Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 6 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Cooking Oil: कोणते कुकिंग ऑईल्स आरोग्यासाठी ठरत आहेत धोकादायक? सत्य वाचाच

तुम्ही स्वयंपाकघरात जेवणासाठी जे तेल वापरता ते तुमच्या आरोग्यासाठी योग्य आहे का? कोणत्या कुकिंग ऑईलमुळे तुमची तब्बेत बिघडत आहे याबाबत महत्त्वाची माहिती आपण या लेखातून घेऊया

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jun 19, 2026 | 06:14 PM
कोणते कुकिंग ऑईल आहे आरोग्यासाठी हानिकारक (फोटो सौजन्य - iStock)

कोणते कुकिंग ऑईल आहे आरोग्यासाठी हानिकारक (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Follow Us:
  • रोजच्या वापरात कोणते तेल घ्यावे?
  • कोणते कुकिंग ऑईल शरीरासाठी हानिकारक आहे
  • कुकिंग ऑईलचा शरीरावर काय परिणाम होतो 
आजकाल लोक आरोग्याबाबत जागरूक झाले आहेत. ते त्यांच्या आहारापासून ते फिटनेसपर्यंत प्रत्येक गोष्टीची काळजी घेतात. पण एक गोष्ट जी ते अनेकदा विसरतात, ती म्हणजे स्वयंपाकासाठी वापरले जाणारे तेल. बरेच लोक स्वयंपाकाच्या तेलाकडे फारसे लक्ष देत नाहीत, ज्यामुळे लोकांचे बॅड कोलेस्ट्रॉल विनाकारण वाढते. 

वास्तविक पाहता, या स्वयंपाकाच्या तेलांमध्ये ट्रान्स फॅट आणि सॅचुरेटेड फॅट मोठ्या प्रमाणात असतात, ज्यामुळे बॅड कोलेस्ट्रॉलसोबतच हृदयविकारांचा धोका वाढतो आणि लठ्ठपणासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. चला तर आज जाणून घेऊया की अशी कोणती तेलं आहेत जी आरोग्याला हानी पोहोचवू शकतात.

खाद्यतेल कोणते व किती वापरावे? आरोग्यदायी स्वयंपाकासाठी करा योग्य तेलाची निवड, शरीर राहील निरोगी

पाम तेल

सर्वात पहिले तेल म्हणजे पाम तेल. पाम तेलाचा वापर सामान्यतः मिठाई बनवण्यासाठी केला जातो. त्यातून अँटीऑक्सिडंट्स काढून टाकले जातात आणि मिठाईसोबतच जंक फूड बनवण्यासाठीही या तेलाचा वापर केला जातो. पाम तेलामध्ये सॅचुरेटेड फॅटचे प्रमाण खूप जास्त असते, ज्यामुळे बॅड कोलेस्ट्रॉल वेगाने वाढते आणि हृदयविकाराचा धोका लक्षणीयरीत्या वाढतो.

रिफाईंड सनफ्लॉवर ऑईलचा त्रास 

रिफाइंड सनफ्लॉवर ऑईलमध्ये ओमेगा-६ फॅटी ॲसिडचे प्रमाण जास्त असते, ज्याचे अतिसेवन केल्यास जळजळ होऊ शकतो. उच्च तापमानावर प्रक्रिया केल्यामुळे त्यातील आवश्यक पोषक तत्वे नष्ट होतात. याच्या नियमित सेवनाने हृदयविकार आणि लठ्ठपणाचा धोका वाढू शकतो.

राईस ब्रानही आहे हानिकारक 

राईस ब्रान ऑईल आजकाल जास्त वापरले जाते. मात्र हे तेल रिफाईंड आणि प्रक्रिया केलेले असते. त्यात हेक्सिनचा वापर केला जातो, जे आरोग्यासाठी खूप हानिकारक ठरू शकते. त्यामुळे पदार्थांमध्ये राईस ब्रान ऑईलचा वापर करताना तुम्ही व्यवस्थित माहिती जाणून घ्या. 

वनस्पती तेल

अनेक जण वनस्पती तेल स्वस्त आणि आरोग्याला चांगले आहे असं समजतात. पण मुख्य म्हणजे वनस्पती तेल हे दोन किंवा अधिक वेगवेगळ्या वनस्पतींपासून काढलेल्या तेलांचे मिश्रण असते. त्यात अनेकदा मका, कॅनोला आणि पाम तेलांचे मिश्रण असते. ते अधिक प्रमाणात रिफाईंड केले जाते, जे आरोग्यासाठी हानिकारक असू शकते.

कॉर्न ऑईल टाळा 

अजून एक तेल म्हणजे कॉर्न ऑईल. यामध्ये पॉलीअनसॅचुरेटेड फॅटी ऍसिडस् आणि ओमेगा-६ फॅटी ऍसिडस् जास्त प्रमाणात असतात, ज्यामुळे शरीरात सूज निर्माण होते. त्यात ओमेगा-३ फॅट्स नगण्य प्रमाणात असतात, जे हृदयासाठी आरोग्यदायी नसतात. यापैकी कोणतेही तेल तुम्ही वापरत असाल तर आपल्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. 

Best Cooking Oil: कॅन्सर-कोलेस्ट्रॉल आणि मृत्युच्या दाढेत घेऊन जाईल ‘हे’ तेल, FSSAI ने केला उत्तम तेलाचा खुलासा

टीप –  हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Which cooking oils are proving dangerous for health know the details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 19, 2026 | 06:14 PM

Topics:  

  • cooking oil
  • Health Care Tips
  • Health Tips

संबंधित बातम्या

लठ्ठपणामुळे शरीरावर चरबी वाढली आहे? मग बिनधास्त खा ‘हे’ पौष्टिक पदार्थ, वजन कमी करण्याची पारंपरिक पद्धत
1

लठ्ठपणामुळे शरीरावर चरबी वाढली आहे? मग बिनधास्त खा ‘हे’ पौष्टिक पदार्थ, वजन कमी करण्याची पारंपरिक पद्धत

मिडलाइफ महिलांच्या आरोग्यावर भर! लिसा रे च्या क्लिनिकमध्ये अनुभवी तज्ज्ञ डॉक्टरांचा समावेश, आरोग्यसेवेला मिळेल चालना
2

मिडलाइफ महिलांच्या आरोग्यावर भर! लिसा रे च्या क्लिनिकमध्ये अनुभवी तज्ज्ञ डॉक्टरांचा समावेश, आरोग्यसेवेला मिळेल चालना

एचएनसीआयआयच्या तिसऱ्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित परिषदेत तोंडाच्या कर्करोग उपचारांच्या भविष्यासंदर्भात राष्ट्रीय स्तरावर चर्चा
3

एचएनसीआयआयच्या तिसऱ्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित परिषदेत तोंडाच्या कर्करोग उपचारांच्या भविष्यासंदर्भात राष्ट्रीय स्तरावर चर्चा

लक्षपूर्वक खा, निरोगी रहा! आरोग्याची गुरुकिल्ली ठरू शकते ‘Mindful Eating’; हे हेल्दी स्नॅक्स तुम्हाला दिवसभर ठेवतील तंदुरुस्त
4

लक्षपूर्वक खा, निरोगी रहा! आरोग्याची गुरुकिल्ली ठरू शकते ‘Mindful Eating’; हे हेल्दी स्नॅक्स तुम्हाला दिवसभर ठेवतील तंदुरुस्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.