थांचा समावेश करणे. तसेच शरीराच्या प्रकृतीनुसार आणि ऋतुमानानुसार आहारात बदल करावा लागतो. नाचणी हे असे धान्य आहे जे निरोगी राहण्यासाठी मोठ्या प्रमाणात मदत करू शकते. 

आजच्या काळात लोकांनी पुन्हा एकदा आपल्या आहारात नाचणीचा समावेश करायला सुरुवात केली आहे. वास्तविक, आपल्या देशात नाचणी पिढ्यानुपिढ्या वापरली जाते. आजकाल आहारतज्ज्ञदेखील निरोगी राहण्यासाठी नाचणीचा आहारात समावेश करण्याचा सल्ला देतात. नाचणीचे गुणधर्म, फायदे, खाण्याची योग्य पद्धत आणि तोटे याबद्दल तज्ज्ञांकडून जाणून घेऊया. आहारतज्ज्ञ मनोली मेहता यांनी ही माहिती दिली असून तुम्हीही त्याचा उपयोग करावा. 

नाचणीमधील घटक 

नाचणीमध्ये असणारे तत्व (फोटो सौजन्य – iStock)

नाचणीमध्ये कॅल्शियम, लोह, प्रथिने आणि फायबर हे तत्व मुबलक प्रमाणात आढळतात. 100 ग्रॅम नाचणीमध्ये सुमारे 8 ग्रॅम प्रथिने असतात. त्यात पोटॅशियम आणि मॅग्नेशियमचे प्रमाणही जास्त असते. नाचणीमध्ये विटामिन ई आणि अँटिऑक्सिडंट्सदेखील आढळतात, जे आरोग्याला अत्यंत फायदेशीर ठरतात. 

रागीचे आरोग्यदायी फायदे 

  • नाचणीमध्ये असलेल्या पोषक तत्वांमुळे ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. नाचणीचे पीठ वजन कमी करण्यासाठी गुणकारी आहे
  • नाचणीमध्ये कॅल्शियम मुबलक प्रमाणात असते. हे खाल्ल्याने हाडे आणि दात मजबूत होतात
  • नाचणीमध्ये अनेक अत्यावश्यक अमीनो ॲसिडदेखील असतात. जे विशेषतः महिलांसाठी खूप महत्वाचे आहे. उच्च कॅल्शियम सामग्रीमुळे, ऑस्टियोपोरोसिसने ग्रस्त असलेल्या लोकांसाठी नाचणी खूप फायदेशीर आहे
  • यामध्ये फायबर मुबलक प्रमाणात असते. हे पचन सुधारते, आतड्याच्या हालचालीसाठी फायदेशीर आहे आणि रक्तातील साखरेची पातळी देखील नियंत्रित करते
  • हे नैसर्गिकरित्या ग्लूटेन-फ्री आहे. त्यामुळे ज्यांना ग्लुटेनची ऍलर्जी आहे, तेही त्यांचा आहारात समावेश करू शकतात
  • नाचणी हा लोहाचा चांगला स्रोत आहे. त्यामुळे हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्यासाठी त्याचा आहारात समावेश करणे आवश्यक आहे. ज्या लोकांच्या शरीरात अशक्तपणा आहे किंवा ज्यांना अनेकदा थकवा जाणवतो आणि अशक्तपणा जाणवतो, त्यांनी ते जरूर खावे
  • नाचणीचा ग्लायसेमिक इंडेक्सही कमी असतो. त्यामुळे ते खाल्ल्याने साखरेची पातळी अजिबात वाढत नाही. हे खाल्ल्याने मधुमेहामध्ये फायदा होईल
  • हा वनस्पती आधारित प्रथिनांचा चांगला स्रोत आहे. विटामिन बी कॉम्प्लेक्स, विटामिन सी, थायमिन, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि पोटॅशियम यासारखी अनेक आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे नाचणीमध्ये आढळतात
  • नाचणी कोलेस्टेरॉल आणि बीपीची पातळी नियंत्रित करून हृदयविकारांना प्रतिबंध करते आणि आरोग्य सुधारण्यास मदत मिळते 
  • नाचणीमध्ये आढळणारे फायटिक ॲसिड आणि आहारातील फायबर खराब कोलेस्ट्रॉल कमी करतात
  • नाचणीमध्ये असलेले फेरुलिक ॲसिड त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करते. यामध्ये अँटी-एजिंग गुणधर्म देखील आढळतात
  • नाचणीमध्ये मेथिओनिन, सिस्टीन आणि लायसिन यांसारखे अमिनो ॲसिड आढळतात, जे कॅन्सरपासून बचाव करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. यामध्ये अँटी-ऑक्सिडंट, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-डायबेटिक गुणधर्म आढळतात. त्याचा आहारात समावेश केल्यास साखर, संधिवात आणि काही ॲलर्जी टाळता येतात
मुलांसाठी नाचणीचे फायदे 

