Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Black Coffee: ब्लॅक कॉफी पिण्याची योग्य वेळ कोणती, काय सांगते संशोधन?

अनेक जण सकाळी उठल्यावर ब्लॅक कॉफी पिऊन दिवसाची सुरूवात करतात. पण नक्की ब्लॅक कॉफी पिण्याची योग्य वेळ कोणती हे मात्र माहीतच नसतं. या लेखातून योग्य माहिती तुमच्यासाठी देत आहोत.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jun 17, 2026 | 04:44 PM
ब्लॅक कॉफी नक्की कोणत्या वेळी प्यावी (फोटो सौजन्य - iStock)

ब्लॅक कॉफी नक्की कोणत्या वेळी प्यावी (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Follow Us:
  • ब्लॅक कॉफी कधी प्यावी
  • ब्लॅक कॉफी पिण्याचे योग्य फायदे 
  • ब्लॅक कॉफीचे शरीराला काय फायदे होतात 
आपल्यापैकी बरेच जण आपल्या दिवसाची सुरुवात ब्लॅक कॉफीने करतात. काही जण वजन कमी करण्यासाठी हे सर्वोत्तम पेय मानतात आणि दिवसातून ३-४ कप पितात. तर काही जण ऑफिसमधील झोप आणि आळस दूर करण्यासाठी हे आपले आवडते पेय मानतात. अनेकांच्या लाइफस्टाईलचा ब्लॅक कॉफी हा महत्त्वाचा भाग आहे. पण Black कॉफी पिण्याची योग्य वेळ तुम्हाला माहीत आहे का? नसेल, तर हा लेख तुमच्यासाठीच आहे. 

रक्तातील साखरेची पातळी कायमच राहाल नियंत्रणात! रोज प्या एक कप ब्लॅक कॉफी, संपूर्ण शरीराला होतील भरमसाट फायदे

ब्लॅक कॉफीची सवय 

लोक अनेकदा सकाळी उठल्याबरोबर ब्लॅक कॉफी पिण्यास सुरुवात करतात. पण वैद्यकीय शास्त्रानुसार, ही चुकीची वेळ आहे. जेव्हा आपण सकाळी उठतो, तेव्हा आपल्या शरीरात कॉर्टिसोल नावाच्या हार्मोनची पातळी जास्त असते. याला ‘स्ट्रेस हार्मोन’ असंही म्हणतात, जे आपल्याला नैसर्गिकरित्या जागे करते आणि सतर्क ठेवते. त्यामुळे, जेव्हा तुम्ही या वेळी कॉफी पिता, तेव्हा कॅफीन कॉर्टिसोलच्या नैसर्गिक उत्पादनाचा वेग कमी करते. 

परिणामी, शरीर कॉफीवर अवलंबून राहू लागते आणि सकाळी तुमची नैसर्गिक ऊर्जा हळूहळू कमी होऊ लागते. रिकाम्या पोटी कॉफी प्यायल्याने आम्लपित्त आणि छातीत जळजळदेखील होऊ शकते. म्हणून, रिकाम्या पोटी कॉफी पिणे टाळावे.

ब्लॅक कॉफी पिण्याची योग्य वेळ कोणती?

ब्लॅक कॉफी पिण्याची सर्वोत्तम आणि सर्वात शास्त्रीय वेळ म्हणजे झोपेतून उठल्यानंतर २ ते ३ तासांनी, म्हणजेच सकाळी ९:३० ते ११:३० च्या दरम्यान. या काळात शरीरातील कॉर्टिसोलची पातळी कमी होऊ लागते आणि तुम्हाला थोडा आळस येऊ शकतो. कॅफीन ऊर्जेची पातळी वाढवण्यास मदत करू शकते, ज्यामुळे तुम्ही कोणत्याही दुष्परिणामांशिवाय दिवसभर सक्रिय राहू शकता. 

शिवाय, दुपारच्या जेवणानंतर अनेकदा आळस येतो, जेव्हा कॉर्टिसोलची पातळी पुन्हा कमी होते. दुपारी एक कप ब्लॅक कॉफी प्यायल्याने तुमची उत्पादकता वाढू शकते. जर तुम्ही जिममध्ये जात असाल, तर व्यायामाच्या ३० मिनिटे आधी ब्लॅक कॉफी प्या. हे एक उत्कृष्ट प्री-वर्कआउट पेय आहे जे चयापचय क्रिया वाढवते आणि चरबी जाळण्यास मदत करते. 

सकाळी उठल्यानंतर नियमित करा ब्लॅक कॉफीचे सेवन, शरीराला होतील गुणकारी फायदे

दिवसातून किती ब्लॅक कॉफी प्यावी 

तुम्ही दिवसातून साधारण २-३ कप ब्लॅक कॉफी पिऊ शकता. यापेक्षा अधिक ब्लॅक कॉफी तुमच्या शरीरावर दुष्परिणाम करू शकते. त्याप्रमाणेच तुम्ही जर आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन याचे सेवन केले तर तुम्हाला त्याचे अधिक चांगले परिणाम मिळू शकतात. याशिवाय तुम्ही कोणती ब्लॅक कॉफी पित आहात आणि त्यात किती चमचे समावेश करत आहात हेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय याचे अतिसेवन करू नये. 

टीप –  हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: What is the perfect time to drink black coffee daily

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2026 | 04:44 PM

Topics:  

  • coffee
  • Health Tips
  • lifestyle news

संबंधित बातम्या

आता महिनाभर नाही, अनेक महिने चालेल गॅस सिलेंडर! स्वयंपाक करताना फक्त करा ‘हे’ १ लहान काम
1

आता महिनाभर नाही, अनेक महिने चालेल गॅस सिलेंडर! स्वयंपाक करताना फक्त करा ‘हे’ १ लहान काम

शरीरात नेहमी थकवा अन् अशक्तपणा जाणवतोय? आहारात समाविष्ट करा ‘हे’ ५ पदार्थ; मॅग्नेशियमची कमी होईल दूर
2

शरीरात नेहमी थकवा अन् अशक्तपणा जाणवतोय? आहारात समाविष्ट करा ‘हे’ ५ पदार्थ; मॅग्नेशियमची कमी होईल दूर

Infertility Cause: लग्नानंतर गर्भधारणा होत नाही? 5 महत्त्वाची कारणं, करू नका दुर्लक्ष
3

Infertility Cause: लग्नानंतर गर्भधारणा होत नाही? 5 महत्त्वाची कारणं, करू नका दुर्लक्ष

Blood Group Diabetes: कोणत्या रक्तगटाच्या व्यक्तीला डायबिटीसचा धोका अधिक, काय सांगतो अभ्यास
4

Blood Group Diabetes: कोणत्या रक्तगटाच्या व्यक्तीला डायबिटीसचा धोका अधिक, काय सांगतो अभ्यास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.