नाचणीचे फायदे (फोटो सौजन्य – iStock)

लहान मुलांसाठी नाचणी हे सुपरफूडपेक्षा कमी नाही. पौष्टिकतेने परिपूर्ण अशी नाचणी मानली जाते. नाचणी खाल्ल्याने मुलांच्या हाडांचा विकास व्यवस्थित होतो तसंच मुलांच्या शरीरात रक्ताची कमतरता यामुळे होत नाही. तसेच नाचणीमुळे मुलांची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. नाचणीची खिचडी मुलांना देता येते. तुम्ही मुलांसाठी नाचणीची लापशीही बनवू शकता. वाढत्या वयाच्या मुलांसाठी हे खूप फायदेशीर आहे. मात्र, मुलांना नाचणीचे पीठ देण्यापूर्वी एकदा आहारतज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि त्याप्रमाणे प्रमाण ठरवून त्यांना खायला द्या. 

कसा करावा नाचणीचा वापर 

  • नाचणीचा आहारात अनेक प्रकारे समावेश करता येतो. डोसा, इडली आणि उपमा हे नाचणीच्या पिठापासून बनवले जातात
  • नाचणीपासून भाकरी आणि पराठाही बनवता येतो
  • तुम्ही भाज्या आणि नाचणीचे पीठ मिक्स करूनही सूप बनवू शकता
  • खिचडी, लापशी आणि लाडूही नाचणीपासून बनवले जातात
नाचणीपासून होणारे नुकसान 

नाचणी आरोग्यासाठी जरी खूप चांगली असली तरीही काही लोकांनी त्याचे सेवन टाळावे. जर तुम्हाला किडनी स्टोन किंवा किडनीशी संबंधित कोणतीही समस्या असेल तर तुम्ही नाचणी खाऊ नये कारण त्यात भरपूर प्रोटीन आणि कॅल्शियम असते. थायरॉईडच्या बाबतीत नाचणी न खाण्याचाही सल्ला दिला जातो. नाचणी प्रकृतीने उष्ण असते, त्यामुळे उन्हाळ्यात त्याचे जास्त प्रमाणात सेवन करू नये. ज्या लोकांची पचनशक्ती कमकुवत असते त्यांनाही ते पचण्यास त्रास होतो.

Web Title: Health benefits of ragi how to eat and side effects

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 24, 2024 | 10:33 AM

Topics:  

  • Health Tips

संबंधित बातम्या

International Yoga Day 2026 : डिजिटल तणावावर योगाचं प्रभावी औषध; स्क्रीन टाईम, फोमो अन् बर्नआउटपासून मिळेल दिलासा
1

International Yoga Day 2026 : डिजिटल तणावावर योगाचं प्रभावी औषध; स्क्रीन टाईम, फोमो अन् बर्नआउटपासून मिळेल दिलासा

Cooking Oil: कोणते कुकिंग ऑईल्स आरोग्यासाठी ठरत आहेत धोकादायक? सत्य वाचाच
2

Cooking Oil: कोणते कुकिंग ऑईल्स आरोग्यासाठी ठरत आहेत धोकादायक? सत्य वाचाच

Black Coffee: ब्लॅक कॉफी पिण्याची योग्य वेळ कोणती, काय सांगते संशोधन?
3

Black Coffee: ब्लॅक कॉफी पिण्याची योग्य वेळ कोणती, काय सांगते संशोधन?

फणसाच्या बिया फेकण्याआधी थांबा! व्हिटॅमिन्स-मिनरल्सचा आहे खजिना, कशाप्रकारे सेवन करावे? जाणून घ्या सविस्तर
4

फणसाच्या बिया फेकण्याआधी थांबा! व्हिटॅमिन्स-मिनरल्सचा आहे खजिना, कशाप्रकारे सेवन करावे? जाणून घ्या सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.